स्पोर्टी लूकसह होंडाची Grazia 125 Repsol Honda Team Edition बाजारात, किंमत…

Honda Motorcycle & Scooter India ने भारतीय दुचाकी बाजारात आपली नवीन स्कूटर लॉन्च केली आहे. या स्कूटरचे नाव आहे Grazia 125 Repsol Honda Team Edition.

स्पोर्टी लूकसह होंडाची Grazia 125 Repsol Honda Team Edition बाजारात, किंमत...
Grazia 125 Repsol Honda Team Edition
Follow us
| Updated on: Nov 15, 2021 | 5:42 PM

मुंबई : Honda Motorcycle & Scooter India ने भारतीय दुचाकी बाजारात आपली नवीन स्कूटर लॉन्च केली आहे. या स्कूटरचे नाव आहे Grazia 125 Repsol Honda Team Edition. या स्पेशल एडिशनमधील स्पेशल ग्राफिक्स आणि डिझाईन थीम रेपसोल होंडा रेसिंग टीमच्या मशिन्सपासून इन्स्पायर्ड (प्रेरित) आहे, जे देशातील रेसिंग प्रेमींचा जोश वाढवेल, ऑरेंज व्हील रिम्ससह ही स्कूटर सादर करण्यात आली आहे. (Honda Grazia 125 Repsol Honda Team Edition Launched; check price and features)

या अॅग्रेसिव्ह लूक असलेल्या स्कूटरला उत्तम स्टायलिंग मिळते. तसेच, साइड पॅनलवर स्प्लिट एलईडी पोझिशन लॅम्प देण्यात आले आहेत, ज्यामुळे ही स्कूटर अधिक आकर्षक बनली आहे. या स्कूटरच्या फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, यामध्ये LED DC हेडलॅम्प, मल्टी-फंक्शन स्विच, इंटिग्रेटेड पासिंग स्विच, इंजिन-कट ऑफसह साइड स्टँड इंडिकेटर, इंटेलिजेंट इन्स्ट्रुमेंट डिस्प्ले, 3-स्टेप अॅडजस्टेबल रिअर सस्पेंशन आणि फ्रंट टेलिस्कोपिक सस्पेंशन देण्यात आलं आहे.

पॉवरफुल इंजिन

स्पेशल एडिशन Honda Grazia 125 स्कूटरमध्ये Fuel Injection (PGM-FI) टेक्नोलॉजी वापरण्यात आलेलं इंजिन देण्यात आलं आहे. यामध्ये आयडलिंग स्टॉप सिस्टम दिली आहे. ही स्कूटर स्मार्ट पॉवर फीचरसह येते. हे इंजिन 6000 rpm वर 8.25 PS पॉवर, तर 5000 rpm वर 10.3 Nm टॉर्क जनरेट करू शकतं. तसेच यामध्ये ऑटोमॅटिक गिअरबॉक्स देण्यात आला आहे.

शानदार लूक

या लॉन्चच्या निमित्ताने होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक, विक्री आणि विपणन, यदविंदर सिंग गुलेरिया म्हणाले की, Grazia 125 Repsol Honda Team Edition पुन्हा एकदा MotoGP चाहत्यांच्या रेसिंग प्रेमाला नव्या शिखरावर नेईल. या स्कूटरचा स्पोर्टी लूक, ऑरेंज, रेड आणि व्हाईट कलर स्कीमचे स्मार्ट ग्राफिक्स ट्रेडमार्क आणि स्पोर्टी इंजिन हे रेसिंग प्रेमींसाठी एक उत्तम पॅकेज सादर करतात.

Grazia 125 ची किंमत

या स्कूटरच्या लुकबद्दल बोलायचे झाले तर, व्हाईट कलरमध्ये रेड आणि ऑरेंज कलर कॉम्बिनेश देण्यात आलं आहे. या स्कूटरचे ऑरेंज व्हील्स तिला आणखी आकर्षक बनवतात. Grazia 125 Repsol Honda Team Edition ची एक्स-शोरूम किंमत 87,138 रुपये ठेवण्यात आली आहे.

इतर बातम्या

Yezdi Adventure मोटारसायकल लवकरच भारतात लाँच होणार, रॉयल एनफील्डला टक्कर

2022 Hyundai Creta फेसलिफ्टचा ग्लोबल डेब्यू, जाणून घ्या भारतात कधी लाँच होणार?

Mahindra लवकरच देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार लाँच करणार, जाणून घ्या कारमध्ये काय असेल खास

(Honda Grazia 125 Repsol Honda Team Edition Launched; check price and features)

Non Stop LIVE Update
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.