Gold Silver Rate Today : असा रेकॉर्ड होणे नाही, मे महिना पावला! सोने-चांदीची महिनाभर स्वस्ताई

Gold Silver Rate Today : ऐन लग्नसराईत सोने-चांदीने मान टाकल्याने वधू-वरांकडील मंडळीच्या चेहऱ्यावर हास्य फुलले. फेब्रुवारी, मार्च, एप्रिल महिन्यात सोन्याने रेकॉर्डवर रेकॉर्ड केले होते. किंमतीवर सोने आरुढ होते.

Gold Silver Rate Today : असा रेकॉर्ड होणे नाही, मे महिना पावला! सोने-चांदीची महिनाभर स्वस्ताई
स्वस्ताईचा मुहूर्त
Follow us
| Updated on: May 30, 2023 | 10:06 AM

नवी दिल्ली : सोने-चांदीने ऐन लग्नसराईत सुखद धक्का दिला. फेब्रुवारी, मार्च, एप्रिल महिन्यात सोन्याने रेकॉर्डवर रेकॉर्ड केले होते. किंमतीवर सोने आरुढ होते. पण संपूर्ण मे महिन्यात सुरुवातीला काही दिवस वगळता सोने-चांदीचे भाव (Gold Silver Price) आटोक्यात होते. या महिन्यात या दोन्ही मौल्यवान धातूंनी दरवाढीचा रेकॉर्ड मोडला नाही. कमाल घसरणही झाली नाही. पण उच्चांकी किंमतीपेक्षा आज सोने जवळपास दोन हजारांच्या घरात स्वस्त झाले आहे. तर चांदीने सर्वाधिक दिलासा दिला आहे. चांदीच्या किंमती 73,000 रुपये किलोंच्या घरात आहे. हे भाव अजून कमी होण्याची शक्यता आहे. अमेरिका आणि युरोपातील घडामोंडीवर किंमतींचा आलेख अवलंबून आहे.

2 मे रोजी होता हा भाव गुडरिटर्न्सनुसार, 2 मे रोजी, सकाळच्या सत्रात 22 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम, 55,850 रुपये तर 24 कॅरेटचा भाव 61,090 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. सोन्याच्या किंमतीत मोठा बदल झाला नाही. तर एक किलो चांदीचा 76,000 रुपये भाव आहे.

आजचा भाव काय goodreturns च्या आकडेवारीनुसार, 30 मे रोजी, सकाळच्या सत्रात सोन्यात प्रति 10 ग्रॅम 50 रुपयांची घसरण झाली. मंगळवारी 22 कॅरेटचा भाव 55,650 रुपये तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 60,700 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर एक किलो चांदीचा भाव 73,000 रुपये आहे. IBJA नुसार,मंगळवारी 24 कॅरेट सोन्याचा भाव 60,012 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. तर 22 कॅरेटचा भाव 54,917 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. तर एक किलो चांदीचा भाव 70,782 रुपये आहे.

हे सुद्धा वाचा

24, 23, 22 कॅरेटचा भाव ibjarates.com नुसार, 24 कॅरेट सोन्याचा भाव 60,012 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. 23 कॅरेटचा भाव 59,772 रुपये तर 22 कॅरेटचा भाव 54,917 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. 18 कॅरेट सोन्याचा भाव 45,009 रुपये होता. हे भाव काल संध्याकाळचे आहेत.

भाव एका मिस्ड कॉलवर 22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोने खरेदीपूर्वी तुम्हाला त्याची किंमत एका मिस कॉलवर कळू शकते. त्यासाठी 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊ शकता. त्यानंतर थोड्याचवेळात एसएमएस (SMS) येईल. त्याआधारे तुम्हाला किंमती कळतील. तसेच भाव जाणून घेण्यासाठी तुम्ही www.ibja.co वा ibjarates.com या ठिकाणी माहिती घेऊ शकता.

BIS Care APP सोनार तुम्हाला गंडवत असल्याची शंका असल्यास, अथवा तुम्हाला सोन्याची शुद्धता तपासायची असल्यास तुमच्या मोबाईलमध्ये BIS Care APP डाऊनलोड करा. प्ले स्टोअरमध्ये जाऊन तुम्ही हे बीआयएस ॲप घेऊ शकता. तुम्ही खरेदी केलेल्या सोन्यावर त्याचा हॉलमार्क क्रमांक (HUID) अंकित असतो. हा क्रमांक टाकल्यास हॉलमार्किंगची संपूर्ण माहिती समोर येईल आणि सर्वात शेवटी हे सोने किती कॅरेटचे आहे ते दिसेल.

बीडचं पालकमंत्री दादांकडे, कोणत्या कारणानं पालकमंत्रीपद हातून निसटलं?
बीडचं पालकमंत्री दादांकडे, कोणत्या कारणानं पालकमंत्रीपद हातून निसटलं?.
'राणेंनी बोलू नये', मराठा आरक्षणावरून नारायण राणे-जरांगेंमध्ये जुंपली
'राणेंनी बोलू नये', मराठा आरक्षणावरून नारायण राणे-जरांगेंमध्ये जुंपली.
धनंजय मुंडे यांचं सुरेश धस अन् मनोज जरांगे पाटलांना खुलं आव्हान
धनंजय मुंडे यांचं सुरेश धस अन् मनोज जरांगे पाटलांना खुलं आव्हान.
पालकमंत्रीपदावरून शिवसेना नाराज? एकनाथ शिंदे पुन्हा दरे गावी?
पालकमंत्रीपदावरून शिवसेना नाराज? एकनाथ शिंदे पुन्हा दरे गावी?.
G-Pay नं पेमेंट अन् सुगावा, मध्यरात्री सैफच्या आरोपीला ठोकल्या बेड्या
G-Pay नं पेमेंट अन् सुगावा, मध्यरात्री सैफच्या आरोपीला ठोकल्या बेड्या.
पहाटेचा शपथविधी एक षडयंत्र, धनंजय मुंडे यांचा नेमका कोणाकडे इशारा?
पहाटेचा शपथविधी एक षडयंत्र, धनंजय मुंडे यांचा नेमका कोणाकडे इशारा?.
प्रयागराजच्या महाकुंभ मेळ्यात अग्नितांडव, आगीत 100 हून तंबू जळून खाक
प्रयागराजच्या महाकुंभ मेळ्यात अग्नितांडव, आगीत 100 हून तंबू जळून खाक.
'मीच दादांना पालकमंत्रीपद घेण्याची विनंती केली, कारण..' - धनंजयय मुंडे
'मीच दादांना पालकमंत्रीपद घेण्याची विनंती केली, कारण..' - धनंजयय मुंडे.
'मी दादांना सांगितलं होतं की..',पहाटेच्या शपथविधीवरून मुंडेंचं वक्तव्य
'मी दादांना सांगितलं होतं की..',पहाटेच्या शपथविधीवरून मुंडेंचं वक्तव्य.
धनंजय मुंडेंना सरपंच हत्या प्रकरण भोवलं? बीड पालकमंत्रीपदाचा पत्ता कट
धनंजय मुंडेंना सरपंच हत्या प्रकरण भोवलं? बीड पालकमंत्रीपदाचा पत्ता कट.