Sangli : चांदोली धरणामध्ये पाण्याची आवक सुरुच, विसर्ग दुपटीने वाढला, प्रशासनाचा काय आहे इशारा..?

शंकर देवकुळे

| Edited By: |

Updated on: Aug 25, 2022 | 5:33 PM

यंदा जुलै आणि ऑगस्ट महिन्यात पावसामध्ये सातत्य राहिल्याने सर्व चित्रच बदलून गेले आहे. राज्यातील मोठ्या धरणांमध्ये सरासरीऐवढा पाणीसाठा झाल्याने भविष्यातील पाणीटंचाईची समस्या ही दूर झाली आहे. मध्यंतरी चांदोली धरण क्षेत्रातही पावसाने उसंत घेतल्याने धरणाचे दरवाजे बंद कऱण्यात आले होते. मात्र, पुन्हा पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे धरणात 97 टक्के पाणीसाठा झाला आहे. वाढत्या पाण्याच्या आवकमुळे आता 2 हजार 573 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरु आहे.

Sangli : चांदोली धरणामध्ये पाण्याची आवक सुरुच, विसर्ग दुपटीने वाढला, प्रशासनाचा काय आहे इशारा..?
चांदोली धऱणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आहे.

सांगली :  (Dam Water Level) राज्यातील धरणामध्ये सरासरीएवढा पाणीसाठा झाला आहे. सध्या पावसाने उसंत घेतली असली तरी, सांगलीच्या (Chandoli Dam) चांदोली धरणामध्ये पाण्याची आवक ही सुरुच आहे. जिल्हाभरातील जलसाठ्यातील पाण्याची आवक धरणामध्ये सुरु आहे. शिवाय पाणलोट क्षेत्रात पावसाच्या सरी ह्या सुरुच आहेत. त्यामुळे पाण्याचा होत असलेला विसर्ग आता दुपटीने वाढवण्यात आला आहे. त्यामुळे नदीलगतच्या गावांना (Alert warning) सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. धरणाच्या जलाशय परिचलन सूची प्रमाणे पाणी पातळी नियंत्रित करण्याकरिता धरणातून सुरु असलेल्या विसर्गामध्ये वाढ करण्यात आली आहे. विद्युत गृहातून 1 हजार 573 क्युसेक आणि वक्रद्वार दरवाजा मधून 1 हजार क्युसेक असे एकूण 2 हजार 573 क्युसेक विसर्ग करण्यात आला आहॆ. पावसाची संतधार वाढल्यास या विसर्गात आणखी वाढ करण्यात येणार असल्याचे प्रशासनाच्यावतीने सांगण्यात आले आहे.

चांदोली धरण 97 टक्के भरले

यंदा जुलै आणि ऑगस्ट महिन्यात पावसामध्ये सातत्य राहिल्याने सर्व चित्रच बदलून गेले आहे. राज्यातील मोठ्या धरणांमध्ये सरासरीऐवढा पाणीसाठा झाल्याने भविष्यातील पाणीटंचाईची समस्या ही दूर झाली आहे. मध्यंतरी चांदोली धरण क्षेत्रातही पावसाने उसंत घेतल्याने धरणाचे दरवाजे बंद कऱण्यात आले होते. मात्र, पुन्हा पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे धरणात 97 टक्के पाणीसाठा झाला आहे. वाढत्या पाण्याच्या आवकमुळे आता 2 हजार 573 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरु आहे. धरणाच्या जलाशय परिचलन सूची प्रमाणे पाणी पातळी नियंत्रित करण्याकरिता प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. भविष्यात पाण्याचा विसर्ग आणखी वाढणार असा अंदाज आहे.

आतापर्यंतची स्थिती ?

राज्यातील लहान, मध्यम आणि मोठ्या धरणामध्ये सरासरीऐवढा पाणीसाठा झालेला आहे. चांदोली धरणाचीही अशीच अवस्था आहे. गतवर्षीपेक्षा यंदा हे धरण लवकर भरले आहे. यापूर्वीही धरणाचे दरवाजे हे खुले करण्यात आले होते पण मध्यंतरी पावासाने उघडीप दिल्याने पुन्हा पाण्याचा विसर्ग बंद करण्यात आला होता. मात्र, गेल्या चार दिवसांपासून धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस चालू आहे. त्यामुळे 2 हजार 573 क्युसेक विसर्ग करण्यात आला आहे. नदीकाठच्या गावाने सतर्क रहावे असा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे.

33. 34 टीएमसी पाणीसाठा

सध्या चांदोली धरणात 33.34 टीएमसी पाणीसाठा आहे. सरासरीच्या तुलनेत चांदोली धरणामध्ये 96.91 टक्के पाणीसाठा आहे. असे असून धरणामध्ये पाण्याची आवक ही सुरुच आहे. त्यामुळे भविष्यात आणखी पाण्याचा प्रवाह वाढू शकतो हे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे. यंदा ऑगस्टच्या मध्यपर्यंतच पावसाने एकूण सरासरी गाठली आहे. त्यामुळे आगामी काळात पावासामध्ये असेच सातत्य राहिले तर पिकांचे आणि इतर बाबींचेही नुकसान अटळ आहे.

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI