सिंगल चार्जवर 230 किमी रेंज, Renault Kwid Electric भारतात लाँच होणार?

5 डोर वाली कॉम्पॅक्ट कार Dacia Spring एका चार्जिंगवर 230 किमी रेंज देते. या कारची सुरुवातीची किंमत 10.50 लाख रुपये इतकी आहे.

सिंगल चार्जवर 230 किमी रेंज, Renault Kwid Electric भारतात लाँच होणार?
Dacia Spring

मुंबई : Dacia Spring ही कार बर्‍याच युरोपियन बाजारामध्ये विकली जाते. त्यामुळे कोणताही भारतीय विदेशात फिरायला गेला तर तो रेनॉ क्विडचं पुढील व्हर्जन कसं असेल हे सांगू शकतो. कारण या गाडीचा एक्सटीरियर लुक अगदी रेनॉ क्विडसारखा आहे. परंतु आज अचानक Dacia Spring या कारचं नाव का घेतलं जातंय? तर त्यामागचं प्रमुख कारण म्हणजे ही कार युरोपियन बाजारातील सर्वात किफायतशीर इलेक्ट्रिक कार म्हणून ओळखली जाते. अशा परिस्थितीत बॅटरीवर चालणारी रेनॉ क्विड भारतात कधी लाँच होणार, असा सवाल उपस्थित केला जात आहे. (Renault Kwid EV can be launched in india)

Dacia Spring आणि रेनॉ सिटी K-ZE या कार परस्पर जोडलेल्या आहेत, कारण या दोन्ही कार चीनमध्ये बनवण्यात आल्या आहेत. त्यामुळे रेनॉ क्विडचं ईव्ही व्हर्जन भारतीय बाजारात लाँच झालं तर अनेक ग्राहकांची अपेक्षा असेल की ही कार Dacia Spring च्या दमदार लुक आणि फीचर्ससह लाँच व्हायला हवी.

5 डोर वाली कॉम्पॅक्ट कार डासिया एका चार्जिंगवर 230 किमी रेंज देते. या कारची सुरुवातीची किंमत 10.50 लाख रुपये इतकी आहे. 26.8 किलोवॅट क्षमतेच्या बॅटरीसह ही कार मॅरेथॉन रनर होणार नाही परंतु शहर आणि आसपासच्या भागात जाण्यासाठी ही एक उत्तम कार आहे. ज्या युरोपियन ग्राहकांना पेट्रोल आणि डिझेल कार सोडून इलेक्ट्रिककडे स्विच व्हायचे आहे ते सध्या या वाहनाची निवड करीत आहेत.

परवडणारी इलेक्ट्रिक कार

डासिया स्प्रिंग ईव्हीपासून प्रेरणा घेत, रेनॉ इंडियाने भारतात इलेक्ट्रिक कार लाँच करण्यास सुरुवात केली तर ती कार थोडी वेगळी असेल. रेनॉ कंपनी क्विडसारक्या कारमध्ये बॅटरी पॅक इन्स्टॉल करुन भारतात परवडणारी इलेक्ट्रिक कार लाँच करु शकते. सध्या भारतात परवडणाऱ्या ईव्ही सेगमेंटमध्ये फारच कमी गाड्या आहेत कारण बहुतांश इलेक्ट्रिक कार फक्त प्रीमियम सेगमेंटमध्ये लॉन्च करण्यात आल्या आहेत.

इलेक्ट्रिक वाहनांना चांगला प्रतिसाद

प्रदूषण आणि पेट्रोल, डिझेल यांच्या वाढत्या किंमतींमुळे लोकांचा इलेक्ट्रिक वाहनांकडे कल वाढत चालला आहे. देशातील काही शहरांमध्ये पेट्रोलच्या किंमती शंभरी पार गेल्या आहेत, तर काही शहरांमध्ये पेट्रोलच्या किंमती 90-95 रुपयांच्या पुढे आहेत. त्यामुळे अनेक दिग्गज वाहन कंपन्या इलेक्ट्रिक व्हीकल लाँच करत आहेत, तर काही कंपन्या लवकरच इलेक्ट्रिक वाहनं लाँच करणार आहेत. पूर्वी इलेक्ट्रिक व्हीकल्सच्या बजेटमुळे लोक चिंतेत असायचे, परंतु आता तसे चित्र राहिले नाही. वाहन कंपन्या कमीत कमी बजेटमध्ये जास्तीत जास्त फिचर्स देणाऱ्या इलेक्ट्रिक कार्स, बाईक आणि स्कूटर लाँच करत आहेत, आणि विशेष म्हणजे ग्राहकांकडून आता इलेक्ट्रिक वाहनांना चांगला प्रतिसाद मिळू लागला आहे.

संबंंधित बातम्या

2024 पर्यंत दिल्लीत विकली जाणारी दर 4 पैकी 1 गाडी इलेक्ट्रिक असणार, केजरीवाल सरकारची जोरदार तयारी

आता इलेक्ट्रिक कार चार्ज करावी लागणार नाही, ही कंपनी बॅटरी स्वॅपिंग सर्व्हिस सुरु करणार

2021 मध्ये ‘या’ शानदार इलेक्ट्रिक कार लाँच होणार, कमी किंमतीत दमदार फिचर्स

Toyota कडून सर्वात छोटी इलेक्ट्रिक कार लाँच, एकदा चार्ज केल्यावर 150 किमी धावणार, किंमत फक्त…

इलेक्ट्रिक वाहनांसाठी ‘या’ शहरात 100 नवे चार्जिंग स्टेशन उभारणार, राज्य सरकारचा पुढाकार

(Renault Kwid EV can be launched in india)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI