MHT CET Result 2021 : एमएचटी सीईटी परीक्षेच्या निकालाची तारीख जाहीर; पुढील आठवड्यात ‘आन्सर की’ मिळणार

MHT CET 2021 ची पुन्हा परीक्षा 9 ऑक्टोबर आणि 10 ऑक्टोबर 2021 रोजी घेण्यात येईल. महाराष्ट्रात मुसळधार पावसामुळे परीक्षेला बसू न शकलेल्या विद्यार्थ्यांसाठी ही परीक्षा घेण्याचा निर्णय घेण्यात आला.

MHT CET Result 2021 : एमएचटी सीईटी परीक्षेच्या निकालाची तारीख जाहीर; पुढील आठवड्यात 'आन्सर की' मिळणार
एमएचटी सीईटी परीक्षेच्या निकालाची तारीख जाहीर

मुंबई : राज्य सामान्य प्रवेश परीक्षा सेल, महाराष्ट्रने (स्टेट कॉमन एंट्रेंस टेस्ट सेल) MHT- CET 2021 च्या निकालाची तारीख जाहीर केली आहे. MHT सामायिक प्रवेश परीक्षेचा निकाल 28 ऑक्टोबर 2021 रोजी किंवा त्यापूर्वी जाहीर केला जाणार आहे. उमेदवार स्टेट कॉमन एन्ट्रन्स टेस्ट सेलच्या cetcell.mahacet.org या अधिकृत वेबसाइटवर अधिकृत सूचना पाहू शकतात. सर्व सत्र परीक्षांच्या ‘आन्सर की’ 11 ऑक्टोबर 2021 रोजी जारी केल्या जातील. अधिकृत वेळापत्रकानुसार उमेदवार 12 ऑक्टोबर ते 13 ऑक्टोबर 2021 पर्यंत संध्याकाळी 5 वाजेपर्यंत अधिकृत संकेतस्थळाद्वारे ‘अन्सर की’संबंधी आपले आक्षेप नोंदवू शकतात. (MHT CET exam result date announced; The answer key will be available next week)

MHT CET 2021 ची पुन्हा परीक्षा 9 ऑक्टोबर आणि 10 ऑक्टोबर 2021 रोजी घेण्यात येईल. महाराष्ट्रात मुसळधार पावसामुळे परीक्षेला बसू न शकलेल्या विद्यार्थ्यांसाठी ही परीक्षा घेण्याचा निर्णय घेण्यात आला. परीक्षेच्या तारखा जाहीर करताना उच्च शिक्षण आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी ट्विट केले आहे. “आज मुंबईत पत्रकारांशी संवाद साधला! यावेळी जाहीर करण्यात आले की पूरग्रस्त विद्यार्थ्यांची सीईटी परीक्षा 9 आणि 10 ऑक्टोबर 2021 रोजी घेण्यात येईल,” असे सामंत यांनी ट्विट केले आहे. तथापि, सेलने 28 ऑक्टोबर रोजी फेरपरीक्षेचा निकाल आणि 11 ऑक्टोबरला ‘अन्सर की’ कळवण्याबाबत कोणतेही अधिकृत अपडेट केलेले नाही. राज्य कॉमन एन्ट्रन्स टेस्ट सेल, महाराष्ट्रच्या अधिकृत साइटद्वारे उमेदवार अधिक संबंधित तपशील तपासू शकतात.

सीएस फाउंडेशन परीक्षेची तारीख जाहीर

इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडियाने (ICSI) सीएस फाउंडेशन परीक्षा 2021च्या तारखा जाहीर केल्या आहेत. डिसेंबर सत्राची परीक्षा 3 आणि 4 जानेवारी 2022 रोजी होणार आहे. जे उमेदवार परीक्षेला बसणार आहेत, ते ICSI च्या icsi.edu या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन नोटीस तपासू शकतात. संस्थेने डिसेंबर 2021 सत्रापासून रिमोट प्रोक्टोरिंगद्वारे फाउंडेशन प्रोग्रामसाठी (ICSI CS फाउंडेशन परीक्षा 2021) संगणक आधारित परीक्षा आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे.

दोन्ही दिवसांच्या परीक्षा चार शिफ्टमध्ये घेण्यात येतील. पहिली शिफ्ट सकाळी 9.30 ते 11, दुसरी शिफ्ट दुपारी 12 ते 1.30, तिसरी शिफ्ट दुपारी 2.30 ते दुपारी 4 आणि चौथी शिफ्ट संध्याकाळी 5 ते संध्याकाळी 6.30 पर्यंत. पेपर 1 आणि पेपर 2 पहिल्या दिवशी आणि पेपर 3 आणि पेपर 4 दुसऱ्या दिवशी घेण्यात येतील. (MHT CET exam result date announced; The answer key will be available next week)

पूल, रस्ते गेले, 36 लाख हेक्टरवरील पीक पाण्यात, मराठवाड्यात तब्बल 4 हजार कोटींचं नुकसान

Rain Update | पुण्यात पावसामुळे दाणादाण, सखल भागात पाणी साचलं, आगामी 4 दिवसांत राज्यात मुसळधार

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI