AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कंदील हटवल्यावरुन महापालिका अधिकाऱ्यांशी वाद, संदीप देशपांडे यांना जामीन

सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी संदीप देशपांडे यांच्यासह माजी नगरसेवक संतोष धुरी, शशांक नागवेकर, संतोष साळी यांना 14 नोव्हेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती.

कंदील हटवल्यावरुन महापालिका अधिकाऱ्यांशी वाद, संदीप देशपांडे यांना जामीन
| Updated on: Nov 04, 2019 | 2:19 PM
Share

मुंबई : दादर-माहिममध्ये लावलेले कंदील हटवण्यावरुन झालेल्या वादानंतर अटक झालेले मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांना अखेर जामीन मंजूर झाला आहे. तीन दिवसांच्या न्यायालयीन कोठडीनंतर देशपांडेंची 15 हजार रुपयांच्या वैयक्तिक जात मुचलक्यावर मुक्तता करण्यात आली. सत्र न्यायालयाने संदीप देशपांडेंना जामीन (MNS Sandeep Deshpande bail) मंजूर केला.

सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी संदीप देशपांडे यांच्यासह माजी नगरसेवक संतोष धुरी, शशांक नागवेकर, संतोष साळी यांना 14 नोव्हेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. मात्र वैयक्तिक जात मुचलक्यावर सर्व आरोपींची मुक्तता करण्यात आली आहे.

दादर-माहीममध्ये मनसेने लावलेले कंदील महापालिकेचे सहायक आयुक्त किरण दिघावकर यांनी हटवले होते. महापालिकेने हे कंदील काढून कचऱ्यात टाकल्यामुळे संदीप देशपांडे यांनी किरण दिघावकर यांना फैलावर घेतलं होतं. यावेळी त्यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना शिवीगाळही केल्याचा आरोप आहे.

या प्रकरणी पालिका अधिकाऱ्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर संदीप देशपांडेंना शिवाजी पार्क पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. सरकारी कामात अडथळा निर्माण करणे आणि अधिकाऱ्यांना शिवीगाळ केल्याचा ठपका संदीप देशपांडे यांच्यावर ठेवण्यात आला होता.

संदीप देशपांडे यांच्यावर भारतीय दंड संहिता कलम 353 नुसार शिवाजी पार्क पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सुरुवातीला न्यायालयाने संदीप देशपांडे यांना जामीन नाकारल्यामुळे त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली होती. 14 तारखेपर्यंत त्यांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश महानगर न्यायदंडाधिकारी पी एस काळे यांनी दिले होते.

विधानसभा निवडणुकीत मनसेच्या अनेक उमेदवारांचा निसटता पराभव झाला होता. माहिम मतदारसंघात शिवसेनेच्या सदा सरवणकर यांच्याकडून संदीप देशपांडेंना पराभवाचा सामना (MNS Sandeep Deshpande bail) करावा लागला होता. त्यानंतर अखिल चित्रे, नयन कदम यांसह मनसेचे अनेक नेते पुन्हा एकदा स्थानिक प्रश्नावर आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहेत.

संबंधित बातम्या : 

मनसे नेते संदीप देशपांडे यांना जामीन नाकारला, 14 नोव्हेंबरपर्यंत कोठडी

Follow Us
वादग्रस्त ऑडिओनंतर आमदार संजय गायकवाडांनी मागितली माफी, माझा हेतू...
वादग्रस्त ऑडिओनंतर आमदार संजय गायकवाडांनी मागितली माफी, माझा हेतू....
भाजपने पुन्हा एकदा पंजाबच्या जनतेला दगा दिला; केजरीवाल यांचा हल्लाबोल
भाजपने पुन्हा एकदा पंजाबच्या जनतेला दगा दिला; केजरीवाल यांचा हल्लाबोल.
मीरा-भाईंदरमध्ये येऊन दाखवावं, सदावर्तेंना अविनाश जाधवांचं आव्हान
मीरा-भाईंदरमध्ये येऊन दाखवावं, सदावर्तेंना अविनाश जाधवांचं आव्हान.
दिल्लीत घडामोडी वाढल्या, आपचे 7 खासदार थेट भाजपा अध्यक्षांच्या भेटीला;
दिल्लीत घडामोडी वाढल्या, आपचे 7 खासदार थेट भाजपा अध्यक्षांच्या भेटीला;.
मोठी बातमी! केजरीवालांना धक्का, राघव चड्ढा यांच्यासोबत 7 खासदारांचा...
मोठी बातमी! केजरीवालांना धक्का, राघव चड्ढा यांच्यासोबत 7 खासदारांचा....
दिल्लीच्या राजकारणात आजवरचा सर्वात मोठा भूकंप, आम आदमी पक्ष फुटला
दिल्लीच्या राजकारणात आजवरचा सर्वात मोठा भूकंप, आम आदमी पक्ष फुटला.
हिंदू मुलींना मुस्लिम मुलंच आवडतात, माझ्या काकांच्या 3 बायका...
हिंदू मुलींना मुस्लिम मुलंच आवडतात, माझ्या काकांच्या 3 बायका....
अटकेच्या दिवशीच 58 लाखाचा व्यवहार! खरात तुरूंगात बसूनही करतोय कारनामे?
अटकेच्या दिवशीच 58 लाखाचा व्यवहार! खरात तुरूंगात बसूनही करतोय कारनामे?.
पश्चिम बंगालमध्ये कोणाची सत्ता अमित शाहांनी थेट सांगितलं...
पश्चिम बंगालमध्ये कोणाची सत्ता अमित शाहांनी थेट सांगितलं....
मोठी अपडेट! मुंबईतील नेस्को ड्रग्स प्रकरण आणखी चिघळलं, दोन पोलिसांवर..
मोठी अपडेट! मुंबईतील नेस्को ड्रग्स प्रकरण आणखी चिघळलं, दोन पोलिसांवर...