हे वाचलंत का? ‘या’ राज्यात CNG आणि LPG गाड्यांची किंमत वाढणार

शेजारच्या राज्यांमध्ये वाहनांच्या नोंदणीवर आकारण्यात येणाऱ्या प्रोसेसिंग फीच्या निर्णयाचे पंजाब सरकारकडून अनुकरण करण्यात आले आहे. | processing fees for registration of new vehicles

हे वाचलंत का? 'या' राज्यात CNG आणि LPG गाड्यांची किंमत वाढणार

चंदीगड: आगामी काळात पंजाबमध्ये CNG आणि LPG गाड्यांच्या किंमती वाढणार आहेत. पंजाबच्या मंत्रिमंडळाने (Punjab Cabinet) नुकताच एक महत्त्वाचा निर्णय घेतला. त्यानुसार गाड्यांच्या नव्या मॉडेल्सच्या नोंदणीसाठी प्रोसेसिंग फी आकारण्यात येणार आहे. तर CNG आणि LPG वाहनांच्या किटला मंजुरी देण्यासाठी व Electric Vehicle च्या नोंदणीवरही प्रोसेसिंग फी आकारली जाईल. (Punjab Cabinet gave nod for charging processing fees for registration of new vehicles)

त्यामुळे आता पंजाबमध्ये CNP, LPG आणि Electric Vehicle वाहन खरेदी केल्यास वाहन नोंदणीवेळी पैसे भरावे लागतील. शेजारच्या राज्यांमध्ये वाहनांच्या नोंदणीवर आकारण्यात येणाऱ्या प्रोसेसिंग फीच्या निर्णयाचे पंजाब सरकारकडून अनुकरण करण्यात आले आहे.

पाच हजार रुपये प्रोसेसिंग फी

पंजाब सरकारने 1989 च्या मोटर कायद्यात कलम 130 ए चा समावेश केला आहे. त्यानुसार आता वाहननिर्मिती करणाऱ्या कंपन्या किंवा अधिकृत डिलर्सकडून CNG आणि LPG वाहनांच्या किटला मंजुरी देताना आणि इलेक्ट्रिक वाहनांच्या नोंदणीवेळी सरकार 5000 रुपयांची प्रोसेसिंग आकारेल.

तसेच नव्या वाहनांच्या नोंदणीचे अधिकार परिवहन विभागाच्या बिगरव्यावसायिक विभागाला देण्यात आले आहेत. या मंजुरीसाठी वाहननिर्मिती करणाऱ्या कंपन्या आणि डिलर्सना अधिकृत टेस्टिंग एजन्सीकडे प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे.

पेट्रोल पंपप्रमाणेच इलेक्ट्रिक गाड्यांसाठी ‘चार्जिंग’ स्टेशन उघडणार

मुंबई : प्रदूषण आणि पेट्रोल, डिझेल यांच्या वाढत्या किंमतींमुळे लोकांचा इलेक्ट्रिक वाहनांकडे कल वाढत चालला आहे. आता सरकारनेही इलेक्ट्रिक कारच्या विक्रीला चालना देण्यास सुरुवात केली आहे. यामुळे लोक इलेक्ट्रिक वाहने खरेदी करण्याचा अधिक विचार करू शकतील. जसे इतर गाड्यांसाठी पेट्रोल पंप, गॅस स्टेशन आहेत, तसेच आता लवकरच इलेक्ट्रिक गाड्यांसाठी देखील चार्जिंग स्टेशन बनवण्यात येणार आहेत.

दिल्लीतील ही चार्जिंग स्टेशन, पेट्रोल पंप आणि सीएनजी स्टेशनप्रमाणे रस्त्याच्या कडेलाच उभारण्यात येणार आहेत. यासाठी कार पार्क करण्यासाठी पुरेशी जागा, तसेच कार चार्ज करण्यास कुठलाही अडथळा येणार नाही, अशा जागा निवडण्यात येणार आहे. गाडी चार्ज करण्यास उत्तम अशा दिल्लीतील बऱ्याच जागा एमसीडीने आतापर्यंत निश्चित केल्या असल्याचे बोलले जात आहे. यात दक्षिण एमसीडीने 75, उत्तर 127, पूर्व 93 स्थानांना आपली पसंती दर्शवली आहे.

संबंधित बातम्या:

किआ कंपनीचा नवा विक्रम; भारतात इतक्या कार्सची विक्री

अरेरे! 1 जानेवारीपासून महिंद्राच्या गाड्यांची किंमत वाढणार; जाणून घ्या कारण

तुम्हीही चालवू शकता परदेशात गाडी, अमेरिकेसह ‘या’ देशांत भारतीय ‘ड्रायव्हिंग लायसन्स’ला मान्यता

(Punjab Cabinet gave nod for charging processing fees for registration of new vehicles)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI