दिवसाकाठी 150 रुपयांनी सोयाबीनच्या दरात वाढ, चार दिवसांपासून सातत्य

एक नाही...दोन नाही तर सलग चार दिवसांपासून सोयाबीनच्या दरात वाढ होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळत आहे. दिवाळीनंतर सोयाबीने मार्केटमध्ये मोठा बदल झाला असून दिवसेंदिवस दरात सुधारणा होत आहे. त्यामुळे उत्पादनात घट झाली असली तरी आता वाढीव दरामुळे शेतकऱ्यांना मोठा आधार मिळत आहे.

दिवसाकाठी 150 रुपयांनी सोयाबीनच्या दरात वाढ, चार दिवसांपासून सातत्य
संग्रहीत छायाचित्र
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: राजेंद्र खराडे

Nov 18, 2021 | 6:46 PM

लातूर : एक नाही…दोन नाही तर सलग चार दिवसांपासून सोयाबीनच्या दरात वाढ होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळत आहे. दिवाळीनंतर सोयाबीने मार्केटमध्ये मोठा बदल झाला असून दिवसेंदिवस दरात सुधारणा होत आहे. त्यामुळे उत्पादनात घट झाली असली तरी आता वाढीव दरामुळे शेतकऱ्यांना मोठा आधार मिळत आहे. लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गेल्या चार दिवसांमध्ये सोयाबीनच्या दरात 600 रुपयांनी वाढ झाली आहे.

सोयाबीनच्या दरात एवढ्या झपाट्याने बदल होतील अशी अपेक्षा शेतकऱ्यांनाच काय पण व्यापाऱ्यांना देखील नव्हती. मात्र, मर्यादित आवक होत असल्याने दर हे टिकून आहेत. लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मराठवाड्यातील उस्मानाबाद, नांदेड, बीड, अंबाजोगाई या भागातून सोयाबीनची आवक होत असते. यंदा मात्र, हंगामाच्या सुरवातीपासूनच आवक ही मर्यादित राहिलेली आहे. त्यामुळे अशीच आवक राहिली तर सोयाबीनच्या दराच वाढ होतच राहणार आहे.

4500 रुपयांवरील सोयाबीन 6200 रुपायांवर

दिवाळीपूर्वी सोयाबीनच्या दरात कमालीची घट झाली होती. त्यामुळे भविष्यातही सोयाबीनच्या दरात घट होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र, प्रक्रिया उद्योजकांकडून सोयाबीनची मागणी वाढल्याने दरात चांगली सुधारणा होत आहे. गेल्या चार दिवसामध्ये दरात 600 रुपयांची वाढ झाली आहे. शिवाय दुसरीकडे आवकही मर्यादीत होत असल्याने असेच दर वाढत राहतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे. शेतकऱ्यांनी वाढीव दराच्या अपेक्षेनेच सोयाबीनची साठवणूक केली होती. शेतकऱ्यांचा अंदाज खरा ठरला असून सोयाबीन 6 हजाराच्या पार गेले आहे.

उडदाचे दर मात्र स्थिरच

हंगामाच्या सुरवातीपासून उडीद या एकमेव खरीप हंगामातील पिकाचे दर हे स्थिर राहिलेले आहेत. आजही उडदाला लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 7250 प्रति क्विंटलचा दर आहे. यंदाच्या हंगामात केवळ उडदाने शेतकऱ्यांना साथ दिली होती. हंगामाच्या सुरवातीला उडदाची आवक होती. आता आवक कमी झाली असून सोयाबीनची आवक वाढेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. अतिवृष्टी होण्यापूर्वीच उडदाची काढणी झाली होती. त्यामुळे उडदाच्या दर्जावर काही परिणाम न झाल्यामुळेच दर हे टिकून राहिलेले आहेत.

इतर शेतीमालाचे कसे आहेत दर

लातूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दुपारी 12 च्या दरम्यान शेतीमालाचे सौदे होतात. गुरुवारी लाल तूर- 5831 रुपये क्विंटल, पांढरी तूर 5800 रुपये क्विंटल, पिंकू तूर 5675 रुपये क्विंटल, जानकी चना 4900 रुपये क्विंटल, विजय चणा 4900, चना मिल 4750, सोयाबीन 6210, चमकी मूग 7400, मिल मूग 6250 तर उडीदाचा दर 7250 एवढा राहिला होता.

संबंधित बातम्या :

निलंग्यात राज्य सरकारची प्रतिकात्मक प्रेतयात्रा अन् दहाव्या दिवशीही होणार दहाव्याचा विधी 

तयारी आगामी खरीप हंगामाची, कसे केले जाते बीजोत्पादन?

पोल्ट्री ब्रीडर्सच्या भूमिकेवरुन रणकंदन, तर चिकन आयातीची परवानगी द्या : पाशा पटेल

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें