AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Onion Rate : कांदा दरासाठी आता आंदोलनाचा पवित्रा, शेतकरी उतरले रस्त्यावर

कांद्याच्या दरात चढ-उतार हा ठरलेलाच आहे पण तब्बल गेल्या अडीच महिन्यापासून कांदा दरात घसरण सुरु राहण्याची ही पहिलीच वेळ आहे. मार्च महिन्यापासून सुरु असलेली घसरण ही अजूनही सुरुच आहे. मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात कांद्याचे दर हे 3 हजार रुपये क्विंटल असे होते तर आता 2 ते 3 रुपये किलो असा दर मिळत आहे.

Onion Rate : कांदा दरासाठी आता आंदोलनाचा पवित्रा, शेतकरी उतरले रस्त्यावर
| Edited By: | Updated on: May 24, 2022 | 12:55 PM
Share

मालेगाव :  (Onion Rate) कांद्याच्या घटत्या दराला घेऊन राज्यभर वेगवेगळ्या पध्दतीने निषेध व्यक्त केला जात आहे. काही ठिकाणी फुकटात कांदा वाटला जात आहे तर काही ठिकाणी कांदा जनवरांच्या दावणीला टाकला जात आहे. असे असतानाही (Government) सरकार कांदा दराला घेऊन गंभीर नाही. त्यामुळे न्याय, हक्कासाठी (Nashik Farmer) नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यातील नामपूर बाजार समितीच्या बाहेर कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी रास्तारोको केला होता. कांद्याचे उत्पादन दिवसेंदिवस वाढत असून कांद्याला किमान दर ठरवून देण्यात आला तरच शेतकऱ्यांचे नुकसान टळणार आहे. तर सध्याच्या परस्थितीमुळे शेतकऱ्यांनी हताश न होता प्रशासनाला जेरीस आणणे गरजेचे असल्याचा सूर आंदोलना दरम्यान उमटला गेला.

कांदा दरात घसरण सुरुच

कांद्याच्या दरात चढ-उतार हा ठरलेलाच आहे पण तब्बल गेल्या अडीच महिन्यापासून कांदा दरात घसरण सुरु राहण्याची ही पहिलीच वेळ आहे. मार्च महिन्यापासून सुरु असलेली घसरण ही अजूनही सुरुच आहे. मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात कांद्याचे दर हे 3 हजार रुपये क्विंटल असे होते तर आता 2 ते 3 रुपये किलो असा दर मिळत आहे. कांदा हे नगदी पीक असून यामधून उत्पादन वाढावे हाच उद्देश शेतकऱ्यांचा राहिलेला आहे. मात्र, सरकारची धोरणे आणि वाढलेल्या आवकचा पिरणाम हा कायम कांदा दरावर राहिलेला आहे.

सटाणा तालुक्यात शेतकरी संघटनेचे आंदोलन

शेतकरी संघटनेच्या वतीने सटाणा तालुक्यात दोन ठिकाणी रास्तारोको करण्यात आला होता. ज्या बाजार समितीमध्ये कांद्याचे लिलाव होतात त्या ठिकाणी रास्तारोको करुन सरकारच्या धोरणाविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. तर कांद्याला किमान आधारभूत दर ठरवून देण्याची मागणी यावेळी शेतकऱ्यांनी केली. तर दुसरीकडे नामपूर-तहाराबाद रस्त्यावर शेतकऱ्यांनी आंदोलन केले. रास्तारोकोमुळे सकाळच्या प्रहरी रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. घटत्या दराबद्दल सरकारकडून कोणतीच भूमिका घेतली जात नसल्याने शेतकरी त्रस्त आहे.

उत्पन्न लांबच उत्पादनावरच खर्च अधिक

कांदा हे नगदी पीक असल्याने लागवडीच्या क्षेत्रात वाढ होत आहे. नुकसानीचा विचार न करता कांद्याचे उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या केवळ नाशिक जिल्ह्यातच नव्हे तर राज्यात वाढत आहे. मात्र, योग्य असा दर मिळत नसल्याने नुकसान हे ठरलेलेच आहे. दराच्या बाबतीत हे पीक लहरी असले तरी अधिकतर वेळी शेतकऱ्यांचेच नुकसान झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे शेतकरी आणि शेतकरी संघटना रस्त्यावर उतरुन आंदोलन करीत आहेत.

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.