Petrol-Diesel Price | कच्च्या तेलाच्या किंमती निच्चांकी स्तरावर..पेट्रोल-डिझेलच्या किंमती कमी करण्यासाठी सरकारी कंपन्यांवर दबाव

Petrol-Diesel Price | आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती निच्चांकी स्तरावर घसरल्या आहेत. त्याचा फायदा देशातील वाहनधारकांना मिळणार का? पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार का?

Petrol-Diesel Price | कच्च्या तेलाच्या किंमती निच्चांकी स्तरावर..पेट्रोल-डिझेलच्या किंमती कमी करण्यासाठी सरकारी कंपन्यांवर दबाव
पेट्रोल-डिझेलच्या किंमती कमी होणार?Image Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Sep 08, 2022 | 1:25 PM

Petrol-Diesel Price | चीनमध्ये कोरोनाने (Corona in China) पुन्हा डोके वर काढल्याने तिथे टाळेबंदी लागली आहे. त्याचा परिणाम आंतरराष्ट्रीय बाजारावर (International Market) झाला आहे. मागणी घटल्याने कच्च्या तेलाच्या किंमती (Crude oil prices) गेल्या आठ महिन्यांच्या निचांकी स्तरावर पोहचल्या आहेत.

अमेरिकन बँकेचे धोरण

अमेरिकन फेडरल रिझर्व्ह बँकेचे (American Federal Reserve) आक्रमक धोरणामुळेही कच्चे तेल स्वस्त झाले आहे. बँक व्याजदर (Bank Interest Rate) वाढवण्याची तयारी करत आहे. महागाई आटोक्यात आणण्यासाठी करत असलेला हा उपाय कच्च्या तेलावर प्रभाव टाकणारा ठरला आहे.

इतकी घसरली किंमत

क्रूड ऑईल, डबल्यूटीआयच्या किंमतीत 6 टक्क्यांची घसरण झाली. कच्चे तेल 83 डॉलर प्रति बॅरलवर पोहचले आहे. जुलै महिन्यानंतर इंधन दरात आलेली ही सर्वात मोठी घसरण आहे. चीनमधील अनेक भागात सध्या लॉकडाऊन असल्याने कच्च्या तेलाची मागणी घटली आहे. ब्रेंट ऑईल गुरुवारी सकाळी 0.81 टक्के म्हणजे 88.69 वर व्यापार करत होता.

हे सुद्धा वाचा

भारतावर काय झाला परिणाम

कच्च्या तेलाच्या किंमतीमधील ही घसरण भारतीय वाहनधारकांच्या पथ्यावर पडेल की नाही? असा प्रश्न तज्ज्ञ विचारत आहेत. सरकारी तेल कंपन्यांवर पेट्रोल-डिझेलच्या किंमती (Petrol-Diesel Prices) कमी करण्यासाठी दबाव वाढत आहे.

चार प्रमुख शहरातील दर

देशाची राजधानी दिल्लीत गुरुवारी पेट्रोलच्या किंमती 96.72 रुपये आणि डिझेलचे दर 89.62 रुपये प्रति लिटर होते. मुंबईत पेट्रोलचे दर 106.31 रुपये प्रति लिटर तर डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर विक्री होत आहे. कोलकाता मध्ये गुरुवारी पेट्रोल 106.03 रुपये प्रति लिटर तर डिझेलच्या किंमती 92.76 रुपये प्रति लिटर आहे. चेन्नईत पेट्रोलचा भाव 102.63 रुपये प्रति लिटर तर डिझेलचा भाव 94.24 रुपये प्रति लिटर आहे.

किंमत दररोज संध्याकाळी 6 वाजता बदलतात

पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज सकाळी 6 वाजता बदलतात. या नव्या किंमती सकाळी 6 वाजेपासून लागू होतात. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत उत्पादन शुल्क, डीलर कमिशन आणि इतर वस्तू जोडल्यानंतर किंमत जवळजवळ दुप्पट होते.

तुमच्या शहरातील इंधन दर जाणून घ्यायचे आहेत ?

आपण एसएमएसद्वारे (SMS) पेट्रोल-डिझेलचे दररोजचे दर जाणून घेऊ शकता (How to check diesel petrol price daily). इंडियन ऑईलच्या ग्राहकांना RSP टाईप करुन 9224992249 या मोबाईल क्रमांक आणि बीपीसीएल (BPCL) ग्राहकांनी RSP टाईप करुन 9223112222 क्रमांकावर पाठवावा. तर, एचपीसीएल (HPCL) ग्राहक एचपीप्राइस (HPPrice) टाईप करुन तो 9222201122 या मोबाईल क्रमांकावर पाठवून किंमत जाणून घेऊ शकतो.

Non Stop LIVE Update
शिरसाटांकडून लाव रे तो व्हिडीओ, खैरेंच्या 'नमाज'च्या वक्तव्यावरून वाद
शिरसाटांकडून लाव रे तो व्हिडीओ, खैरेंच्या 'नमाज'च्या वक्तव्यावरून वाद.
बाळासाहेब ठाकरेंवर बोलताना भावूक, मोदींची 2024 मधील TV9 वर महामुलाखत
बाळासाहेब ठाकरेंवर बोलताना भावूक, मोदींची 2024 मधील TV9 वर महामुलाखत.
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेचं तिकीट पण शांतीगिरी महाराज खेळ बिघडवणार?
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेचं तिकीट पण शांतीगिरी महाराज खेळ बिघडवणार?.
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?.
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले.
शिवसेना का सोडली? बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्रात राणेंनी काय म्हटलं?
शिवसेना का सोडली? बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्रात राणेंनी काय म्हटलं?.
महायुतीत कुठल्या पक्षाला, किती जागा? जागावाटपाचा फॉर्म्युला कसा?
महायुतीत कुठल्या पक्षाला, किती जागा? जागावाटपाचा फॉर्म्युला कसा?.
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेची उमेदवारी, छगन भुजबळ नाराज? काय म्हणाले?
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेची उमेदवारी, छगन भुजबळ नाराज? काय म्हणाले?.
ठाणे लोकसभेतून उमेदवारी जाहीर, नरेश म्हस्केंची पहिली प्रतिक्रिया काय?
ठाणे लोकसभेतून उमेदवारी जाहीर, नरेश म्हस्केंची पहिली प्रतिक्रिया काय?.
अखेर कल्याण-ठाण्याचे उमेदवार शिंदे गटातून जाहीर, कुणाला लोकसभेच तिकीट?
अखेर कल्याण-ठाण्याचे उमेदवार शिंदे गटातून जाहीर, कुणाला लोकसभेच तिकीट?.