AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Multibagger Stock : गुंतवणूकदारांना आर्थिक पॉवर! पोर्टफोलिओत करंट, अगोदर केले करोडपती, आता पुन्हा भरला जोश

Multibagger Stock : सध्या बाजारात धडामधूम सुरु असतानाही या पॉवर कंपनीच्या स्टॉकवर गुंतवणूकदारांच्या उड्या पडल्या आहेत. या स्टॉकमध्ये मोठी गुंतवणूक झाली आहे. दीर्घ कालीन गुंतवणूकदारांना तर या शेअरने लॉटरी लावली आहे. कोणता आहे हा शेअर

Multibagger Stock : गुंतवणूकदारांना आर्थिक पॉवर! पोर्टफोलिओत करंट, अगोदर केले करोडपती, आता पुन्हा भरला जोश
| Updated on: Mar 15, 2023 | 8:07 PM
Share

नवी दिल्ली : सध्या शेअर बाजारात (Share Market) धडामधूम सुरु असतानाही या पॉवर कंपनीच्या स्टॉकवर गुंतवणूकदारांच्या उड्या पडल्या आहेत. या स्टॉकमध्ये मोठी गुंतवणूक झाली आहे. दीर्घ कालीन गुंतवणूकदारांना तर या शेअरने लॉटरी लावली आहे. लाँग टर्म गुंतवणूकदारांना (Long Term Investors) या शेअरने करोडपती केले आहे. तज्ज्ञांच्या मते, येत्या काही दिवसात हा शेअर जोरदार उसळी घेईल. घरगुती ब्रोकरेज फर्म शेअरखानने, या कंपनीत गुंतवणुकीचे टार्गेट निश्चित केले आहे. त्यानुसार, 695 रुपयांचे लक्ष्य निश्चित करण्यात आले आहे. हा शेअर सध्या बीएसईवर (BSE) 2.38 टक्क्यांनी वधारुन 576.50 रुपयांवर आहे. म्हणजे गुंतवणूकदारांना 125 रुपयांच्या घरात फायदा होईल.

कल्पतरु पॉवर ट्रान्समिशन (Kalpataru Power Target Price) असे या कंपनीचे नाव आहे. ही कंपनी ऊर्जा वितरण आणि पारेषण क्षेत्रात काम करते. बांधकाम क्षेत्रात पण ही कंपनी अग्रेसर आहे. ही कंपनी या क्षेत्रात सर्वच प्रकारच्या सेवा पुरवते. या कंपनीकडे सातत्याने ऑर्डर येत आहे. त्यात 46 टक्क्यांची वाढ झाली आहे. घरगुतीच नाही तर आंतरराष्ट्रीय बाजारातून ही या कंपनीला मोठ्या ऑर्डर प्राप्त होत आहे. त्यामुळे या कंपनीचा व्यवसाय भरभराटीला आला आहे.

शेअरखानच्या मते, ही कंपनी या आणि पुढील वर्षात जोरदार कामगिरी बजावेल. ही कंपनी सर्वच ऑर्डर पूर्ण करणार आहे. या कंपनीत जेएमसी प्रोजेक्टस या कंपनीचे विलिनीकरण झाले आहे. त्यामुळे कल्पतरुचा बाजारातील दबदबा वाढणार आहे. या कंपनीकडे इतरही अनेक प्रकल्प हाताशी आहेत. त्याचा गुंतवणूकदारांना ही फायदा होणार आहे.

कंपनीने आर्थिक वर्ष 2025 साठी 24 हजार कोटी रुपयांच्या महसूलाचे उद्दिष्ट ठेवले आहे. ही कंपनी महसूलातून कर्जाची परतफेडीवर लक्ष देत आहे. त्यामुळे शेअर खानने या कंपनीसाठीचे रेटिंग कायम ठेवले आहे. तसेच या शेअरचे टार्गेट 695 रुपये ठेवले आहे.

13 मार्च 2003 रोजी हा शेअर केवळ 3.28 रुपये होता. हा शेअर आतापर्यंत 17,476 टक्के वधारला आहे. सध्या या शेअरचा भाव 576.50 रुपये आहे. म्हणजे गेल्या 20 वर्षांत कल्पतरु पॉवरने केवळ 57 हजार रुपयांच्या गुंतवणुकीवर खरेदीदारांना कोट्याधीश केले आहे. आता पण हा शेअर उसळी घेत आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांचा मोठा फायदा होणार आहे.

ही या शेअरच्या कारभाराची माहिती आहे. या शेअरने कशी कामगिरी केली. कंपनीविषयीचे अपडेट आहेत. हा कोणत्याही प्रकारचा गुंतवणुकीचा सल्ला नाही. गुंतवणूक करण्यापूर्वी अभ्यास आणि तज्ज्ञांचा सल्ला वेळीच घ्या.

मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर.
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?.
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात.....
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश.
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या.