Income Tax Return : अपडेटेड आयटीआर फाईल केले का? अंतिम संधी सोडाल तर नाही मिळणार सवलत

Income Tax Return : करदात्यांना अद्ययावत आयटीआर भरण्याची शेवटची संधी आहे. आयकर विभागाने करदात्यांसाठी ही सवलत दिली आहे. ट्विट करुन विभागाने करदात्यांनी या सवलतीचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.

Income Tax Return : अपडेटेड आयटीआर फाईल केले का? अंतिम संधी सोडाल तर नाही मिळणार सवलत
Follow us
| Updated on: Mar 16, 2023 | 4:49 PM

नवी दिल्ली : करदात्यांना डिसेंबरनंतर पुन्हा एकदा अद्ययावत प्राप्तिकर रिटर्न (Updated ITR Filing) भरण्याची संधी मिळाली आहे. आयकर विभागाने याविषयीचे ट्विट करत माहिती दिली आहे. त्यानुसार, ज्या करदात्यांना 31 डिसेंबर, 2022 ही सुधारीत आयकर रिर्टन (Updated ITR Filing) दाखल करण्याची तारीख हुकली. त्यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. आर्थिक वर्ष 2021-22 (AY 2022-23) साठी ज्यांना आयकर रिटर्न भरण्यासाठी विलंब झाला. त्यांच्यासाठी ही शेवटची संधी आहे. केंद्र सरकारने ही संधी दिली आहे. अर्थसंकल्प 2022 मधील आयटीआर यू (ITR-U) भरण्याची संधी ज्यांनी गमावली, त्यांना ही सवलत मिळत आहे.

त्यानुसार, मूल्यांकन वर्ष 2020-21साठी करदात्यांना व्याज आणि कराच्या 50 टक्के रक्कम द्यावी लागेल. मूल्यांकन वर्ष 2021-22 आणि मूल्यांकन वर्ष 2022-23 साठी एकूण कर आणि व्याजाची 25 टक्के रक्कम जमा करावी लागेल. यापूर्वी एका व्यक्तीला तीन प्रकारचे आयकर रिटर्न दाखल करता येत होते. 31 डिसेंबरपूर्वी हे आयटीआर दाखल करता येत होते. करदात्यांना या प्रकरणात मूल्यांकन वर्ष 31 मार्च, 2023 संपण्यापूर्वी अपडेटेड ITR, ITR-U दाखल करता येत नाही.

ITR-U दाखल करणारी व्यक्तीला दंड रुपाने व्याजाची रक्कम भरावी लागते. आर्थिक वर्ष 2021-22 साठी ITR-U पहिल्या संबंधित मूल्यांकन वर्षात – म्हणजे एप्रिल 1, 2023 आणि 31 मार्च, 2024 दरम्यान भरला असेल. जर ITR-U 1 एप्रिल, 2024 आणि मार्च दरम्यान दाखल केला असेल 31, 2025 नंतर थकीत करावर 50 टक्के अतिरिक्त कर भरावा लागतो.

हे सुद्धा वाचा

अपडेटेड रिटर्न दाखल करण्यासाठी अटी आहेत. त्यानुसार, यापूर्वी एखाद्या व्यक्तीने कोणताही आयटीआर दाखल केला नसेल, त्याच्याकडे कोणताच प्राप्तिकर थकलेला नसेल, तर त्याला अद्ययावत प्राप्तिकर रिटर्न भरता येतो. परंतु, कलम 234F अंतर्गत रिटर्न उशीरा दाखल केल्याने त्या करदत्याला दंड द्यावा लागतो. त्याच्यावर दंडात्मक कार्यवाही होते.

हे ठेवा लक्षात

तुम्ही इन्कम टॅक्स रिटर्न (विलंबित, सुधारित किंवा अपडेट केलेले) भरल्यानंतर, 30 दिवसांच्या आत त्याची पडताळणी करणे आवश्यक आहे. तुम्ही प्राप्तिकर रिटर्न भरल्याचा पडताळा केला नाही. ते सत्यापित केले नाही. तर आयकर विभाग ते पुढील प्रक्रियेसाठी घेणार नाही. एवढेच नाही तर तुम्ही प्राप्तिकर रिटर्न भरल्याचे नसल्याचे गृहीत धरण्यात येईल.

किती लागतो दंड

  1. आयकर कायदा 1961 च्या कलम 234F अंतर्गत याविषयीची माहिती देण्यात आली आहे.
  2. 31 जुलै 2022 या देय तारखेनंतर ITR दाखल करणार्‍या व्यक्तीवर 5,000 रुपये दंड आकारल्या जातो
  3. 5 लाखांपर्यंत करपात्र उत्पन्न असलेल्या करदात्यांना केवळ 1,000 रुपये दंड भरावा लागतो
  4. विलंबित आयटीआर दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यापूर्वी हे विलंब फाइलिंग शुल्क जमा करावे लागते
  5. अपडेटेड आयटीआर भरण्याची प्रक्रिया सामान्य आयटीआर सारखीच असते
  6. आयकर कायदा, 1961 च्या कलम 139 (8A) अंतर्गत ITR-U दाखल करता येतो

मंत्रिमंडळ विस्ताराचं पत्र राज्यपालांना देणार, १९९१ नंतर पहिल्यांदाच..
मंत्रिमंडळ विस्ताराचं पत्र राज्यपालांना देणार, १९९१ नंतर पहिल्यांदाच...
श्रीकांत शिंदेंचा राहुल गांधींना संसदेत थेट सवाल, 'तुमच्या आजी...'
श्रीकांत शिंदेंचा राहुल गांधींना संसदेत थेट सवाल, 'तुमच्या आजी...'.
फडणवीसांच्या 'सागर'वर घडतंय काय? शपथविधीआधीच मनसेचा नेता भेटीला अन्...
फडणवीसांच्या 'सागर'वर घडतंय काय? शपथविधीआधीच मनसेचा नेता भेटीला अन्....
घाटकोपर पूर्व द्रुतगती मार्गावर भीषण अपघात, क्रेन कोसळली अन्...
घाटकोपर पूर्व द्रुतगती मार्गावर भीषण अपघात, क्रेन कोसळली अन्....
मुख्यमंत्री फडणवीसांचं अनोखं स्वागत, थेट 'लाडकी बहीण'ची रांगोळी अन्..
मुख्यमंत्री फडणवीसांचं अनोखं स्वागत, थेट 'लाडकी बहीण'ची रांगोळी अन्...
'आता राम आठवतोय, उद्धव ठाकरे नौटंकी...', किरीट सोमय्यांचा हल्लाबोल
'आता राम आठवतोय, उद्धव ठाकरे नौटंकी...', किरीट सोमय्यांचा हल्लाबोल.
शिंदेंच्याच दोन बड्या नेत्यांची मंत्रिपदासाठी धडपड अन् भेट नाकारली
शिंदेंच्याच दोन बड्या नेत्यांची मंत्रिपदासाठी धडपड अन् भेट नाकारली.
आडवाणींची तब्येत बिघडली, गेल्या 4-5 महिन्यात चौथ्यांदा रूग्णालयात दाखल
आडवाणींची तब्येत बिघडली, गेल्या 4-5 महिन्यात चौथ्यांदा रूग्णालयात दाखल.
उद्याच महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार, कोणता फॉर्म्युला झाला डन?
उद्याच महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार, कोणता फॉर्म्युला झाला डन?.
कोल्हापूरच्या नृसिंहवाडीत दत्त जयंतीचा उत्साह, भक्तांची अलोट गर्दी
कोल्हापूरच्या नृसिंहवाडीत दत्त जयंतीचा उत्साह, भक्तांची अलोट गर्दी.