राणेंची साथ सोडणाऱ्या सहकाऱ्याला नितेश राणेंचा टोला

माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे यांचे निकटवर्तीय सहकारी आणि सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे विद्यमान अध्यक्ष सतीश सावंत यांनी स्वाभिमान पक्षाचा (Nitesh Rane Tweet) राजीनामा दिला आहे.

राणेंची साथ सोडणाऱ्या सहकाऱ्याला नितेश राणेंचा टोला

सिंधुदुर्ग : माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे यांचे निकटवर्तीय सहकारी आणि सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे विद्यमान अध्यक्ष सतीश सावंत यांनी स्वाभिमान पक्षाचा (Nitesh Rane Tweet) राजीनामा दिला आहे. सतीश सावंत यांच्या राजीनाम्यानंतर आमदार नितेश राणे यांनी एक शायरी ट्विट केली आहे. “जब लोग करे आपकी बुराई, तब समझो आपने मचाई तबाई” असे ट्विट नितेश राणेंनी (Nitesh Rane Tweet) केले आहे.

राणेंच्या बालेकिल्ल्यात राणेंना मोठा धक्का बसला आहे. सोमवारी (30 सप्टेंबर) सतीश सावंत यांनी पक्षाचा राजीनामा दिला. “जो आपल्या कार्यकर्त्यांना सन्मान देईल त्या पक्षात मी प्रवेश करेन” असे सतीश सावंत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. सतीश सावंत हे गेल्या 25 वर्षापासून नारायण राणे यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात.

मात्र गेल्या काही दिवसांपासून आमदार नितेश राणे यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे सतीश सावंत यांनी राजीनामा दिला असल्याचे बोललं जात आहे. सावंत यांच्या राजीनाम्यामुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरणात खळबळ (Nitesh Rane Tweet) उडाली आहे.

सिंधुदुर्गात सध्या शिवसेनेत इनकमिंग सुरु आहे. त्यामुळे सावंत शिवसेनेत जाणार असल्याची चर्चा जिल्ह्यात रंगली आहे. तर दुसरीकडे माजी मुख्यमंत्री नारायण राणे दोन्ही मुलांसह येत्या 2 ऑक्टोबरला म्हणजे गांधी जयंतीच्या दिवशी भाजपत प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. नितेश राणे आज (1 ऑक्टोबर) दुपारी आपल्या आमदारकीचा राजीनामा देणार असल्याची माहिती (Nitesh Rane Tweet) सूत्रांनी दिली आहे. मात्र भाजप प्रवेशाबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *