AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PM किसान योजनेत वयाचं बंधन आहे का? जाणून घ्या संपूर्ण नियम

तुमचं वय १८ वर्ष पूर्ण आहे का? मग तुम्ही 'प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना'साठी पात्र असू शकता. पण थांबा! वय पूर्ण झालं म्हणून लगेचच अर्ज करता येईल असं नाही. तर या संबंधित योजनेची संपूर्ण माहिती आणि नियम समजून घ्या आणि मगच अर्ज करा

PM किसान योजनेत वयाचं बंधन आहे का? जाणून घ्या संपूर्ण नियम
pm kisan
| Edited By: | Updated on: May 02, 2025 | 11:14 PM
Share

केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी सुरू केलेली ‘प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना’ (PM-Kisan) देशभरातील लाखो शेतकऱ्यांसाठी एक मोठा आधार बनली आहे. या योजनेतून पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात दरवर्षी ६००० रुपये दिले जातात. शेतीतून मर्यादित उत्पन्न असलेल्या लहान शेतकऱ्यांसाठी हा आर्थिक हातभार खूप महत्त्वाचा ठरतो. मात्र, या योजनेसाठी अर्ज करताना वयाशी संबंधित काही नियम आहेत का, हे जाणून घेणे गरजेचे आहे.

किमान १८ वर्ष पूर्ण असणं बंधनकारक

या योजनेचा लाभ घ्यायचा असल्यास अर्ज करणाऱ्या व्यक्तीचं वय किमान १८ वर्ष पूर्ण असलेलं असणं बंधनकारक आहे. जर एखादं व्यक्ती १८ वर्षांखालील असेल, तर त्याला या योजनेचा फायदा घेता येणार नाही. त्यामुळे किशोरवयीन किंवा अल्पवयीन व्यक्ती थेट अर्ज करू शकत नाहीत.

या योजनेत अजून एक दिलासादायक गोष्ट म्हणजे, कमाल वयोमर्यादा ठरवलेली नाही. म्हणजेच, १८ वर्ष पूर्ण झाल्यावर वय कितीही वाढलं असलं, तरीही शेतकरी या योजनेसाठी अर्ज करू शकतो. ६०, ७० किंवा ८० वर्षांचं वय असलेले शेतकरीही, जर इतर अटी पूर्ण करत असतील, तर लाभ घेऊ शकतात.

स्वतःची शेतीजमीन असणं आवश्यक

वयाची अट पूर्ण झाली तरी फक्त यावरच समाधान मानता येणार नाही. या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही इतर अटीही आहेत. अर्जदाराच्या नावावर स्वतःची शेतीयोग्य जमीन असणं आवश्यक आहे. जर जमीन नावावर नसेल, तर योजनेचा फायदा मिळणार नाही.

त्याचबरोबर, काही गटांतील शेतकरी या योजनेसाठी अपात्र ठरवले आहेत. सरकारी नोकरीत असलेले, आयकर भरणारे, ₹१०,००० पेक्षा जास्त पेन्शन घेणारे, डॉक्टर, वकील, इंजिनिअर, सीए यासारख्या व्यावसायिक पदांवर कार्यरत असलेले आणि घटनात्मक पदांवर काम केलेले व्यक्ती या योजनेतून वगळले गेले आहेत. भाडेतत्त्वावर शेती करणाऱ्यांनाही या योजनेचा लाभ मिळत नाही.

तर तुम्ही नक्कीच पीएम-किसान योजनेचा लाभ घेऊ शकता

म्हणून जर तुम्ही स्वतःची शेती करत असाल, वय १८ वर्षांपेक्षा जास्त असेल आणि वर नमूद केलेल्या अटींमध्ये बसत नसाल, तर तुम्ही नक्कीच पीएम-किसान योजनेचा लाभ घेऊ शकता. आवश्यक कागदपत्रांसह अर्ज करा आणि सरकारकडून मिळणाऱ्या आर्थिक मदतीचा फायदा घ्या.

आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा.
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला.
सभागृहात आमच्या खुर्च्याखाली काळाबॉक्स कशासाठी? परबांची तुफान टोलेबाजी
सभागृहात आमच्या खुर्च्याखाली काळाबॉक्स कशासाठी? परबांची तुफान टोलेबाजी.
शरद पवारांना भारतरत्न द्या, मागणी होताच गोपीचंद पडळकरांनी उडवली खिल्ली
शरद पवारांना भारतरत्न द्या, मागणी होताच गोपीचंद पडळकरांनी उडवली खिल्ली.
गुलाम, गांडूळ बोलून तोंडाची वाफ...शंभूराज देसाईंचा ठाकरेंना खोचक टोला
गुलाम, गांडूळ बोलून तोंडाची वाफ...शंभूराज देसाईंचा ठाकरेंना खोचक टोला.
शिंदे सेना नाही थेट शिवसेना बोलायच, भर सभागृहात बड्या मंत्र्याचा संताप
शिंदे सेना नाही थेट शिवसेना बोलायच, भर सभागृहात बड्या मंत्र्याचा संताप.
गुलाम म्हणत ठाकरेंची नाव न घेता शिंदेंवर टीका...शिवसेनेकडूनही पटलवार
गुलाम म्हणत ठाकरेंची नाव न घेता शिंदेंवर टीका...शिवसेनेकडूनही पटलवार.
लोकलनं उद्या प्रवास करताय? तिन्ही रेल्वे मार्गावर कसा असणार मेगाब्लॉक?
लोकलनं उद्या प्रवास करताय? तिन्ही रेल्वे मार्गावर कसा असणार मेगाब्लॉक?.
राऊतांनी सत्ताधाऱ्यांची काढली लाज, विरोधी पक्षनेतेपदावरून घणाघाती टीका
राऊतांनी सत्ताधाऱ्यांची काढली लाज, विरोधी पक्षनेतेपदावरून घणाघाती टीका.
पुढच्या आठवड्यात पालिकेची निवडणूक?अनौपचारिक गप्पा, दादांनी काय म्हटलं?
पुढच्या आठवड्यात पालिकेची निवडणूक?अनौपचारिक गप्पा, दादांनी काय म्हटलं?.