25 वर्ष समाजकारणात घालवली, आता पुढचा प्लॅन ठरला : उदयनराजे

25 वर्ष समाजकारणात घालवली, आता गप्प बसणार, असं लोकसभा पोटनिवडणुकीतील निकालावर उदयनराजेंनी म्हटलं. तसेच, आपण हरल्यास पुढील 5 वर्षे साताऱ्याचा विकास थांबेल, असंही त्यांनी सांगितलं.

25 वर्ष समाजकारणात घालवली, आता पुढचा प्लॅन ठरला : उदयनराजे
Follow us
| Updated on: Oct 24, 2019 | 8:55 PM

सातारा : राज्यात आज (24 ऑक्टोबर) विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाले (Maharashtra Assembly Election Result). त्यासोबतच सातारा लोकसभा पोटनिवडणुकीचीही (Satara Loksabha Bypoll Result) मतमोजणी झाली. मात्र, या निवडणुकीत साताऱ्याच्या जनतेने छत्रपती उदयनराजे यांच्या विरोधात कल दिला आहे. पाच महिन्यांपूर्वी मोठ्या मताधिक्क्याने लोकसभा निवडणुकीत विजयी झालेल्या उदयराजेंना पोटनिवडणुकीत मोठा पराभव पत्करावा लागला. उदयनराजेंनी राष्ट्रवादीला सोडचिट्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला, त्यानंतर ही पोटनिवडणूक घेण्यात आली. मात्र, सातारा लोकसभा पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार श्रीनिवास पाटील यांनी उदयनराजेंचा पराभव केला. त्यामुळे उदयनराजेंना मोठा धक्का बसला.

मतमोजणीच्या सुरुवातीच्या टप्प्यापासून उदयनराजे पिछाडीवर होते. उदयनराजे सुरुवातीच्या काही फेऱ्यांमध्येच 30 हजार मतांनी पिछाडीवर होते. राजेंच्या पराभवामुळे समर्थकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.

25 वर्ष समाजकारणात घालवली, आता गप्प बसणार, असं लोकसभा पोटनिवडणुकीतील निकालावर भाजपचे नेते आणि सातारा लोकसभा पोटनिवडणुकीचे उमेदवार उदयनराजेंनी म्हटलं. तसेच, आपण हरल्यास पुढील 5 वर्षे साताऱ्याचा विकास थांबेल, असंही त्यांनी सांगितलं (Udayanraje Bhosale defeat). एक पाऊल मागे जाणं हे मोठी झेप घेण्यासाठी असतं. लोकांनी विचार करुन मतदान केलं. प्रचारात मी काय केलं हे स्पष्टपणे सांगितले आहे. मी जर निवडून आलो नाही, तर पुढील 5 वर्षे विकास थांबेल, असं उदयनराजे म्हणाले.

राजेंनी जनतेचा कौल मान्य केला आहे. मात्र, हा पराभव त्यांच्या जिव्हारी लागल्याचं दिसून आलं. ‘नागरिक हे लोकशाहीतले राजे आहेत, त्यांनी जो कौल दिला, तो इतर लोक कधीच स्वीकारु शकत नाहीत, मात्र मी तो स्विकारतो. आजपर्यंत ज्यांना केंद्रबिंदू मानून (शरद पवार) काम केलं, त्यांनी सांगितली तिच पूर्वदिशा मानली. मी चुकीचा निर्णय घेतला असेल, तर जास्तीत जास्त काय होणार, मी पराभूत होईल आणि ते मला मान्य आहे. पण माझं वैयक्तिक जीवनही आहे, 20-25 वर्ष मी समाजकारणात घालवली, निस्वार्थीपणे लोकांसाठी काम केलं. मात्र, याच्यापुढे गप्प बसणार, आणखी काय करु करतो’, अशी खंत यावेळी उदयराजे यांनी व्यक्त केली. यावेळी ते भावूक झाले होते.

गेल्या मेमध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत उदयनराजेंनी शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र पाटील यांचा पराभव केला होता. उदयनराजेंना 5 लाख 79 हजार 26 मतं, तर नरेंद्र पाटील यांना 4 लाख 52 हजार498 मतं मिळाली होती. उदयनराजे भोसले यांनी मागील 2014 च्या निवडणुकीत जवळपास साडेतीन लाख मतांनी विजय मिळवला होता. मात्र, यंदा त्यांची आघाडी निम्म्याने घटली. 2014 मध्ये उदयनराजे भोसले 3 लाख 66 हजार 594 मतांनी विजयी झाले होते. यंदा उदयनराजेंना इतकं लीड घेता आलं नाही. 2019 च्या निवडणुकीत राजेंनी 1,26,528 मतांनी विजय मिळवला होता.

साताऱ्यातून राष्ट्रवादीच्या तिकीटावर मिळवलेल्या खासदारकीचा राजीनामा देत उदयनराजे भोसले यांनी भाजपचा झेंडा हाती घेतला होता. त्यानंतर निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांसोबतच साताऱ्याच्या लोकसभा पोटनिवडणुकीचीही (Satara Loksabha Bypoll Result) घोषणा केली होती. राष्ट्रवादी काँग्रेसकडून माजी खासदार श्रीनिवास पाटील यांना साताऱ्यातून उमेदवारी देण्यात आली होती.

पाहा व्हिडीओ :

Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.