Yawatmal : बैलपोळा झाला आता तान्हा पोळ्याने वेधले लक्ष, काय आहे विदर्भातील अनोखी परंपरा?

यवतमाळ जिल्ह्यात आज नव्हे तर गेल्या 24 वर्षापासून ही पोळा पद्धत आहे. प्रत्येक गावच्या शिवारात या तान्हा पोळ्याचे आयोजन केले जाते. किन्ही गावात यंदा जवळपास 1 किलोमिटर अंतरावर हा सोहळा रंगला होता. बळीराजाचा खरा सखा हा बैलच आहे. बैलाचे महत्व लहान मुलांच्या देखील लक्षात यावे याअनुशंगाने वेगवेगळ्या स्पर्धांचे आयोजन केले जाते.

Yawatmal : बैलपोळा झाला आता तान्हा पोळ्याने वेधले लक्ष, काय आहे विदर्भातील अनोखी परंपरा?
यवतमाळ जिल्ह्यातील किन्ही गावचा तान्हा पोळा
विवेक गावंडे

| Edited By: राजेंद्र खराडे

Aug 27, 2022 | 3:02 PM

यवतमाळ : यंदा प्रतिकूल परस्थितीमध्येही राज्यात (Bail Pola) बैलपोळा मोठ्या उत्साहात पार पडला. दोन वर्ष कोरोनाचे सावट आणि यंदा नैसर्गिक संकट असतानाही शेतकऱ्यांनी बैलपोळ्याची परंपरा जोपासत हा सण साजरा केला. विदर्भात बैलपोळ्याच्या दुसऱ्या दिवशी साजरा होणारा तान्हा पोळा हा लक्षवेधी असतो. (Vidarbha) यवतमाळ जिल्ह्यातील गावागावात ही परंपरा जोपासली जात आहे. (Tanha Pola) तान्हा पोळ्याच्या निमित्ताने किन्ही गावात वेगवेगळ्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये चिमुकल्यांनी सहभाग नोंदवून आपल्या कलेचे दर्शन घडवले. यंदा स्पर्धा होती ती, मातीच्या बैलाची सजावट करुन सादरीकरण करण्याची. सकाळी सात वाजल्यापासून लहान मुले ही स्पर्धेच्या ठिकाणी विविध प्रकराच्या वेषभूषेत सहभागी झाले होते.

तान्हा पोळाचा काय आहे महत्व?

यवतमाळ जिल्ह्यात आज नव्हे तर गेल्या 24 वर्षापासून ही पोळा पद्धत आहे. प्रत्येक गावच्या शिवारात या तान्हा पोळ्याचे आयोजन केले जाते. किन्ही गावात यंदा जवळपास 1 किलोमिटर अंतरावर हा सोहळा रंगला होता. बळीराजाचा खरा सखा हा बैलच आहे. बैलाचे महत्व लहान मुलांच्या देखील लक्षात यावे याअनुशंगाने वेगवेगळ्या स्पर्धांचे आयोजन केले जाते. यंदा लहान चिमुकल्यांनी मातीचे बैल तयार करुन त्याची रंगरंगोटी करण्याची स्पर्धा होती. लहान मुलांमध्येही शेती आणि बैलजोडीची माहिती मिळावी म्हणून अशा प्रकारच्या स्पर्धा गेली 24 वर्षापासून सुरु आहेत.

कोरोनामुळे परंपरा खंडीत

पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी विदर्भात तान्हा पोळ्याची परंपरा आहे. यवतमाळ जिल्ह्यात गेल्या 24 वर्षापासून ही परंपरा जोपासली जात आहे. यामधून बैलाचे आणि शेती व्यवसयाचे महत्व अधिरोखित केले जाते. शिवाय लहान मुलांना या विषयीची माहिती दिली जाते. दिवस उगवताच गावातून सवाद्यसह फेरी काढली जाते आणि एका विशिष्ट ठिकाणी स्पर्धांचे आयोजन केले जाते. मात्र, गेली दोन वर्ष कोरोनामुले या परंपरेला खंड पडला होता. सलग दोन वर्ष तान्हा पोळा ही परंपराच खंडीत झाली होती. त्यामुळे यंदा मोठ्या उत्साहात कार्यक्रम राबवण्यात आल्याचे किन्हीचे पोळा समिती अध्यक्ष कृष्णा माघाडे यांनी सांगितले आहे.

हे सुद्धा वाचा

नागरिकांची गर्दी अन् चिमुकल्यांचा गौरव

तान्हा पोळा यासाठी किन्ही गावचे सर्व ग्रामस्थ उपस्थित होते. शिवाय अनेकांनी पोळा आणि शेती व्यवसाय याबद्दल माहिती सांगितली. यानंतर मात्र, आकर्षक बैलांचे निरीक्षण करून पाच स्पर्धकांना सरपंच, उपसरपंच यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. बळीराजाचा खरा सोबती असलेल्या बैलाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस पोळा असतो त्याच पध्दतीने लहान मुलांमध्ये सुद्धा हे संस्कार बिंबावे म्हणून गावोगावी चिमुकल्याच्या तान्हा पोळ्याचे आयोजन केले जाते.

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें