AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

प्रचाराच्या रणधुमाळीत आजारपण, धीरज देशमुख रुग्णालयात

हवामानातील सततच्या बदलामुळे तापीच्या आजाराचे प्रमाण वाढले असून काँग्रेसचे लातूर ग्रामीण मतदारसंघाचे उमेदवार धीरज देशमुख यांनाही लागण झाली.

प्रचाराच्या रणधुमाळीत आजारपण, धीरज देशमुख रुग्णालयात
| Updated on: Oct 15, 2019 | 2:44 PM
Share

लातूर : निवडणूक प्रचाराच्या रणधुमाळीत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे सुपुत्र आणि लातूर ग्रामीण मतदारसंघाचे काँग्रेसचे उमेदवार धीरज देशमुख आजारी पडले आहेत. धीरज देशमुख यांना लातूरमधील रुग्णालयात दाखल (Dhiraj Deshmukh Admitted in Hospital) करावं लागलं आहे.

विधानसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर आल्यामुळे सर्वच उमेदवार जोमाने प्रचार करत आहेत. प्रचाराची धावपळ आणि तब्येतीकडे झालेलं दुर्लक्ष धीरज देशमुख यांना महागात पडलं. हवामानातील सततच्या बदलामुळे सध्या तापीच्या आजाराचे प्रमाण सगळीकडे वाढलं आहे. याची लागण धीरज देशमुखांनाही झाली.

‘कोणत्याही लहान मोठ्या आजाराकडे दुर्लक्ष करणं परवडणारं नसतं. गेल्या दोन-तीन दिवसांपासून अंगात थोडासा ताप होता, पण प्रचार सभांच्या व्यस्ततेमुळे तब्येतीकडे जरा दुर्लक्षच झालं. शेवटी नाईलाजाने काल लातूरमध्येच दवाखान्यात अॅडमिट व्हावं लागलं.’ असं धीरज देशमुख यांनी फेसबुकवर लिहिलं आहे.

धीरज देशमुखांची भावनिक साद, रितेश-जेनेलियासह देशमुख कुटुंब भारावलं

‘सध्या मी उपचार घेत असून आता प्रकृती सुधारते आहे. काळजी करु नये’ असं आवाहन धीरज देशमुख यांनी केलं. धीरज देशमुख यांना लातूरमधल्या सारडा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मतदानाचा दिवस तोंडावर आला असताना धीरज देशमुख आजारी पडल्याने कार्यकर्त्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे.

तुमच्या शुभेच्छा आणि स्नेहाच्या बळावर मी लवकरच बरा होऊन आपणासोबत प्रचारात सहभागी होईन, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. आपल्या अनुपस्थितीत (Dhiraj Deshmukh Admitted in Hospital) प्रचाराचं कार्य जोमात सुरु ठेवल्याबद्दल धीरज देशमुख यांनी समर्थकांचे शतश: आभार व्यक्त केले आहेत.

पहिल्याच भाषणात धीरज देशमुख यांनी केलेल्या भावनिक आवाहनानंतर व्यासपीठावर उपस्थित विलासरावांच्या पत्नी वैशालीताई देशमुख, धीरज यांचे ज्येष्ठ बंधू आणि आमदार अमित देशमुख, अभिनेते रितेश देशमुख, अभिनेत्री जेनेलिया देशमुख यांच्यासह संपूर्ण देशमुख कुटुंबाचे डोळे पाणावले होते.

लातूर शहर मतदारसंघातून अमित देशमुख, तर लातूर ग्रामीण मतदारसंघातून धीरज देशमुख निवडणूक लढवत आहेत. धीरज देशमुख यांनी जिल्हा परिषद सदस्य म्हणून या अगोदर राजकारणाचे धडे गिरवले आहेत. वडील विलासराव देशमुख आणि मोठा भाऊ अमित देशमुख यांच्यामुळे धीरज देशमुखांनी राजकारण जवळून पाहिलं आहे.

याआधी, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनाही प्रचारादरम्यान डेंग्यू झाला होता. सुळेंची प्रकृती सुधारली असून त्यांनीही पुन्हा प्रचाराला प्रारंभ केला आहे.

Follow Us
वादग्रस्त ऑडिओनंतर आमदार संजय गायकवाडांनी मागितली माफी, माझा हेतू...
वादग्रस्त ऑडिओनंतर आमदार संजय गायकवाडांनी मागितली माफी, माझा हेतू....
भाजपने पुन्हा एकदा पंजाबच्या जनतेला दगा दिला; केजरीवाल यांचा हल्लाबोल
भाजपने पुन्हा एकदा पंजाबच्या जनतेला दगा दिला; केजरीवाल यांचा हल्लाबोल.
मीरा-भाईंदरमध्ये येऊन दाखवावं, सदावर्तेंना अविनाश जाधवांचं आव्हान
मीरा-भाईंदरमध्ये येऊन दाखवावं, सदावर्तेंना अविनाश जाधवांचं आव्हान.
दिल्लीत घडामोडी वाढल्या, आपचे 7 खासदार थेट भाजपा अध्यक्षांच्या भेटीला;
दिल्लीत घडामोडी वाढल्या, आपचे 7 खासदार थेट भाजपा अध्यक्षांच्या भेटीला;.
मोठी बातमी! केजरीवालांना धक्का, राघव चड्ढा यांच्यासोबत 7 खासदारांचा...
मोठी बातमी! केजरीवालांना धक्का, राघव चड्ढा यांच्यासोबत 7 खासदारांचा....
दिल्लीच्या राजकारणात आजवरचा सर्वात मोठा भूकंप, आम आदमी पक्ष फुटला
दिल्लीच्या राजकारणात आजवरचा सर्वात मोठा भूकंप, आम आदमी पक्ष फुटला.
हिंदू मुलींना मुस्लिम मुलंच आवडतात, माझ्या काकांच्या 3 बायका...
हिंदू मुलींना मुस्लिम मुलंच आवडतात, माझ्या काकांच्या 3 बायका....
अटकेच्या दिवशीच 58 लाखाचा व्यवहार! खरात तुरूंगात बसूनही करतोय कारनामे?
अटकेच्या दिवशीच 58 लाखाचा व्यवहार! खरात तुरूंगात बसूनही करतोय कारनामे?.
पश्चिम बंगालमध्ये कोणाची सत्ता अमित शाहांनी थेट सांगितलं...
पश्चिम बंगालमध्ये कोणाची सत्ता अमित शाहांनी थेट सांगितलं....
मोठी अपडेट! मुंबईतील नेस्को ड्रग्स प्रकरण आणखी चिघळलं, दोन पोलिसांवर..
मोठी अपडेट! मुंबईतील नेस्को ड्रग्स प्रकरण आणखी चिघळलं, दोन पोलिसांवर...