नवी दिल्ली – काही दिवसांपूर्वी आयआरसीटीसीच्या वतीने रामायण स्पेशल ट्रेन सुरू करण्यात आली होती. रेल्वेच्या या उपक्रमाला भाविकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे आता धार्मिक पर्यटनासाठी आणखी काही स्पेशल ट्रेन सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नव्याने सुरू होणाऱ्या स्पेशल ट्रेनच्या माध्यमातून शिख धर्मियांची सर्व महत्त्वाची पवित्र स्थळे जोडण्यात येणार आहेत. यासोबतच येणाऱ्या काळात आणखी काही अशा धार्मिक ट्रेन सुरू करण्याचा रेल्वे प्रशासनाचा विचार असून, त्यासाठी एखाद्या खासगी कंपनीला देखील नियुक्त केले जाणू शकते.