Export Duty Rice | तांदळाचे भाव राहतील जमिनीवर, सरकारने केला हा उपाय..

Export Duty Rice | देशातील काही भागात अजूनही म्हणावा तसा पाऊस न झाल्याने तांदुळाच्या उत्पादनावर परिणाम होणार आहे. केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या अंदाजानुसार, धान लागवडीचे क्षेत्र 5.62 टक्क्यांनी घटले. सध्या 383.99 लाख हेक्टरवर धान लागवड करण्यात आली आहे.

Export Duty Rice | तांदळाचे भाव राहतील जमिनीवर, सरकारने केला हा उपाय..
Image Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Sep 09, 2022 | 1:49 PM

Export Duty Rice | देशातील सध्यस्थिती खरीपाचे (Kharif Session) उत्पादन घटण्याची दाट शक्यता आहे. काही राज्यांमध्ये पावसाने डोळे वटारले आहेत तर काही राज्यांमध्ये पावसाने धुमशान घातले आहे. त्यामुळे यंदाचा खरीप हातचा जाण्याची चिन्हं आहेत. त्याचा धान उत्पादनावरही (Rice Production) मोठा परिणाम होणार आहे. देशात तांदळाच्या किंमती भडकू नये यासाठी सरकारने तांदळाच्या निर्यातीवर शुल्क लावले (Export Duty) आहे. त्यामुळे तांदळाच्या किंमती नियंत्रणात राहतील.

इतके आयात शुल्क लावणार

धान उत्पादन कमी होण्याची लक्षात घेत सरकारने गुरुवारी बासमती तांदुळ सोडून इतर सर्व तांदुळाच्या निर्यातीवर 20 टक्के शुल्क लावण्याचा निर्णय घेतला आहे. हे शुल्क 9 सप्टेंबरपासून लागू होणार आहे. बासमती तांदळाला या निर्यात शुल्कातून सूट देण्यात आली आहे.

कितीने घटणार क्षेत्र

देशातील काही भागात अजूनही म्हणावा तसा पाऊस न झाल्याने तांदळाच्या उत्पादनावर परिणाम होणार आहे. केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या अंदाजानुसार, धान लागवडीचे क्षेत्र 5.62 टक्क्यांनी घटले. सध्या 383.99 लाख हेक्टरवर धान लागवड करण्यात आली आहे.

हे सुद्धा वाचा

महसूल विभागाचे म्हणणे काय

महसूल विभागानुसार, पावसाने तडी दिल्याने यंदा अनेक राज्यातील खरीप पिकांवर परिणाम होईल. त्यात तांदळाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घटणार आहे.

भारताचा वाटा किती

तांदळाच्या जागतिक व्यापारात भारताचा हिस्सा 40% आहे. भारताने 2021-22 मध्ये 2.12 कोटी टन तांदुळाची निर्यात केली आहे. यादरम्यान देशाने 150 हून अधिक देशांमध्ये 6.11 अरब डॉलर बिगर बासमती तांदुळाची निर्यात केली आहे.

निर्णायाचे स्वागत

अखिल भारतीय तांदुळ निर्यात संघाचे पूर्व अध्यक्ष विजय सेतिया यांनी निर्यात शुल्क लावण्याच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. संघाचे सध्याचे अध्यक्ष नाथी राम गुप्ता यांनी दक्षिणेतील राज्यांच्या निर्यातीवर परिणाम होण्याचे संकेत दिले आहेत.

असा होईल परिणाम

या निर्णयामुळे बिगर बासमती तांदळाची निर्यात मोठ्या प्रमाणात प्रभावित होईल. 20 ते 30 लाख तांदळाची निर्यात होणार नाही. हा साठा भारतीय बाजारात दाखल होईल आणि ग्राहकांना दिलासा मिळेल.

सरकारला मोठा फायदा नाही

सरकारने निर्यात शुल्क लावण्याचा निर्णय घेतला असला तरी सरकारच्या खजिन्यात फारशी आवक होणार नाही. यापूर्वी निर्यात शुल्कातून जी कमाई होत होती. तेवढाच महसूल सरकारला मिळणार आहे.

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.