केंद्र शासनाची नोकरी करण्याची संधी, ना परीक्षेचे टेन्शन ना मुलाखतीचे, थेट पद्धतीने होणार उमेदवाराची निवड
RFCL Recruitment 2024 : सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी असून थेट केंद्र शासनाची नोकरी करण्याची संधी तुमच्याकडे आहे. विशेष म्हणजे या भरती प्रक्रियेबद्दलची अधिसूचना ही प्रसिद्ध करण्यात आलीये. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी फटाफट अर्ज करावीत, ही मोठी संधी आहे.

मुंबई : सरकारी नोकरी हवी असेल आणि तिही चांगल्या पगाराची तर तुमच्याकडे खरोखरच मोठी संधी नक्कीच आहे. नुकताच या भरती प्रक्रियेबद्दलची अधिसूचना ही जाहिर करण्यात आलीये. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी फटाफट या भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावीत. विशेष म्हणजे थेट केंद्र शासनाची नोकरी करण्याची ही संधी तुमच्याकडे आहे. ही एकप्रकारची महाभरतीच आहे. या भरती प्रक्रियेतून विविध पदे ही भरली जाणार आहेत. शिक्षणाची आणि वयाची अट देखील लागू करण्यात आलीये. ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी पार पडत असल्याने शिक्षणाची आणि वयाची अट देखील पदानुसार असणार आहे.
ही भरती प्रक्रिया रामागुंडम फर्टिलायझर्स अँड केमिकल्स लिमिटेड यांच्याकडून राबवली जातंय. यामधून विविध पदे ही भरली जातील. ही भरती प्रक्रिया तेलंगणामधील आरएफसीएलच्या प्लांटसाठी आणि नोएडामधील कॉर्पोरेट कार्यालयासाठी भरली जात आहेत. आरएफसीएलने अभियंता, वरिष्ठ केमिस्ट, लेखा अधिकारी आणि वैद्यकीय अधिकारी या पदांसाठी अर्ज मागवले आहेत.
या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला फक्त आणि फक्त ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज हा करावा लागणार आहे. 2 मार्च 2024 पासून अर्ज करण्याची प्रक्रिया ही सुरू झालीये. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 31 मार्च 2024 आहे. त्यापूर्वीच आपल्याला या भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावी लागणार आहेत. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी आहे.
या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी आपल्याला www.rfcl.co.in या साईटवर जावे लागेल. तिथेच आपल्याला या भरती प्रक्रियेबद्दलची सविस्तर माहिती ही आरामात मिळेल. वैद्यकीय अधिकारी सोडून बाकी सर्व पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय हे 30 ते 35 असणे आवश्यक आहे. वयाची अट ही उमेदवारांना पाळावी लागणार आहे.
या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराला 700 रूपये फीस ही भरावी लागणार आहे. बीई, बीटेक, बीएससी, एमएससी, एमबीए आणि एमबीबीएस या पदवी असलेले उमेदवार हे या भरती प्रक्रियेसाठी आरामात अर्ज करू शकतात. या भरती प्रक्रियेची सर्वात खास बाब म्हणजे तगडी पगार उमेदवाऱ्यांना मिळणार आहे. या भरती प्रक्रियेतून 27 पदे ही भरली जाणार आहेत. कोणतीही परीक्षा उमेदवारांना द्यावी लागणार नाहीये.
