काय आहे राष्ट्रीय पेन्शन योजना? जाणून घ्या कसा मिळतो लाभ

राष्ट्रीय पेन्शन योजना (NPS) हा निवृत्ती नंतरच्या सुरक्षीत भविष्यासाठी आणि दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी उत्तम पर्याय आहे. या योजेनेंतर्गत खातेदारांना मुदतपूर्व देखील पैसे काढता येतात. 'एनपीएस'चे प्रामुख्यने प्रथम श्रेणी आणि द्वितीय श्रेणी असे दोन प्रकार आहेत.

काय आहे राष्ट्रीय पेन्शन योजना? जाणून घ्या कसा मिळतो लाभ
Follow us
| Updated on: Nov 16, 2021 | 6:10 AM

नवी दिल्ली – राष्ट्रीय पेन्शन योजना (NPS) हा निवृत्ती नंतरच्या सुरक्षीत भविष्यासाठी आणि दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी उत्तम पर्याय आहे. या योजेनेंतर्गत खातेदारांना मुदतपूर्व देखील पैसे काढता येतात. ‘एनपीएस’चे प्रामुख्यने प्रथम श्रेणी आणि द्वितीय श्रेणी असे दोन प्रकार आहेत. जर तुम्हाला मुदतपूर्व पैसे काढायचे झाल्यास द्वितीय श्रेणीमधून अधिक चांगला परतावा मिळू शकतो.

वयाच्या 18 वर्षानंतर कधीही करता येते गुंतवणूक  

राष्ट्रीय पेन्शन योजनेची लोकप्रियता वाढत असून, अनेक नागरिक या योजनेमध्ये गुंतवणूक करत आहेत. या योजेनेचा लाभ खासगी अथवा, सरकारी अशा कोणत्याही कर्मचाऱ्यांना घेता येतो. पेन्शन नियामक पीएफआरडीएने सप्टेंबरमध्ये काढलेल्या एका परिपत्रकानुसार व्यक्तीला या योजनेमध्ये वयाच्या 18 व्या वर्षानंतर कधीही गुंतवणूक करता येते. तुम्हाला जर मुदतपूर्व पैसे काढायचे असल्यास तुम्हाला तुमच्या खात्यावर जमा असलेल्या एकूण रकमेच्या 20 टक्के रक्कम मिळते. तर उर्वरीत रक्कम ही तुम्हाला वयाचे साठ वर्ष पूर्ण झाल्यानंतर पेन्शन स्वरुपात दिली जाते. दरम्यान या योजनेत जर तुम्ही पाच लाखांपर्यंत रक्कम गुंतवलेली असेल तर वयाचे साठ वर्ष पूर्ण केल्यानंतर तुम्ही तुमची सर्व रक्कम खात्यातून काढून घेऊ शकतात. मात्र रक्कम जर 5 लाखांपेक्षा अधिक असेल तर त्यातील 60 टक्के रक्कम ही तुम्हाला काढता येते आणि उर्वरीत 40 टक्के रक्कम ही पेन्शन स्वरुपात दिली जाते.

…लाभार्थ्याचा मृत्यू झाल्यास पुढे काय?

तुम्ही योजनेचे लाभार्थी असाल आणि तुमचा मध्येच मृत्यू झाला तर योजनेचे सर्व लाभ हे नॉमिनीला मिळतात. खात्यातून पैसे पूर्ण काढायचे आहे, की पेन्शनचा लाभ घ्यायचा आहे, हे सर्व निर्णय त्याला घेता येतात. मात्र इथे देखील तोच नियम लागू होतो. जर गुंतवणूक ही 5 लाखांपेक्षा अधिक असेल तर नॉमिनीला देखील 60 टक्केच रक्कम काढता येते. उर्वरती रक्कम ही पेन्शन फंडमध्ये जमा होते.

संबंधित बातम्या 

आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कच्च्या तेलाच्या किमती घसरल्या; देशात पेट्रोल, डिझेलचे दर स्थिर

किड्स पॅन कार्ड कसे काढावे? काय आहेत त्याचे फायदे; जाणून घ्या

फक्त 10 हजारांत सुरू करा हा व्यवसाय, महिन्याला 30000 रुपयांपेक्षा जास्तीची कमाई, पण कशी?

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.