AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘एसबीआय’ची ग्राहकांसाठी खास ऑफर; गोल्ड लोन झाले स्वस्त, जाणून घ्या काय आहेत नवे व्याजदर?

देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इडिंयाने (sbi)  आपल्या ग्राहकांसाठी एक चांगली ऑफर आणली आहे. बँकेने गोल्ड लोनवर आकारण्यात येणाऱ्या व्याजाच्या दरात कपात केली आहे.

'एसबीआय'ची ग्राहकांसाठी खास ऑफर; गोल्ड लोन झाले स्वस्त, जाणून घ्या काय आहेत नवे व्याजदर?
| Edited By: | Updated on: Nov 17, 2021 | 7:10 AM
Share

नवी दिल्ली – देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इडिंयाने (sbi)  आपल्या ग्राहकांसाठी एक चांगली ऑफर आणली आहे. बँकेने गोल्ड लोनवर आकारण्यात येणाऱ्या व्याजाच्या दरात कपात केली आहे. त्यामुळे आता ग्राहकांना एसबीआयकडून 7.50 टक्क्यांच्या वार्षिक व्याजदराने गोल्ड लोन उपलब्ध होणार आहे. तसेच ग्राहकाला आपल्या सोईनुसार 20 हजारांपासून ते 50 लाखांपर्यंत गोल्ड लोन घेता येणार आहे. याबाबत एसबीआयने ट्विट करत माहिती दिली आहे.

प्रोसेसिंग फी विरहीत कर्ज 

एसबीआयने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, आमच्या ग्राहकांसाठी बँकेने एक चांगली ऑफस आणली आहे. बँक ग्राहकांना स्वस्त दरात अवघ्या 7.50 टक्क्यांच्या व्याजदराने गोल्ड लोन उपलब्ध करून देत आहे. गोल्ड लोन घेताना ग्राहकाकडून कोणतीही प्रोसेसिंग फी  आकारण्यात येणार नाही. तसेच कमीत कमी कागद पत्रांमध्ये ग्राहकाला गोल्ड लोन उपलब्ध करून देण्यात येईल. ग्राहक त्यांच्या इच्छेनुसार बँकेतून 20 हजारांपासून ते 50 लाखांपर्यंत कितीही गोल्ड लोन घेऊ शकतात. ग्राहकाला लोन कमीत कमी वेळेत उपलब्ध करून देण्यात येईल.

गोल्ड लोनसाठी ‘असे’ करा अप्लाय 

लोनसाठी तुम्ही बँकेच्या वेबसाईटवरून ऑनलाईन अर्ज देखील करू शकता. त्यानंतर अवघ्या तीन सोप्या स्टेपमध्ये तुम्हाला लोन उपलब्ध करून दिले जाते. तुम्ही बँकेत लोनसाठी अर्ज केल्यानंतर सर्व प्रथम तुमच्याकडे किती सोने आहे, सध्याचे सोन्याचे दर काय आहेत हे पाहीले जाते. त्यावरून तुम्हाला किती गोल्ड लोन भेटणार हे ठरते. ते ठरल्यानंतर तुम्ही जे लोन घेणार आहात, त्याच्यासाठी बँकेकडून काही खास ऑफर सुरू आहेत का? त्या ऑफरचा लाभ तुम्हाला मिळू शकतो का? हे चेक केले जाते. त्यानंतर तुमच्याकडून कागदपत्रांची पुर्तता झाल्यानंतर लोन तुमच्या बँक खात्यात जमा केले जाते.

संबंधित बातम्या 

1st Audit Day: ‘आधीच्या सरकारांमध्ये NPA वाढतच गेले, आम्ही त्यांचे सत्य देशासमोर मांडले’- पंतप्रधान मोदी

स्वस्तामध्ये घर घेण्याची संधी; बँक ऑफ बडोदाकडून थकबाकीदारांच्या संपत्तीचा लिलाव, जाणून घ्या कसे होता येईल लिलावामध्ये सहभागी

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या; जाणून घ्या देशात पेट्रोल स्वस्त होणार की महागणार?

महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.