स्कुटी 15 हजारांची, चालान 23 हजारांचं फाडलं, पोलिसांनी गाडी जप्त केली

1 सप्टेंबरपासून वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांकडून 10 पट अधिक दंड आकारला जाणार आहे (Motor Vehicle Act) . या नियमाचा फटका राजधानी दिल्लीच्या एका व्यक्तीला बसला आहे. या व्यक्तीवर त्याच्या गाडीपेक्षा जास्त किमतीचं चालान झालं आहे.

स्कुटी 15 हजारांची, चालान 23 हजारांचं फाडलं, पोलिसांनी गाडी जप्त केली
Follow us
| Updated on: Sep 03, 2019 | 11:28 PM

नवी दिल्ली : वाहतुकीचे नियम मोडणे किती मगाहात पडू शकतं, याचं एक उदाहरण नुकतंच पाहायला मिळालं. गेल्या 1 सप्टेंबरपासून ( 1 September Rule Change) वाहतुकीच्या नियमांमध्ये बदल करण्यात आले आहेत. या नव्या बदलानुसार, आता वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांकडून 10 पट अधिक दंड आकारला जाईल (Motor Vehicle Act) . या नियमाचा फटका राजधानी दिल्लीच्या एका व्यक्तीला बसला आहे. या व्यक्तीवर त्याच्या गाडीपेक्षा जास्त किमतीचं चालान झालं आहे.

दिल्लीच्या एका व्यक्तीच्या स्कुटीवर गुडगावमध्ये 23 हजार रुपयांचं चालान फाडण्यात आलं आहे (Gurgaon poliec fines Delhi man). ही व्यक्ती दिल्लीच्या गीता कॉलोनी परिसरात राहते. तर हा दंड गुडगाव जिल्हा न्यायालयाजवळ लावण्यात आला. या व्यक्तीच्या मते, त्याच्या स्कुटीची किंमत 15 हजार रुपये आहे (Fine is more than the actual price of vehicle).

ज्या व्यक्तीचं चालान झालं त्याचं नाव दिनेश मदान असल्याचं सांगितलं जात आहे . दिनेश हे गीता कॉलोनी परिसरात राहतात. दिनेश यांच्यामते, त्यांच्याजवळ गाडीचे कागदपत्र नव्हते (Fine for violating Traffic rules). त्यांनी पोलिसांना सांगितलं की, ते घरुन कागदपत्र मागवत आहेत. मात्र, पोलिसांनी काहीही ऐकलं नाही आणि त्यांचं चालान फाडलं . तेव्हा दिनेश यांच्याजवळ 23 हजार रुपये नव्हते, त्यामुळे त्यांनी हे चालान भरलं नाही आणि पोलिसांनी त्यांची गाडी जप्त केली. त्यानंतर हे प्रकरण थेट न्यायालयात जाऊन पोहोचलं.

स्कुटीची किंमत 15 हजार आणि चालान 23 हजारांचं

दिनेशच्या स्कुटीचं 23 हजारांचं चालान फाडण्यात आलं. पण, त्यांच्या स्कुटीची किंमत ही चालानपेक्षा कमी म्हणजेच 15 हजार आहे. म्हणून ते चालान भरणार नाही, असं दिनेश यांनी सांगितलं. आता 15 हजारांच्या स्कुटीसाठी 23 हजार भरावे की, नवी स्कुटी विकत घ्यावी हा प्रश्न दिनेश यांच्यासमोर आहे.

दिनेशने कुठल्या नियमांचं उल्लंघन केलं आणि त्यासाठी पोलिसांनी कितीचं चालान फाडलं?

  • विना लायसेंस : 5 हजार
  • विना आरसी बुक : 5 हजार
  • विना विमा : 2 हजार
  • प्रदूषण : 10 हजार
  • विना हेल्मेट : 1 हजार

संबंधित बातम्या :

… म्हणून या राज्यात अजून नव्या वाहतूक नियमांची अंमलबजावणी नाही

लायसन्सशिवाय गाडी चालवल्यास दहापट दंड, एक सप्टेंबरपासून वाहतुकीचे 17 नियम अधिक कडक

तुमच्या दैनंदिन जीवनात 1 सप्टेंबरपासून ‘हे’ नऊ बदल होणार

Non Stop LIVE Update
बारामतीत मतदानाच्या आदल्या रात्री..अमोल कोल्हेंचं निवडणूक आयोगाला पत्र
बारामतीत मतदानाच्या आदल्या रात्री..अमोल कोल्हेंचं निवडणूक आयोगाला पत्र.
तर धनुष्यबाणावर विरोधात निवडणूक लढवणार, किरण सामंत यांचा इशारा कुणाला?
तर धनुष्यबाणावर विरोधात निवडणूक लढवणार, किरण सामंत यांचा इशारा कुणाला?.
ठाकरेंवर मानसिक परिणाम, त्यांना.., भाजपच्या बड्या नेत्याचा हल्लाबोल
ठाकरेंवर मानसिक परिणाम, त्यांना.., भाजपच्या बड्या नेत्याचा हल्लाबोल.
लोकसभा निवडणुकीत केजरीवालांना दिलासा, तिहार तुरुंगातून येणार बाहेर
लोकसभा निवडणुकीत केजरीवालांना दिलासा, तिहार तुरुंगातून येणार बाहेर.
मोदींच्या ऑफरवर शरद पवारांचं उत्तर, म्हणाले, ... हे माझं स्पष्ट मत
मोदींच्या ऑफरवर शरद पवारांचं उत्तर, म्हणाले, ... हे माझं स्पष्ट मत.
सगळी स्वप्न पूर्ण होतील, फक्त... मोदींची ठाकरे-पवारांना भर सभेतून ऑफर
सगळी स्वप्न पूर्ण होतील, फक्त... मोदींची ठाकरे-पवारांना भर सभेतून ऑफर.
... तर तुम्हीच औरंगजेबाचे वंशज, संजय राऊतांची मोदींवर घणाघाती टीका
... तर तुम्हीच औरंगजेबाचे वंशज, संजय राऊतांची मोदींवर घणाघाती टीका.
प्रियंका चतुर्वेदींनी केलेल्या 'त्या' टीकेवर मुख्यमंत्री म्हणाले.....
प्रियंका चतुर्वेदींनी केलेल्या 'त्या' टीकेवर मुख्यमंत्री म्हणाले......
नकली संतान... मोदींच्या टीकेवर ठाकरे म्हणाले, बेअकली माणसा तेव्हा लाज
नकली संतान... मोदींच्या टीकेवर ठाकरे म्हणाले, बेअकली माणसा तेव्हा लाज.
ब्रेक घेतोय... कोल्हेंचा 5 वर्ष अभिनयातून संन्यास, का घेतला निर्णय?
ब्रेक घेतोय... कोल्हेंचा 5 वर्ष अभिनयातून संन्यास, का घेतला निर्णय?.