ITR Rebate : HRA येईल कामाला, एक लाख असे वाचवा

ITR Rebate : सध्या कर्मचाऱ्यांच्या डोक्यात कर कसा वाचवायचा आणि चांगली गुंतवणूक योजना कशी निवडायची याची तारांबळ उडाली आहे. पण त्यांना एचआरएच्या मदतीने कर बचत करता येईल.

ITR Rebate : HRA येईल कामाला, एक लाख असे वाचवा
कर वाचवा
Follow us
| Updated on: Feb 17, 2023 | 7:32 PM

नवी दिल्ली : केंद्र सरकारने आर्थिक वर्ष 2022-23 साठी वैयक्तिक आणि व्यावसायिक, प्राप्तिकर रिटर्न (ITR) जमा करतात. प्राप्तिकर खात्याने मुल्यांकन अर्ज (ITR forms for ay 2023 24) उपलब्ध करुन दिला आहे. गेल्या वर्षी एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात हा अर्ज उपलब्ध करुन देण्यात आला होता. प्राप्तिकर वाचविण्यासाठी तुम्हाला अनेक योजना मदत करु शकतात. यामध्ये हाऊस रेंट अलाऊंस (HRA) म्हणजे एचआरए पण उपयोगी ठरते. जर तुम्ही पगारी नोकरदार (Salaried Employees) असाल तर एचआरएचा फायदा उठवू शकता. पण एचआरए मधून कर बचत केवळ जुन्या कर व्यवस्थेतच (Old Tax System) मिळते. नवीन कर व्यवस्थेत कर सवलतीसाठी एचआरएचा लाभ घेता येत नाही.

प्राप्तिकर विभागाने मुल्यांकन वर्ष (Assessment Year) 2023-24 साठी वैयक्तिक करदाते आणि व्यावसायिकांसाठी इनकम टॅक्स रिटर्न (ITR) दाखल करण्याची अधिसूचना काढली आहे. 10 फेब्रुवारी रोजी ही अधिसूचना काढण्यात आली. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (CBDT) आईटीआर फॉर्म 1-6, आईटीआर-वी (Verification Form) आणि पोचपावती (Acknowledgement Form) यांची ही अधिसूचना काढली. गेल्यावर्षीप्रमाणेच यंदाही या अर्जात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. यंदा प्राप्तिकर रिटर्न भरण्याची अंतिम तारीख 31 जुलै ही आहे.

वेतनात हाऊस रेंट अलाऊंस (HRA) करपात्र उत्पन्नाचा भाग आहे. प्राप्तिकर अधिनियमाची कलम 10 (13A) अंतर्गत कर सवलत मिळते. HRA च्या माध्यमातून कर बचत करता येते. पण त्यासाठी काही अटी आहेत. मेट्रो शहरात मुळ पगाराच्या 50 टक्के हिस्सा तर नॉन मेट्रो शहरात पगाराच्या 40 टक्के हिस्सा एचआरएचा असतो. वार्षिक घरभाडे 10 टक्के रक्कम कमी झाल्यानंतर उरलेली रक्कम एचआरएचा भाग आहे.

हे सुद्धा वाचा

जर एखादी व्यक्ती मुंबईत नोकरी करते आणि भाड्याच्या घरात राहते. ती घरभाड्यापोटी 15 हजार रुपये देत असेल तर त्या व्यक्तीला वार्षिक अधिकत्तम एक लाख रुपयांचा एचआरए मिळतो. जर त्याचे मूळ वेतन 25 हजार रुपये आहे आणि महागाई भत्ता दोन हजार रुपये आहे. तर त्या नोकरदाराला एक लाख रुपयांपर्यंतची बचत करता येते.

हाऊस रेंट अलाऊंन्सच्या माध्यमातून कर सवलत मिळवण्यासाठी सर्वात अगोदर रेंट ॲग्रीमेंट असणे आवश्यक आहे. या ॲग्रीमेंटमध्ये मासिक भाडे, कराराचा कालावधी आणि अंतिम मुदत, खर्च याची माहिती असणे आवश्यक आहे. हा भाडे करारनामा 100 वा 200 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर असणे आवश्यक आहे.

जर वार्षिक भाडे एक लाख रुपयांपेक्षा अधिक असेल तर घर मालकाचे पॅन कार्ड असणे आवश्यक आहे. या करारनाम्याची आणि भाड्याची, किरायाची पोच पावती तुमच्याकडे असणे आवश्यक आहे. जर तुमचे वार्षिक उत्पन्न 50 लाख रुपये असेल तर तुम्हाला आयटीआर फाइलिंग साठी फॉर्म 1 भरणे आवश्यक आहे. 50 लाख रुपयांपेक्षा अधिक कमाई असेल तर आयटीआर फॉर्म 2 भरणे आवश्यक आहे.

सैफवर हल्ला करणाऱ्या आरोपीचा आणखी एक व्हिडीओ समोर, यात स्पष्ट दिसतंय..
सैफवर हल्ला करणाऱ्या आरोपीचा आणखी एक व्हिडीओ समोर, यात स्पष्ट दिसतंय...
सैफवर हल्ला करणारा मुंबईतील 'या' गजबजलेल्या स्टेशनच्या CCTVत कैद अन्..
सैफवर हल्ला करणारा मुंबईतील 'या' गजबजलेल्या स्टेशनच्या CCTVत कैद अन्...
सैफवर हल्ला करणारा व्यक्ती 'हा'च तर नाही ना? एक जण पोलिसांच्या ताब्यात
सैफवर हल्ला करणारा व्यक्ती 'हा'च तर नाही ना? एक जण पोलिसांच्या ताब्यात.
आता किंगखानच्या जीवाला धोका? सैफवर हल्ला करणाऱ्या आरोपीकडून रेकी
आता किंगखानच्या जीवाला धोका? सैफवर हल्ला करणाऱ्या आरोपीकडून रेकी.
हार्वेस्टरचा वाद अन् जरांगेंचा थेट कराडला फोनकॉल, काय झालं संभाषण?
हार्वेस्टरचा वाद अन् जरांगेंचा थेट कराडला फोनकॉल, काय झालं संभाषण?.
'आका सोपा नाही...', वाल्मिक कराडचं कनेक्शन थेट अमेरिकेपर्यंत?
'आका सोपा नाही...', वाल्मिक कराडचं कनेक्शन थेट अमेरिकेपर्यंत?.
सैफवर 1 कोटींसाठी जीवघेणा हल्ला? हल्लेखोर शिरलाच कसा? काय घडलं बघा?
सैफवर 1 कोटींसाठी जीवघेणा हल्ला? हल्लेखोर शिरलाच कसा? काय घडलं बघा?.
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....