PM kisan Yojna : ‘ई-केवायसी’ बाबत उदासिनता कायम, आता उरले 19 दिवस, अन्यथा लाभापासून वंचित..!

'ई-केवायसी'ची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आतापर्यंत दोन वेळा मुदतवाढ करण्यात आली आहे. तसेच आता यापुढे मुदतवाढ नसणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी उर्वरीत 20 दिवसांमध्येच ही प्रक्रिया पूर्ण केली तरच भविष्यात कायम आर्थिक मदत होणार आहे. योजनेतील अनियमितता टाळण्यासाठी सरकारने ही प्रक्रिया राबवली आहे.

PM kisan Yojna : 'ई-केवायसी' बाबत उदासिनता कायम, आता उरले 19 दिवस, अन्यथा लाभापासून वंचित..!
पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना
Follow us
| Updated on: May 11, 2022 | 6:32 AM

उस्मानाबाद:  (e-KYC) ‘ई-केवायसी’ म्हणजेच शेतकऱ्यांना आपले (Bank Account) बॅंक खाते आधार क्रमांकाशी संलग्न करण्यासाठी आतापर्यंत अनेकवेळा मुतवाढ देण्यात आली आहे. मात्र, स्थानिक पातळीवर अजूनही शेतकऱ्यांमध्ये बाबत जनजागृती झालेली नाही. त्यामुळेच उस्मानाबाद जिल्ह्यात या (PM kisan Yojna) पीएम किसान योजनेचे 2 लाख 80 हजार 423 लाभार्थी असताना केवळ 84 हजार 220 लाभार्थ्यांनीच आपला आधार क्रमांक बॅंक खात्याशी लिंक केला आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी ही प्रक्रिया बंधनकारक असतानाही शेतकरी याकडे दुर्लक्ष करीत आहेत. योजनेचा 11 वा हप्ता केव्हाही शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होऊ शकतो. यासंबंधीची सर्व प्रक्रिया ही पूर्ण झाली असताना ‘ई-केवायसी’ केले नसल्याने अनेकांना 11 हप्ता जमा होतो की नाही याबाबत संभ्रमता आहे. शिवाय आता लाभार्थांकडे केवळ 20 दिवसाचा कालावधी शिल्लक आहे.

‘ई-केवायसी’ नाही केले तर काय?

पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी’ई-केवायसी’ करणे हे बंधनकारक राहणार आहे. अन्यथा लाभ मिळणार नसल्याचे केंद्र सरकारने यापूर्वीच स्पष्ट केले आहे. ‘ई-केवायसी’ ही प्रक्रिया स्वत: लाभार्थ्यांलाही करता येते शिवाय ग्राहक सेवा केंद्रावरही आधार क्रमांक सांगून प्रक्रिया पूर्ण करता येते. सेवा केंद्रावर बायोमेट्रिक पध्दतीने ‘ई-केवायसी’ करता येते. यासाठी लाभार्थ्याला 200 रुपये खर्च आहे.

31 मे शेवटची मुदत

‘ई-केवायसी’ची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आतापर्यंत दोन वेळा मुदतवाढ करण्यात आली आहे. तसेच आता यापुढे मुदतवाढ नसणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी उर्वरीत 20 दिवसांमध्येच ही प्रक्रिया पूर्ण केली तरच भविष्यात कायम आर्थिक मदत होणार आहे. योजनेतील अनियमितता टाळण्यासाठी सरकारने ही प्रक्रिया राबवली आहे. गेल्या काही वर्षामध्ये जे पात्र नाहीत अशा नागरिकांनीही योजनेचा लाभ घेतला आहे. ही बाब निदर्शनास आल्यावर ‘ई-केवायसी’ ला सुरवात करण्यात आली आहे. मात्र, शेतकरी अजूनही याबाबत गंभीर नाहीत.

हे सुद्धा वाचा

असे करा मोबाईलवरुन ‘ई-केवायसी’

मोबाईलच्या माध्यमातून ई-केवायसी करण्यासाठी प्रथम Google वरुन krushukranti.com या वेबसाईटवर जावे लागणार आहे. यामध्ये सर्वात शेवटी pmkisan Yojna आणि e-KYC असे दोन पर्याय आहेत. त्यापैकी E-KYC हा पर्याय निवडायचा आहे. यामध्ये pmkisan Yojna असा आशयाचे पेज ओपन होईल यामध्ये तुम्हाला तुमचा आधार क्रमांक टाकायचा आहे. त्यानंतर तुमच्या उजव्या बाजूच्या Image मधील अक्षरे रिकाम्या जागी भरायची आहेत. त्यांनतर सर्च करायचे आहे . यामध्ये तुम्हाला अणखीन एक पेज ओपन होईल यामध्ये तुम्हाला तुमचा मोबाईल क्रमांक टाकायचा आहे. यानंतर Get OTP यावर क्लिक करायचे आहे. त्यानंतर तुमच्या मोबाईलवर 4 अंकी OTP नंबर येईल. तो OTP या बॉक्समध्ये टाकायचा आहे.त्यानंतर Submit For Auth यावर क्लिक करायचे आहे. त्यानंतर वरती e-KYC is Success असा SMS येईल.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.