AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हॉस्पिटलसाठी पैशांची आवश्यकता, चक्क जिल्हाधिकाऱ्यांच्या नावे फेक फेसबुक अकाऊंट

रत्नागिरी जिल्हाधिकारी बी. एन. पाटील यांच्या शासकीय योजनांची माहिती देण्यासाठी फेसबुक अकाऊंट काढण्यात आले आहे. अज्ञात व्यक्तीने Collectorate Ratnagiri या नावे बनावट अकाऊंट तयार करुन रत्नागिरी जिल्ह्यातील नागरिक, अधिकारी यांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली आणि त्यांच्याकडे पैशांची मागणी केली जात आहे.

हॉस्पिटलसाठी पैशांची आवश्यकता, चक्क जिल्हाधिकाऱ्यांच्या नावे फेक फेसबुक अकाऊंट
Facebook
| Edited By: | Updated on: Sep 19, 2021 | 10:45 AM
Share

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हाधिकारी बी. एन. पाटील यांच्या Collectorate Ratnagiri या अधिकृत सरकारी फेसबुक अकाऊंटप्रमाणे बनावट खाते तयार करुन जनतेकडे पैशांची मागणी केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. संबंधित अकाऊंट फेक असून ब्लॉक करावे, त्यावरुन मेसेज आल्यास नजीकच्या पोलिस स्थानकाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी यांच्या वतीने करण्यात आले आहे.

काय आहे प्रकरण?

रत्नागिरी जिल्हाधिकारी बी. एन. पाटील यांच्या शासकीय योजनांची माहिती देण्यासाठी फेसबुक अकाऊंट काढण्यात आले आहे. अज्ञात व्यक्तीने Collectorate Ratnagiri या नावे बनावट अकाऊंट तयार करुन रत्नागिरी जिल्ह्यातील नागरिक, अधिकारी यांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली आणि त्यांच्याकडे पैशांची मागणी केली जात आहे.

जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

रुग्णालय असल्याने पैशाची आवश्यकता आहे. अशा आशयाचे मेसेज मेसेंजरद्वारे अज्ञात व्यक्ती पाठवत आहे. तरी Collectorate Ratnagiri नावे बनावट असलेल्या अकाऊंटची फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारू नये, ज्यांना अशा अकाऊंटवरून फ्रेंड रिक्वेस्ट आली असेल, त्यांनी नजीकच्या पोलिस स्थानकाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी बी. एन. पाटील यांनी फेसबुक अकाऊंटद्वारे केले आहे.

पोलीस महासंचालकांच्या नावे फेक अकाऊण्ट

याआधी, राज्याचे पोलीस महासंचालक संजय पांडे यांच्या नावे बनावट फेसबुक अकाऊण्ट उघडण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता. फेक अकाऊण्टवरुन आरोपीने अनेकांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली होती. आरोपीला उत्तर प्रदेशमधून अटक करण्यात आली होती. पोलीस महासंचालकांच्या नावाने बनावट सोशल मीडिया खाते तयार झाल्याने सायबर विभागाने तात्काळ तपास सुरु करून आरोपीला बेड्या ठोकल्या.

यवतमाळ एसपींच्या नावेही फेक अकाऊण्ट

दुसरीकडे, पोलीस अधीक्षकांच्या नावाने बनावट फेसबुक अकाऊंट तयार करुन त्यांच्या फेसबुक मित्रांकडे पैशांची मागणी करणाऱ्या भामट्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. ‘एसपी यवतमाळ’ नावाने फेक अकाऊंट तयार करुन फेसबुक फ्रेंड्सकडे पैशांची मागणी होत असल्याचा प्रकार समोर आला होता. महत्त्वाचं म्हणजे यवतमाळचे पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांचा फोटो सुद्धा बनावट अकाऊंटसाठी वापरण्यात आला होता.

हॉस्पिटलमध्ये आहे, दहा हजार पाठवा

पोलीस अधीक्षकांचे मित्र आणि नातेवाईकांशी मेंसेंजरद्वारे संपर्क साधत आपण आर्थिक अडचणीत आल्याचे भामट्याने सांगितले. मित्रांकडून मिळत असलेल्या सकारात्मक प्रतिसादानंतर त्याने पैशांची मागणी सुरु केली. हॉस्पिटलमध्ये आहे, दहा हजार पाठवा, अशी मागणी त्याने केली. गुगल पे असेल तर अर्जंट पैसे पाठवा असे मेसेज अनेकांना केले. या प्रकारामुळे एक फेसबुक मित्र गोंधळला आणि त्याने थेट पोलिस अधिकाऱ्यांना याची माहिती देत चौकशी केली.

संबंधित बातम्या :

हॉस्पिटलमध्ये आहे, दहा हजार पाठवा, पोलीस अधीक्षकांच्या नावे बनावट फेसबुक अकाऊंटवर पैशांची मागणी

मुंबईतील भाजप नगरसेवकाचे फेसबुक अकाऊंट हॅक, ऑनलाईन पैसे पाठवण्याची मित्रांकडे मागणी

कोरोनाबाधित मृताच्या बोटाचे ठसे वापरले, ‘फोनपे’तून पैसे ट्रान्सफर, जालन्यातील वॉर्डबॉयचा प्रताप

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.