Breaking : IRCTC ची वेबसाईट झाली ठप्प, ऑनलाईन तिकीट बुकिंगवर मोठा परिणाम

ठप्प झालेल्या आयआरसीटीसीमुळे लाखो लोकांना ऑनलाीन तिकीट बुकिंगमध्ये समस्या येत आहे.

Breaking : IRCTC ची वेबसाईट झाली ठप्प, ऑनलाईन तिकीट बुकिंगवर मोठा परिणाम
आयआरसीटीसीच्या अ‍ॅपवर बंपर ऑफर

नवी दिल्ली : कोरोनाच्या भयंकर काळानंतर आता कुठे लोकांनी प्रवास करणं सुरू केलं आहे. अशात ट्रेनने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. कारण, इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (IRCTC) ची वेबसाइट ठप्प झाली आहे. यामुळे ऑनलाईन तिकीट बुकिंगवर याचा मोठा परिणाम झाल्याचं पहायला मिळत आहे. आयआरसीटीसीने ट्विट करून यासंबंधी महत्त्वाची माहिती दिली आहे. (railway news irctc website stop due to some technical issue affect on train ticket booking)

आयआरसीटीसीने त्यांच्या ट्विटमध्ये दिलेल्या माहितीनुसार, वेबसाईटवर काही तांत्रिक बिघाड झाल्यामुळे साईट ठप्प झाली आहे. यामुळे तिकीट बुकिंगही होत नाही आहे. यावर सध्या काम सुरू असल्याची माहितीही देण्यात आली आहे. तर ठप्प झालेल्या आयआरसीटीसीमुळे लाखो लोकांना ऑनलाीन तिकीट बुकिंगमध्ये समस्या येत आहे.

खरंतर, गेल्या वर्षी डिसेंबर 2020 मध्ये रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी आयआरसीटीसीची नवीन वेबसाइट आणि मोबाइल अॅप सुरू केलं होतं. यामुळे प्रवाश्यांना घर बसल्या तिकीट काढता येत आहे. आताच्या वेगवान जगात ग्राहकांना उत्तम सेवा देण्यासाठी ही सुविधा देण्यात आली होती.

IRCTC कडून बसचे तिकिट बुक करण्याचीही सुविधा

आयआरसीटीसीने या महिन्यात त्यांच्या अधिकृत वेबसाईटवरून बसच्या तिकिटांचं बुकिंगही सुरू केलं आहे. या साइटच्या मदतीने, प्रवासी रेल्वेप्रमाणेच बसची तिकिटंही बुक करू शकतात. आयआरसीटीसीने 50 हजाराहून अधिक राज्य रस्ते वाहतूक आणि खासगी बस ऑपरेटर यांच्याबरोबर बसची तिकिटे बुकिंगसाठी करार केला असल्याची माहिती देण्यात आली आहे. या नव्या सेवेत प्रवासी 22 राज्ये आणि तीन केंद्रशासित प्रदेशात बसचे तिकिट बुकिंग करू शकतात.

दरम्यान, कोरोनाच्या कठीण काळात आता कुठे आपलं मानसिकरित्या स्थिर होत असताना सगळं पुर्वीसारखं झाल्याचं वाटत आहे. अशात अनेकजण निसर्गाचा आनंद घेण्याचा ठरवतात आणि फिरण्याचा प्लॅन करतात. जर तुम्हीही एप्रिल महिन्यात कुठेतरी फिरण्याचा प्लॅन करत असाल तर आज तुम्हाला आम्ही खास बातमी सांगणार आहोत. आयआरसीटीसीकडून एका उत्तम ऑफर देण्यात आली आहे. ज्यामध्ये तुम्ही कुठलीही काळजी न करता स्वस्तात प्रवास करू शकता. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा प्रवास एक रात्र आणि दोन दिवसांचा असणार आहे. जाणून घेऊयात नेमकी काय आहे खास योजना.

तुम्ही ‘या’ तारखांना फिरण्यासाठी जाऊ शकता

या सहलीमध्ये फिरण्यासाठी तुम्ही 10 एप्रिल 2021, 17 एप्रिल 2021, 24 एप्रिल 2021, 1 मे 2021, 8 मे 2021, 15 मे 2021, 22 मे 2021 आणि 29 मे 2021 रोजी फिरण्यासाठी निघू शकता. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या पॅकेजचा फायदा घेण्यासाठी तुम्हाला बुकिंगच्या वेळी Code:WMA17 वापरावा लागेल. तरच तुम्ही बुकिंग करू शकता.

यासाठी तुम्ही अधिकृत आणि पक्की माहिती मिळवण्यासाठी या https://www.irctctourism.com/tourpackageBooking?packageCode=WMA17 लिंकवर जा. यामध्ये तुम्हाला सर्व पश्नांची उत्तरं मिळतील. (railway news irctc website stop due to some technical issue affect on train ticket booking)

संबंधित बातम्या – 

Indian railways : रेल्वे देत आहे स्वस्तात तिरूपति फिरण्याची ऑफर, आताच करा ‘या’ कोडसह बुकिंग

Travel | पर्यटनाला चालना देण्यासाठी ‘या’ राष्ट्रीय उद्यानात पहिल्यांदाच सायकल सफारी! तुम्हीही घेऊ शकता आनंद…

Travel | IRCTCची ‘रामायण यात्रा’, स्वस्तात करता येणार ‘या’ धार्मिक स्थळांची सफर!

(railway news irctc website stop due to some technical issue affect on train ticket booking)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI