जनरल मोटर्स भारतातील शेवटचा प्लांट बंद करुन चीनला 2000 कोटींना विकणार, कारण काय?

राज्याच्या तळेगाव (Talegaon) येथील प्लांटमध्ये जनरल मोटर्सने गुरुवारी उत्पादन बंद केलं आहे.

जनरल मोटर्स भारतातील शेवटचा प्लांट बंद करुन चीनला 2000 कोटींना विकणार, कारण काय?

मुंबई : भारत आणि चीनमध्ये (India-China Tension) वाढत्या तणावामुळे ऑटोमोबाईल कंपनी जनरल मोटर्स (General Motors) भारतातील आपला शेवटचा प्लांट बंद करणार आहे. जनरल मोटर्स महाराष्ट्रातील त्यांचा शेवटचा प्लांट चीनच्या सर्वात मोठ्या एसयुव्ही बनवणारी कंपनी ग्रेट वॉल मोटर्सला (Great Wall Motors) विकू इच्छिते. कंपनी ग्रेट वॉल मोटर्सला 2,000 कोटी रुपयांमध्ये विकेल. पण, सरकारने या कराराला अद्याप परवानगी दिलेली नाही (General Motors Will Shut Down Its Last Factory).

राज्याच्या तळेगाव (Talegaon) येथील प्लांटमध्ये जनरल मोटर्सने गुरुवारी उत्पादन बंद केलं आहे. हा करार पूर्ण होताच जनरल मोटर्सचं भारतातील ऑपरेशन पूर्णपणे बंद झालं आहे.

टाईम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टमुसार, तळेगाव येथील या प्लांटमध्ये जनरल मोटर्सने गुरुवारी उत्पादन बंद केलं आहे. कंपनीने 1996 मध्ये भारतात ऑपरेशन सुरु केलं होतं. हा करार पूर्ण होताच जनरल मोटर्सचं भारतातील उत्पादन पूर्णपणे बंद होईल.

तीन वर्षांपूर्वीच चीनला हा प्लांट विकला

यापूर्वी 2017 मध्ये जनरल मोटर्सने गुजरातच्या हलोलमध्ये असलेल्या दुसऱ्या प्लांटला चीनच्या SAIC ला विकलं होतं. सध्या या प्लांटला एमजी मोटर्सचा वापर करत आहेत. तळेगाव प्लांटमध्ये 1,800 पगारदार आणि तासाभराचे कर्मचारी काम करतात.

प्लांट का बंद करत आहेत?

तळेगाव प्लांटबाबत GM आणि ग्रेट वॉल यांच्यामध्ये कराराची घोषणा यावर्षी जानेवारीत झाली होती. या वर्षी हा करार होण्याची शक्यता होती. पण, जून महिन्यात गलवान खोऱ्यात झालेल्या सीमावादानंतर भारत सरकारने चीन आणि इतर शेजारील देशांमधून येणाऱ्या गुंतवणुकीबाबत कठोर नियम लागू केले होते. त्याशिवाय, महाराष्ट्र सरकारने जनरल मोटर्स-ग्रेट वॉल मोटर्ससह दोन अन्य पाच हजार रुपयांच्या करारावर बंदी लावली (General Motors Will Shut Down Its Last Factory).

कर्मचाऱ्यांना कधीपर्यंत पगार मिळणार?

जनरल मोटर्सने आपल्या शॉप फ्लोअर कर्मचाऱ्यांना सांगितलं की त्यांना 25 जानेवारीपर्यंत पगार मिळेल.

General Motors Will Shut Down Its Last Factory

संबंधित बातम्या :

15 हजार बुकिंग्सनंतर Nissan Magnite चा सर्वात कमी सर्विस कॉस्टचा दावा

सरकारचा मोठा निर्णय! वाहन चालकाच्या बाजूला बसणाऱ्या व्यक्तीसाठी लागू होणार ‘हे’ नियम…

शेतकऱ्यांना झटका; 1 जानेवारीपासून महिंद्राचे ट्रॅक्टर महागणार!

नव्या वर्षात महिंद्रा लाँच करणार पाच एसयूव्ही कार, जाणून घ्या सर्व फिचर्स

हे वाचलंत का? ‘या’ राज्यात CNG आणि LPG गाड्यांची किंमत वाढणार

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI