Gold Rates : सलग तिसऱ्या दिवशी सोनं 160 रुपयांनी महागलं, खरेदी करण्याआधी चेक करा ताजे भाव

एमसीएक्सवरील सोन्याचे वायदा भाव प्रति 10 ग्रॅम 44,360 होते. त्याचबरोबर चांदीचा वायदा दर दहा ग्रॅम 0.5 टक्क्यांनी वाढून 66,202 वर गेला आहे.

Gold Rates : सलग तिसऱ्या दिवशी सोनं 160 रुपयांनी महागलं, खरेदी करण्याआधी चेक करा ताजे भाव
1 किलो, 100 ग्रॅम आणि 50 ग्रॅमच्या ईजीआरसाठी समान ट्रेडिंग लॉट असेल. 5 ग्रॅम, 10 ग्रॅमचे ईजीआर देखील असतील परंतु वितरण किमान 50 ग्रॅम असेल. इतर सिक्युरिटीज प्रमाणे ट्रेडिंग फीचर्स देखील समान असतील. शाश्वत आयुष्याच्या बाबतीत, तिजोरीचा खर्च देखील ईजीआर धारकाद्वारे उचलला जाईल. ईजीआर इतर सिक्युरिटीजप्रमाणे एसटीटीला आकर्षित करेल. EGR ला फिजिकल सोन्यात रूपांतरित केल्याने GST आकर्षित होईल. एकापेक्षा जास्त राज्यांमधील व्यवहारांवर IGST ची सूचना.
Follow us
| Updated on: Mar 09, 2021 | 2:19 PM

नवी दिल्ली : मंगळवारी सलग तिसर्‍या दिवशी सोन्याचा दरांमध्ये (Gold rate Today) तेजी आल्याचं समोर आलं आहे. आज दिवसाच्या सुरुवातीला 22 कॅरेट सोन्याचा भाव 160 रुपयांनी वाढून 43,680 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला, तर सोमवारी 43,520 रुपये होता. एमसीएक्सवरील सोन्याचे वायदा भाव प्रति 10 ग्रॅम 44,360 होते. त्याचबरोबर चांदीचा वायदा दर दहा ग्रॅम 0.5 टक्क्यांनी वाढून 66,202 वर गेला आहे. (gold prices today on 09 march 2021 down 12000 rupees from record highs know mcx latest rates)

सोन्याची किंमत 11 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर आली आहे. ऑगस्टमध्ये सोन्याचा विक्रम 56,200 च्या विक्रम पातळीवर होता. आतापर्यंत सोन्याच्या किंमती या पातळीवरून 12000 रुपयांनी घसरल्या आहेत.

दिल्लीमध्ये सोन्याचे ताजे भाव

दिल्लीतील 22 कॅरेट सोन्याच्या किंमतीविषयी बोलायचं झालं तर प्रति 10 ग्रॅम 44,150 रुपये झाली आहे. तर दिवशी हे दर प्रति 10 ग्रॅम, 43,860 रुपये होते. 9 मार्चला मुंबईतील सोन्याचा दर 10 ग्रॅम 43,680 रुपयांवर आहे.

कोलकाता आणि चेन्नईमध्ये सोन्याच्या किंमती

कोलकातामध्ये मंगळवारी 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 44,120 रुपये आहे तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 10 ग्रॅम 46,760 रुपये आहे. चेन्नईमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 42,210 रुपये आहे आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत 10 ग्रॅम 46,050 रुपये आहे.

सोने आठ महिन्यांत 12,086 रुपयांनी स्वस्त

यावेळी, ऑगस्ट 2020 च्या अखेरच्या उच्चांकाच्या तुलनेत सोने सुमारे 12,086 रुपयांनी स्वस्त झाले. ऑगस्टमध्ये ते 56200 च्या पातळीवर पोहोचले होते. गेल्या आठवड्यात दिल्ली बुलियन मार्केटमध्ये सोन्याच्या किमतीत मोठी घसरण नोंदवली गेली. सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 522 रुपयांनी घसरली. एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक (कमोडिटीज) तपन पटेल म्हणाले की, कॉमेक्सच्या कमकुवततेमुळे 24 कॅरेट सोन्याच्या किमती दिल्लीत 122 रुपयांनी घसरल्या.

यावर्षी सोने 63 हजार रुपयांच्या पातळीवर जाईल

तज्ज्ञ म्हणतात की, जगभरात कोरोना लसीकरण मोहिमेला वेग आल्यानं लोक गुंतवणुकीच्या इतर पर्यायांकडे वळत आहेत. यामुळे सोन्याच्या किमती खाली आल्यात. ही परिस्थिती जास्त काळ राहील, असे त्यांना वाटत नाही. जगातील बर्‍याच शेअर बाजारासह भारतीय शेअर बाजारही वाढलाय. परंतु बाजारात चढउतारही दिसून येत आहेत. स्टॉक मार्केट्स जसजसा अधिक वाढत जातोय, तसतसे नफ्यातही जोखीम देखील वाढतेय.

अशा प्रकारच्या मोठ्या संख्येने गुंतवणूकदार नंतर सर्वात सुरक्षित गुंतवणुकीच्या सोन्याकडे वळतील. तसेच सोन्यात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करतील आणि ते पुन्हा वाढण्यास सुरुवात होईल. 2021 मध्ये सोन्याच्या किमतीत वाढ होणार असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. असा अंदाज आहे की, जर सोन्याचे दर वाढू लागले, तर ते 63,000 रुपयांच्या पातळीवर जाईल. (gold prices today on 09 march 2021 down 12000 rupees from record highs know mcx latest rates)

संबंधित बातम्या – 

Gold Silver Rate today: चांगली बातमी! Women’s Day लाच सोने झाले स्वस्त; पटापट तपासा तोळ्याचा भाव

कमी पैशांमध्ये जास्त परतावा देणाऱ्या LIC च्या धमाकेदार योजना; फायदे वाचून करा गुंतवणूक

SBI च्या कोट्यावधी ग्राहकांसाठी Good News! गरज पडली तर जास्तीचे पैसे देणार बँक, वाचा सविस्तर

तुम्हालाही हवे आहेत का 2000 रुपये? झटपट पूर्ण करा संपूर्ण प्रोसेस

(gold prices today on 09 march 2021 down 12000 rupees from record highs know mcx latest rates)

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.