पाच महिन्यात अशोक चव्हाण दुसऱ्यांदा पडणार : चिखलीकर

लोकसभा निवडणुकीत अशोक चव्हाणांच्या झालेल्या पराभवाची पुनरावृत्ती विधानसभा निवडणुकीतही होईल, असा विश्वास भाजप खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी व्यक्त केला.

पाच महिन्यात अशोक चव्हाण दुसऱ्यांदा पडणार : चिखलीकर
Follow us
| Updated on: Oct 23, 2019 | 12:59 PM

नवी दिल्ली : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे उमेदवार अशोक चव्हाण लोकसभेपाठोपाठ विधानसभा निवडणुकीतही पराभूत होणार, असा विश्वास लोकसभेला ‘जायंट किलर’ ठरलेले नांदेडचे भाजप खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर (Pratap Chikhalikar on Ashok Chavan) यांनी व्यक्त केला आहे.

पाच महिन्यात अशोक चव्हाण दुसऱ्यांदा पडणार, असं भाकित चिखलीकर यांनी ‘टीव्ही9 मराठी’शी बोलताना व्यक्त केलं. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा उद्या निकाल आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये ज्याप्रमाणे अशोक चव्हाणांचा पराभव झाला, त्याचप्रमाणे विधानसभेतही त्यांचा मोठा पराभव होणार असल्याचा दावा प्रतापराव चिखलीकर यांनी केला आहे.

नांदेड लोकसभा मतदारसंघात भाजपच्या प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी अशोक चव्हाणांना पराभवाची धूळ चारली होती. 40 हजारांच्या मताधिक्याने चिखलीकर निवडून आले होते. विधानसभेला अशोक चव्हाणांच्या पराभवाची पुनरावृत्ती होईल, असा विश्वास चिखलीकरांनी व्यक्त केला.

धनशक्ती विरुद्ध जनशक्ती असा लढा झाला असून या वेळेस भारतीय जनता पक्षाची जनशक्ती जिंकणार असा दावाही प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी (Pratap Chikhalikar on Ashok Chavan) केला. मे 2019 मध्ये लोकसभा निवडणुकीत अशोक चव्हाण पराभूत झाले होते. त्यामुळे ऑक्टोबरमधील विधानसभा निवडणुकीतही ते पराभूत झाले, तर पाच महिन्यांत दुसऱ्यांदा पराभव स्वीकारण्याची नामुष्की त्यांच्यावर ओढवेल.

यंदाच्या विधानसभा निवडणुकीत अशोक चव्हाण पत्नी अमिता चव्हाण यांच्या जागी नांदेडमधील भोकर मतदारसंघातून रिंगणात उतरले आहेत. भाजपने त्यांना श्रीनिवास देशमुख गोरठेकर यांच्या रुपाने तगडं आव्हान दिलं आहे.

विनोद तावडेंचा नियतीनेच ‘विनोद’ केला, अशोक चव्हाणांचे चिमटे

मतदारसंघ पुनर्रचनेच्या अगोदर 2004 ला याच भोकरमधून राष्ट्रवादीच्या उमेदवारीवर श्रीनिवास देशमुख गोरठेकर विजयी झाले. मात्र 2009 ला मतदारसंघाची पुनर्रचना झाली आणि अशोक चव्हाण यांच्यासाठी हा मतदारसंघ सुरक्षित बनला.

अशोक चव्हाण उमेदवार असलेल्या भोकरमध्ये तब्बल 134 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. त्यापैकी 91 अर्ज पात्र ठरले. तब्बल 91 उमेदवार असल्याने प्रशासन आणि अशोक चव्हाण यांना डोकेदुखी ठरणार होती. मात्र अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी तब्बल 84 उमेदवारांनी माघार घेतली. आता भोकरमध्ये केवळ सात उमेदवार रिंगणात आहेत.

2014 मध्ये अशोक चव्हाण लोकसभेवर निवडून गेले, तर त्यांच्या पत्नी अमिता चव्हाण भोकरमधून विधानसभेवर निवडून आल्या. पण यावेळी अशोक चव्हाणांसाठी ही लढाई सोपी राहिलेली नाही. 2019 मध्ये लोकसभेला अशोक चव्हाण यांना पराभूत केलेल्या खासदार प्रताप पाटील चिखलीकरांचं पाठबळ गोरठेकरांसोबत आहे.

गोरठेकर हे ज्येष्ठ नेते असूनही त्यांनी आतापासूनच प्रचारात मोठी आघाडी घेतली आहे. माजी मुख्यमंत्री राहिलेल्या चव्हाण यांच्या मतदारसंघात अनेक समस्या कायम आहेत. त्यामुळे आपलाच विजय निश्चित असल्याची खात्री गोरठेकर देतात.

Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.