AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

इंडोनेशियाच्या बंदीने इंडियातील ‘फोडणी’ला महागाईचा ‘तडका’, पामतेल निर्यातीवर बंदी घातल्याने खाद्यतेलाच्या किंमती भडकणार

जगातील सर्वात मोठ्या पाम तेल उत्पादकांपैकी एक असलेल्या इंडोनेशियाने 28 एप्रिलपासून पामतेल निर्यातीवर बंदी घातली आहे. ही माहिती आगीसारखी पसरल्यानंतर घरगुती तेलाच्या किंमती भडकण्याची शक्यता आहे. भारत दरवर्षी 70 हजार कोटी रुपयांचे पामतेल आयात करतो.

इंडोनेशियाच्या बंदीने इंडियातील 'फोडणी'ला महागाईचा 'तडका', पामतेल निर्यातीवर बंदी घातल्याने खाद्यतेलाच्या किंमती भडकणार
| Edited By: | Updated on: Apr 23, 2022 | 9:40 AM
Share

गहु, तांदुळ आणि अन्य अन्नधान्याची निर्यातीचा रेकॉर्ड करणा-या भारताला लवकरच मोठ्या संकटाला सामोरे जावे लागणार आहे. पामतेलाच्या (Palm Oil) आयातीवर निर्भर असणा-या भारताला महागाईचा फटका बसू शकतो. जगातील सर्वात मोठ्या पाम तेल उत्पादकांपैकी एक असलेल्या इंडोनेशियाने (Indonesia) 28 एप्रिलपासून पामतेल निर्यातीवर बंदी (Export Ban) घातली आहे. ही माहिती आगीसारखी पसरल्यानंतर घरगुती तेलाच्या किंमती भडकण्याची शक्यता आहे. अखिल भारतीय खाद्य तेल व्यापारी महासंघाचे अध्यक्ष शंकर ठक्कर यांनी खाद्यतेलाच्या किंमती (Edible Oil Price) या बंदीमुळे भडकतील असे स्पष्ट केले आहे. बंदी अगोदर पामतेल प्रति 10 किलो किरकोळ भावात 1470 रुपयांना मिळत होते. बंदीची घोषणा होताच हा भाव 1525 रुपयांवर जाऊन पोहचला. भारत दरवर्षी 70 हजार कोटी रुपयांचे पामतेल आयात करतो.

भारत मोठा आयातदार

अध्यक्ष ठक्कर यांनी स्पष्ट केले की, भारत कच्चे पामतेल-पामोलिन इंडोनेशियाकडून तर पक्के पामतेल-रिफाइंड तेल मलेशियाकडून आयात करतो. भारत हा पामतेलाचा मोठा आयातदार देश आहे. आपल्या एकूण खाद्यतेलाच्या 65 टक्के तेलाची इंडोनेशियाकडून आयात करण्यात येते. हा आकडा फार मोठा आहे. त्यामुळे इंडोनेशियाने पामतेल निर्यातीवर लादलेली बंदी भारतीय स्वयंपाकगृह, हॉटेल्स, रेस्टॉरंट, ढाबे यांच्यासाठी संकटाची चाहुल आहे. कारण त्यामुळे किचनचे बजेट कोलमडणार आहे. तेलाच्या किंमती पुन्हा भडकल्याने सर्वसामान्य भारतीयाला इंधनासोबतच खाद्यतेलाच्या किंमती रडवणार आहे. इंडोनेशियाच्या या भूमिकेमुळे मलेशियाचे फावले आहे. हा देश आता रिफाइंड तेलाच्या वाढवण्याची भीती आहे.

आता हवे आत्मनिर्भरतेकडे पाऊल

भारत खाद्यतेलाच्या बाबतीत अद्याप आत्मनिर्भर नाही, त्याचा मोठा फटका आता देशाला बसणार आहे. सरकार यासाठी प्रयत्नरत असले तरी कमी किंमतीमुळे शेतक-यांनी तेलबियांच्या उत्पादनाकडे पाठ फिरवली आहे. त्याचा मोठा दुष्परिणाम आता भोगावे लागत आहे. अन्न आणि सार्वजनिक पुरवठा विभागाच्या अहवालानुसार, खाद्यतेलाची घरगुती मागणी जवळपास 250 लाख टन इतकी मोठी आहे. तर उत्पादन अगदी नगण्य म्हणजे 112 लाख टनाच्या जवळपास आहे. 56 टक्क्यांची ही तूट भरून काढण्यासाठी भारताला इतर देशांवर अवलंबून रहावे लागत आहे. खाद्यतेल आयातीवर भारताचा दरवर्षी 70 हजार कोटी रुपयांचा खर्च होतो. हा आकडा डोळे विस्फरणारा आहे. आता इंडोनेशियाने घेतलेल्या बंदीच्या निर्णयाने सर्वसामान्य भारतीयांचे कंबरडे मोडणार आहे आणि सरकारसाठी ही धोक्याची घंटा आहे.

संबंधित बातम्या : 

नीति आयोगाचे उपाध्यक्ष राजीव कुमार यांचा राजीनामा; राजीनाम्याचे कारण गुलदस्त्यात, सुमन बेरी नवे उपाध्यक्ष होण्याची शक्यता

today Petrol Diesel rate: कच्च्या तेलाच्या दरात वाढ, पेट्रोलियम कंपन्यांकडून इंधनाचे नवे दर जारी, जाणून घ्या आपल्या शहरातील भाव

नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी
नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी.
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट.
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात.
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक.
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही.
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं.
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते.
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं.
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा.
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू.