AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ISRO मध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी, 1 लाखापेक्षा मिळणार जास्त पगार; असा अर्ज करा

ISRO Recruitment : भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोमध्ये अनेक पदांसाठी भरती होणार आहे. यासाठी ऑनलाईन अर्ज करू शकता. अर्ज करण्याची पूर्ण प्रोसेस जाणून घ्या.

ISRO मध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी, 1 लाखापेक्षा मिळणार जास्त पगार; असा अर्ज करा
ISRO मध्ये अनेक पदांसाठी होणार भरती, लाखोंच्या घरात पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची पूर्ण प्रक्रिया
| Updated on: Apr 18, 2023 | 6:07 PM
Share

मुंबई : भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत (इस्रो) काम करण्याचं अनेकांचं स्वप्न असतं. पण तिथे कसं पोहोचणार? त्यासाठी काय करावं लागतं? असे बरेचशे प्रश्न पडल्याशिवाय राहात नाही. पण जर तुम्हाला खरंच इस्रोमध्ये नोकरी करायची इच्छा असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. इस्रोमध्ये टेक्निकल असिस्टेंट, टेक्निशियन बी, ड्रट्समॅन, हेवी व्हेइकल ड्रायव्हर ए, लाइट व्हेइकल ड्रायव्हर ए आणि फायरमन या पदांसाठी भरती केली जाणार आहे. इच्छुक उमेदवार ऑनलाईन अर्ज दाखल करू शकतात. या पदांसाठी तुम्ही अधिकृत वेबसाईटवर 24 एप्रिल 2023 पर्यंत अर्ज करू शकता. इस्रोने यासाठी एक अधिसूचना जारी केली आहे.

इस्रोमध्ये 63 पदांची भरती केली जाणार आहे. यात टेक्निशयनसाठी 30, टेक्निशियन असिस्टेंटसाठी 24 आणि अन्य पदांसाठी 9 जणांची भरती केली जाणार आहे.

पात्रता

टेक्निशियन पदांसाठी अर्ज करणारा उमेदवार 10 वी पास आणि फिटर ट्रेडमध्ये आयटीआय पास असणं गरजेचं आहे. टेक्निकल असिस्टेंट पदासाठी मॅकेनिकल इंजिनिअर किंवा प्रोडक्शनमध्ये डिप्लोमाधारक असावा. अर्ज करणाऱ्या उमेदवारीचं वय 35 वर्षे असावं.

नोकरीसाठी अर्ज असा कराल

  • इस्रोच्या अधिकृत वेबसाईट iprc.gov.in/iprc वर जा.
  • करिअर पेजवर क्लिक करा
  • एक नवीन पेज तुमच्या स्क्रीनवर ओपन होईल
  • सर्व आवश्यक डिटेल्स चेक करा आणि अप्लाय बटणावर क्लिक करा.
  • आता तुम्ही अॅप्लिकेशन फॉर्म लिंकवर जाल
  • तुमच्या आवडत्या पोस्टसाठी अर्ज करा.
  • अॅप्लिकेशन फॉर्म फिल करा आणि डॉक्युमेंट्स अपलोड करा.
  • शेवटी अॅप्लिकेशन फी भरून फॉर्म सबमिट करा.

अर्ज भरण्याची फी किती ?

  • टेक्निकल असिस्टेंट : 750 रुपये
  • टेक्निशियन बी ड्राट्समॅन फायरमॅन लाइट व्हेइकल ड्रायव्हर हेवी व्हेइकल ड्रायव्हर : 500 रुपये

ही फी तुम्ही ऑनलाईन पद्धतीने भरू शकता.या व्यतिरिक्त क्रेडिट, डेबिट कार्ड किंवा नेट बँकिंगच्या माध्यमातून भरू शकता.

किती पगार मिळणार ?

  • टेक्निकल असिस्टेंट : 44,900 रुपयांपासून 1,49,400 रुपयांपर्यंत
  • टेक्निशियन ‘बी’ ड्राट्समॅन : 21,700 रुपयांपासून 69,100 रुपयांपर्यंत
  • फायरमॅन/हेवी व्हेइकल ड्रायव्हर/लाइट व्हेइकल ड्रायव्हर : 19,900 रुपयांपासून 63,200 रुपयांपर्यंत

उमेदवारांची निवड कशी होणार ?

इस्रोमध्ये उमेदवारांची निवड लिखित परीक्षेच्या आधारे होईल. ही परीक्षा कंप्युटर बेस्ड टेस्ट फॉर्मेटमध्ये असेल. परीक्षेसाठी देशातील विविध शहरांमध्ये अर्ज करता येईल.https://www.iprc.gov.in/iprc/careers.html या लिंकवरून तुम्ही थेट माहिती घेऊ शकता.

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.