Ford च्या ‘या’ कार्समध्ये आढळला दोष, कंपनीने 30 लाख गाड्या परत मागवल्या

अक्षय चोरगे

| Edited By: |

Updated on: Mar 14, 2021 | 6:42 AM

फोर्ड मोटर कंपनीने नुकतीच अमेरिकन बाजारपेठेतून 2.9 दशलक्ष (29 लाख) वाहने परत मागवण्याचा निर्णय घेतला आहे.

Ford च्या 'या' कार्समध्ये आढळला दोष, कंपनीने 30 लाख गाड्या परत मागवल्या
फोर्ड ग्राहकांना धक्का, कंपनी भारतीय मॅन्युफॅक्चरिंग ऑपरेशन्स संपुष्टात आणण्याच्या विचारात

वॉशिंग्टन डी. सी. : फोर्ड मोटर कंपनीने (Ford Motor Company) नुकतीच अमेरिकन बाजारपेठेतून 2.9 दशलक्ष (29 लाख) वाहने परत मागवण्याचा निर्णय घेतला आहे. याचे कारण ड्रायव्हर साइड Takata एअरबॅगमध्ये काही दोष आढळले आहेत. अमेरिकन रेग्यूलेटर्सनी जानेवारीत या रिकॉलची मागणी केली होती. अमेरिकेतील दुसर्‍या क्रमांकाच्या ऑटोमेकर कंपनीने (फोर्ड) जानेवारीत सांगितले होते की, ते राष्ट्रीय महामार्ग वाहतूक सुरक्षा प्रशासनाची रिकॉलबाबतची विनंती मान्य करत आहेत. या रिकॉलवर 610 मिलियन डॉलर्स इतका खर्च अपेक्षित आहे. (Ford motor issues recall order for 2.9 million car for airbag fault)

Takata एअरबॅगमधील दोष हेच रिकॉलमागचं सर्वात मोठं कारण आहे. ज्यामध्ये अनेक वाहन निर्माता कंपन्यांना 67 मिलियन युनिट परत मागवण्यास सांगण्यात आले आहे. यात फोर्ड, टोयोटा आणि होंडा ते मर्सिडीज बेंझ, निसान, बीएमडब्ल्यू यांसारख्ये अनेक दिग्गज वाहन कंपन्यांचा समावेश आहे आणि सर्वच एअरबॅग्समधील गडबडीमुळे कार परत मागवाव्या लागल्या आहेत.

सर्वात आधी एप्रिल 2018 मध्ये चीनच्या निंग्बो जॉयसन इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशनने Takata खरेदी केले आणि त्यास जॉयसन सेफ्टी सिस्टम असे नाव दिले. गेल्या काही वर्षांपासून त्यास सतत रिकॉल ऑर्डर दिली जात आहे. 2015 मध्येही, Takata एका सेटलमेंट क्लेमसाठी तयार झाली होती. परंतु या एअरबॅगच्या काही घटकांमुळे उष्णता आणि आर्द्रतेमुळे दोन वर्षानंतर या एअरबॅग्स फाटू लागल्या.

Kia ने 4 लाख वाहनं परत मागवली

Kia Moros ने अमेरिकेत सुमारे 4 लाख वाहने परत मागवली आहेत. संशयास्पद वाहनांमध्ये 2017 ते 2021 दरम्यान निर्मित स्पोर्ट एसयूव्ही आणि 2017 ते 2019 दरम्यान तयार केलेल्या कॅडेन्झा सेडानचा समावेश आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, यांच्या हायड्रॉलिक इलेक्ट्रॉनिक ब्रेक कंट्रोल युनिटमध्ये शॉर्ट सर्किट होऊन त्यामुळे आग लागू शकते. तथापि, अमेरिकेच्या नॅशनल हायवे ट्रॅफिक सेफ्टी अ‍ॅडमिनिस्ट्रेशनने माहिती दिली आहे की, आतापर्यंत कोणताही अपघात झाला नाही. दरम्यान, किआ आणि ह्युंदाय कारला 137 मिलियनचा दंड ठोठावण्यात आला आहे.

इतर बातम्या 

मोठी संधी ! 12 लाखांची Mahindra Scorpio आता फक्त 1.33 लाखामध्ये, जाणून घ्या काय आहे ऑफर?

Volvo India ची मोठी घोषणा, आता डिझेल कार बनवणार नाही

Ford EcoSport चं नवं वेरिएंट भारतात लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

(Ford motor issues recall order for 2.9 million car for airbag fault)

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI