AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सरकारी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्यांचं सत्र सुरुच, बारामतीत पोलीस कर्मचाऱ्याची आत्महत्या

पोपट विष्णू दराडे असं आत्महत्या केलेल्या पोलिसाचे नाव आहे. Popat Darade committed suicide

सरकारी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्यांचं सत्र सुरुच, बारामतीत पोलीस कर्मचाऱ्याची आत्महत्या
पोपट दराडे, पोलीस कर्मचारी
| Updated on: Mar 30, 2021 | 2:02 PM
Share

पुणे : महाराष्ट्रातील सरकारी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्यांचं सत्र सुरुच आहे. बारामती तालुका पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याने विषारी औषध घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आलाय. पोपट विष्णू दराडे असं आत्महत्या केलेल्या पोलिसाचे नाव आहे. (Baramati Police Constable Popat Darade committed suicide by taking poison)

पोपट दराडे यांच्या आत्महत्येचं कारण अस्पष्ट

पोलीस कर्मचारी पोपट दराडे यांनी आत्महत्या का केली याबाबत अद्याप कारण स्पष्ट झाले नाही. घरगुती कलहातून त्यांनी आत्महत्या केली असावी, असा संशय व्यक्त केला जात आहे.

पोलिसांचा वेगळा दावा

बारामती पोलिसांनी पोपट दराडे यांच्या आत्महत्येविषयी वेगळाच दावा केला आहे. पोपट दराडे तीन दिवसांपासून खोकल्याने त्रस्त होते. त्यांनी खोकल्याचे औषध समजून चुकून विषारी औषध प्राशन केले असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे.

राज्यात सरकारी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्येचं सत्र सुरुच

दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्येची घटना ताजी असतानाच रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील मुरुड येथील पोस्टमास्तर पुर्वी तुरे यांनी पोस्ट कार्यालयातच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना 29 मार्चला घडली. पुर्वी तुरे या मुळच्या दापोली तालुक्यातील हर्णे येथील मोठी गोडीबाव येथील रहिवासी होत्या. त्या विवाहित होत्या. पुर्वी कर्दे पोस्ट कार्यालयात कर्तव्य बजावत होत्या. या घटनेमुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली होती.

सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील कोयनानगर येथे शासकीय निवासस्थानात जलसंपदा विभागातील कर्मचाऱ्यानं आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला होता. बंडू कुंभार असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचं नाव होतं. बंडू कुंभार हे कोयनानगर जलसंपदा विभागात कार्यरत होते. राहत्या घरी गळफास घेऊन त्यांनी आत्महत्या केली.

संबंधित बातम्या:

टिकटॉक स्टार समीर गायकवाडची पुण्यात गळफास घेत आत्महत्या

धक्कादायक! कारागृहात कैद्याची पोलिसाला मारहाण, दगड उचलून जीवे मारण्याचाही प्रयत्न

Baramati Police Constable Popat Darade committed suicide by taking poison

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.