ऑटो इंडस्ट्रीने दिवाळीत गियर बदलला, नोव्हेंबर महिन्यात वाहनांची रेकॉर्डब्रेक विक्री

भारतात कार्स आणि एसयूव्हींच्या घाऊक विक्रीत नोव्हेंबर महिन्यात 12.73 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

ऑटो इंडस्ट्रीने दिवाळीत गियर बदलला, नोव्हेंबर महिन्यात वाहनांची रेकॉर्डब्रेक विक्री
Follow us
| Updated on: Dec 12, 2020 | 11:41 PM

मुंबई : कोरोनाच्या महामारीच्या संकटामुळे जगभरातील सर्वच देशांच्या अर्थव्यवस्थेला, बहुतांश उद्योगधंद्यांना अब्जावधी डॉलर्सचा फटका बसला आहे. कोरोनोमुळे अनेक देशांमध्ये लॉकडाऊन घोषित करण्यात आला. भारतातही मार्च महिन्यापासून लॉकडाऊन घोषित करण्यात आला होता. या काळात देशातील उद्योगधंदे बंद होते. वाहन उद्योगालाही कोरोनाचा मोठा फटका बसला. जून-जुलै महिन्यात देशात अनलॉकची प्रक्रिया सुरु करण्यात आली, त्यानंतर देशातील उद्योगधंदे हळूहळू रुळावर येत होते. उद्योगधंदे पूर्वपदावर येण्यासाठी दिवाळी या सणाने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. नोव्हेंबर महिन्यातील वाहनांच्यी विक्रीबाबतची आकडेवारी पाहता दिवाळीने ऑटो इंडस्ट्रीला तारलं, असं म्हणावं लागेल. (Diwali Festive Season Cars, SUV and Bike market on high with recordbreak sale)

अनलॉकची प्रक्रिया सुरु केल्यानंतर देशातील विविध उद्योगधंदे काहीशा प्रमाणात सुरु झाले होते, परंतु लोकांचं मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाल्याने बाजारांमधील सर्व प्रकारचे व्यवहार थंड होते. सर्व प्रकारच्या उद्योगधंद्यांची मदार केवळ दिवाळीवर होती. कारण भारतात, दिवाळीच्या मुहूर्तावर लोक मोठ्या प्रमाणात खरेदी करतात. उद्योजक, व्यावसायिक आणि कंपन्यांच्या अपेक्षेप्रमाणे दिवाळीत बाजारात खेळता पैसा पाहायला मिळाला. दिवाळीच्या मुहूर्तावह वाहन उद्योगानेही (ऑटो इंडस्ट्रीने) गियर बदलल्याचे यंदा पाहायला मिळाले. कोरोनामुळे वाहन उद्योगाला आलेली मरगळ दिवाळीने हटवली आहे.

दिवाळीच्या मुहूर्तावर वाहनांच्या झालेल्या विक्रीबाबतची आकडेवारी नुकतीच समोर आली आहे. सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्सने (SIAM) देशात नोव्हेंबर महिन्यात झालेल्या वाहनांच्या विक्रीबाबतची माहिती सादर केली आहे. SIAM ने म्हटलं आहे की, घरगुती प्रवासी वाहनांच्या घाऊक विक्रीत नोव्हेंबर महिन्यात 12.73 टक्क्यांनी वाढ झाली आहे. यंदाच्या नोव्हेंबर महिन्यात भारतात 2 लाख 85 हजार 367 प्रवासी वाहनांची विक्री झाली आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात 2 लाख 53 हजार 139 प्रवासी वाहनांची विक्री झाली होती. (Huge growth in passenger and two-wheeler vehicles sales even during the Corona crisis)

या आकड्यांमध्ये टाटा मोटर्सच्या विक्रीबाबतच्या माहितीचा समावेश करण्यात आलेला नाही. टाटा मोटर्स कंपनी त्यांच्या वाहनांच्या विक्रीबाबतची माहिती सियामला देत नाही. टाटा कंपनी वाहनांच्या विक्रीबाबतची माहिती केवळ शेअर बाजाराला देते. त्यामुळे वरील आकड्यांमध्ये टाटा मोटर्सच्या वाहनांचा समावेश केला तर यंदाच्या नोव्हेंबर महिन्यात वाहनांच्या विक्रीत झालेली वाढ ही 17 टक्क्यांवर जाईल. कारण टाटा मोटर्सने यंदा नोव्हेंबर महिन्यात खूप चांगला व्यवसाय केला आहे. टाटाच्या वाहनांच्या विक्रीत गेल्या वर्षीच्या तुलनेत तब्बल 21 टक्क्यांची वाढ झाली आहे.

प्रमुख कार कंपन्यांच्या विक्रीत झालेली वाढ

1. होंडाच्या विक्रीत 55 टक्क्यांची वाढ झाली आहे.

2. किया मोटर्सच्या कार्सच्या विक्रीत 50.1 टक्क्यांची वाढ झाली आहे.

3. टाटा मोटर्सच्या विक्रीत 21 टक्क्यांची वाढ झाली आहे.

4. ह्युंदायच्या विक्रीत 9.4 टक्क्यांची वाढ झाली आहे.

5. बजाज ऑटोच्या विक्रीत 5 टक्क्यांची वाढ झाली आहे.

6. महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीच्या गाड्यांच्यी विक्रीत 3.62 टक्क्यांची वाढ झाली आहे.

7. मारुती कार्सच्या विक्रीत 1.4 टक्क्यांची वाढ झाली आहे.

सियामने (Society Of Indian Automobile Manufacturers) दिलेल्या माहितीनुसार यंदा नोव्हेंबर महिन्यात दुचाकी वाहनांच्या विक्रीतही मोठी वाढ झाली आहे. सियामने याबाबतची आकडेवारी सादर केली आहे, त्यानुसार यंदा नोव्हेंबर महिन्यात तब्बल 16 लाख 379 दुचाकी वाहनांची विक्री झाली आहे. तर गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात 14 लाख 10 हजार 939 दुचाकी वाहनांची विक्री झाली होती. म्हणजेच दुचाकींच्या विक्रीत तब्बल 13.43 टक्क्यांची वाढ झाली आहे.

मोटारसायकल्सच्या विक्रीत 14.9 टक्क्यांची वाढ झाली आहे. यंदा नोव्हेंबर महिन्यात 10 लाख 26 हजार 705 मोटारसायकल्सची विक्री झाली आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात 8 लाख 73 हजार 726 मोटारसायकल्सची विक्री झाली होती. मोटारसायकलप्रमाणे स्कुटर्सच्या विक्रीतही वाढ झाली आहे. स्कूटर्सच्या विक्रीत यंदा 9.29 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात 4 लाख 59 हजार 851 स्कुटर्सची विक्री झाली होती, तर यंदाच्या नोव्हेंबर महिन्यात तब्बल 5 लाख 2 हजार 561 स्कुटर्सची विक्री झाली आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या

Alert! तुमच्या गाडीवर त्वरित हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट लावून घ्या, अन्यथा ‘ही’ कामे करता येणार नाहीत

Maruti Suzuki चा नवा विक्रम, ऑनलाईन चॅनेलच्या माध्यमातून दोन लाखांहून अधिक गाड्यांची विक्री

जुन्या गाडीच्या बदल्यात नवी गाडी घेऊन जा; सरकारकडून विशेष सूट

(Diwali Festive Season Cars, SUV and Bike market on high with recordbreak sale)

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.