Railway recruitment 2023: रेल्वेत परीक्षा न देता डायरेक्ट भरती, कसं आणि कुठे कराल अर्ज; जाणून घ्या
रेल्वेमध्ये काम करण्यासाठी अनेक तरुणांची इच्छा असते. निदान अनुभव गाठीशी असला तरी भविष्यात काम सोपं होईल यासाठी धडपड असते. अपरेंटिसशिप ट्रेनिंगसाठी रेल्वे भरती सेल वेस्टर्न रिजनन 3000 हून अधिक जागा भरणार आहे. चला जाणून घ्या संपूर्ण प्रोसेस..

Railway recruitment 2023: रेल्वेत काम करण्याची सुवर्णसंधी, परीक्षा न देताच होणार निवड! काय आहे प्रोसेस समजून घ्या
मुंबई : रेल्वेचं जाळं संपूर्ण देशभरात पसरलं आहे. जगात भारतीय रेल्वे चौथ्या स्थानी येते. त्यामुळे रेल्वेत काम करण्याची अनेकांना इच्छा असते. मात्र परीक्षेतील अपयश आणि किचकट प्रक्रियेमुळे काम करण्याची संधी मिळत नाही. आता रेल्वे भरती सेल वेस्टर्न रिजनने अपरेंटिसशिप ट्रेनिंग पदांसाठी एकूण 3624 जागांची घोषणा केली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार 27 जून 2023 पासून अर्ज दाखल करू शकतात. अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख 26 जुलै 2023 आहे. अर्जदार अधिकृत वेबसाईट rrc-wr.com वर अर्ज करू शकतो.
नोकरीसाठी शैक्षणिक पात्रता आणि वय
- मान्यता प्राप्त बोर्डातून कमीत कमी 50 टक्के गुणांनी दहावी पास होणं आवश्यक आहे.
- अर्ज करणाऱ्या उमेदवाराची वय कमीत कमी 15 वर्षे असणं गरजेचं आहे. जास्तीत जास्त वय 24 ग्राह्य धरलं जाईल.
- अर्जदाराची निवड मेरिटच्या आधारावर केली जाईल.
- मेरिट लिस्ट दहावी बारावी आणि आयटीआयला मिळालेल्या गुणांच्या आधारे होईल.
- अर्ज करण्यासाठी उमेदवारांना 100 रुपये शुल्क भरावे लागेल.
- एससी/एसटी/पीडब्ल्यूडी/महिला अर्जदारांना फी नसेल.
अपरेंटिसशिप ट्रेनिंग पदांसाठी अर्ज कसा कराल?
- या पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी पहिल्यांदा अधिकृत वेबसाईट rr-wr.com वर लॉगिन करावं.
- वेबसाईटच्या होमपेजवर अर्ज करण्यासाठी लिंक दिली आहे त्यावर क्लिक करा.
- आता येथे दिलेले सर्व रकाने व्यवस्थित वाचा. या ठिकाणी मागितलेली माहिती पूर्णपणे भरा.
- माहिती भरल्यानंतर पुन्हा एकदा तपासून घ्या आणि फॉर्म सबमिट करा.
फॉर्म भरण्याची मुदत
- आरआरसी डब्ल्यूआर अपरेंटिसशिपसाठी फॉर्म भरण्याची तारीख 27 जून 2023 पासून
- आरआरसी डब्ल्यूआर अपरेंटिसशिपसाठी फॉर्म भरण्याची शेवटची तारीख 26 जुलै 2023 पर्यंत
