राज ठाकरेंच्या 'चंपाची चंपी' टीकेला चंद्रकांत पाटलांचं उत्तर

अजित पवारांनी तयार केलेला शब्द न वापरता राज ठाकरेंनी माझ्यासाठी दुसरा एखादा शब्द शोधून काढला असता तर बरं झालं असतं, असं चंद्रकांत पाटील 'टीव्ही9 मराठी'ला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले.

राज ठाकरेंच्या 'चंपाची चंपी' टीकेला चंद्रकांत पाटलांचं उत्तर

मुंबई : विधानसभा निवडणुकीत ‘चंपाची चंपी’ करणार असं म्हणणाऱ्या मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं (Chandrakant Patil on Raj Thackeray) आहे. राज ठाकरेंनी आपल्यासाठी दुसरा शब्द शोधून काढायला हवा होता, असा टोला चंद्रकांत पाटलांनी लगावला आहे.

राज ठाकरे यांचं व्यक्तिमत्त्व अतिशय छान आहे. त्यांनी आपला स्वतंत्र बाणा जपायला हवा होता. ‘चंपा’ हा शब्द सर्वप्रथम अजित पवार यांनी वापरला होता. तोच शब्द न वापरता राज यांनी माझ्यासाठी दुसरा एखादा शब्द शोधून काढला असता तर बरं झालं असतं, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

राज यांनी काहीतरी नवं बोलावं. तीच भाषा बोलू नये. कदाचित राज यांचा शब्दसंग्रह कमी पडला असावा. पण ते काहीही बोलले असले, तरी मी त्यांच्या पातळीवर येणार नाही, असं पाटील ‘टीव्ही 9 मराठी’ला दिलेल्या एक्स्क्लुझिव्ह मुलाखतीत म्हणाले.

‘राज ठाकरे, अजित पवार माझी खिल्ली उडवतात. मात्र मी किती कामं केली आहेत, याची लोकांना कल्पना आहे. मराठा आरक्षण, शेतकरी कर्जमाफीसारखे प्रश्न मी हाताळले. मतदारांना याबद्दल माहिती आहे. त्यामुळे माझ्यावर टीका करणाऱ्यांना जनताच वेड्यात काढेल,’ असंही चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil on Raj Thackeray) म्हणाले.

कोल्हापूरचा मंत्री वाहून कोथरूडमध्ये; चंपाची चंपी करणार : राज ठाकरे

‘कोल्हापूर-सांगलीत अनेक ठिकाणी पूरस्थिती असताना सत्ताधारी निवडणुकांच्या प्रचारात मग्न होते. कोल्हापुरात तर एवढा पूर आला की या पुरात कोल्हापूरचा मंत्री कोथरुडपर्यंत वाहत आला.’ अशा शब्दात राज ठाकरेंनी चंद्रकांत पाटील यांच्यावर खोचक टीका केली होती.

पुणेकर नाव ठेवण्यात पटाईत असल्याचे त्यांनी म्हटलं. माझा मनसेचे उमेदवार अजय आहे, कारण ते चंपाची चंपी करणार आहेत, असंही राज ठाकरे म्हणाले होते.

पुण्यात शिवसेनेचा एकही उमेदवार दिसत नाही. नाशिक, पुण्यासारख्या मोठ्या शहरात शिवसेनेला युतीत एक जागा मिळत नाही? ते लाचार झालेत. बाळासाहेब असते तर असं करायची कोणाची हिंमत झाली नसती. भाजपसोबत इतकी वर्ष सडली, 124 वर का अडली? असा प्रश्नही राज ठाकरेंनी विचारला होता.

चंद्रकांत पाटील EXCLUSVE TV9 वर | विरोधकांच्या ‘चंपा’ बोलण्यावर काय बोलले चंद्रकांत पाटील?

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *