AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कृष्णूर धान्य घोटाळ्यात ईडीची एन्ट्री, उपजिल्हाधिकारी फरार, कलेक्टरसाहेबांची नोटीस!

कृष्णूर धान्य घोटाळ्यातील आरोपी असलेले उपजिल्हाधिकारी संतोष वेणीकर तर पुन्हा गायब झाले आहेत. सध्या परभणी इथे कार्यरत असलेल्या वेणीकर यांना तिथल्या जिल्हाधिकाऱ्यांनी हजर होण्याची नोटीस बजावलीय. (parbhani Collector notice to absconding Deputy Collector Santosh Venikar)

कृष्णूर धान्य घोटाळ्यात ईडीची एन्ट्री, उपजिल्हाधिकारी फरार, कलेक्टरसाहेबांची नोटीस!
संतोष वेणीकर
| Edited By: | Updated on: Jul 08, 2021 | 12:26 PM
Share

नांदेड : गतवर्षी नांदेडमध्ये उघड झालेल्या धान्य घोटाळ्याचा तपास आता ईडी करतेय. कृष्णुर इथे उघडकीस आलेल्या या धान्य घोटाळ्यातील आरोपी अजय बाहेती (Ajay Baheti) यांना ईडीने अटक केलीय. त्यानंतर आता नांदेड, हिंगोली आणि परभणी जिल्ह्यात खळबळ उडालीय. याच घोटाळ्यातील आरोपी असलेले उपजिल्हाधिकारी संतोष वेणीकर (Santosh Venikar) तर पुन्हा गायब झाले आहेत. सध्या परभणी इथे कार्यरत असलेल्या वेणीकर यांना तिथल्या जिल्हाधिकाऱ्यांनी हजर होण्याची नोटीस बजावलीय. विशेष म्हणजे ईडीच्या भीतीमुळे या घोटाळ्यातील अनेक जण भूमिगत झाले आहेत. (ED entry in Krishnur grain scam, parbhani Collector notice to absconding Deputy Collector Santosh Venikar)

ईडीचा वापर केंद्र सरकार नेहमी विरोधकांना नामोहरम करण्यासाठी करते असा आरोप नेहमीच होत असतो. मात्र ईडीने नांदेडच्या धान्य घोटाळ्यात लक्ष घातल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. गोरगरिबांसाठी मोफत आणि स्वस्त दरात दिलं जाणारे धान्य काळ्या बाजारात विकल्याचा हा घोटाळा आहे.

काय आहे हा नेमका घोटाळा..?

2018 च्या जुलै मध्ये राज्यातील सर्वात मोठा शासकीय धान्य घोटाळा नांदेडमध्ये उघड झाला. तत्कालीन जिल्हा पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीना यांनी हा घोटाळा उघडकीस आणला होता. या धान्य घोटाळ्यात जिल्ह्य़ातील बडे राजकीय मंडळी, व्यापारी आणि महसूलच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा हाथ असल्याचे पोलीस तपासात उघड झाले होते. गोर गरीबांच्या तोंडचा घास पळवणारे मोठे रॅकेट नांदेडमध्ये कार्यरत असल्याचे यात उघड झालं. पोलीसांनी या कारवाईत दहा ट्रकसह एक कोटी 80 लाखांचे धान्य जप्त करुन गुन्हे दाखल केले होते. या धान्य घोटाळ्याची व्याप्ती एवढी मोठी आहे की पारदर्शक चौकशी झाली तर अनेक बडी मासे तुरुंगात जातील अशी माहिती सूत्रांनी दिलीय.

दरम्यान,  जिल्हा पोलीस अधिक्षक चंद्रकिशोर मीना यांनी तपास अधिकारी म्हणून आयपीएस असलेले नरुल हसन यांची नियुक्ती केली होती. पोलिसांनी कारवाईची माहिती आम्हाला दिली नसल्याचा कांगावा महसूलचे अधिकारी करतायत. आपलं काही पितळ उघड पडेल या भीतीने महसूलचे अधिकारी माध्यमांशी बोलण्याचे टाळले होते. मात्र पोलिसांनी याच धान्य घोटाळ्याच्या संदर्भातला तेरा पानाचा अहवाल महसुल आयुक्ताकडे सादर केला होता.

गेल्या अनेक वर्षांपासून सुरु असलेल्या या धान्य घोटाळ्याच्या मुळाशी जाऊन बिंग फोडण्याचे धाडस आजतागायत कुणीही दाखवलं नव्हतं….मात्र, आता या प्रकरणाचा तपास आयपीएस दर्जाच्या अधिका-याकडे दिल्याने पोलीस या घोटाळ्याच्या मुळापर्यंत पोहोचले होते.

सीआयडी नंतर आता थेट ईडी

नांदेडच्या या धान्य घोटाळ्याची व्याप्ती मोठी आहे. त्यामुळे सीआयडीकडे हा तपास देण्यात आला. मात्र या घोटाळ्यातील आरोपी उपजिल्हाधिकारी संतोष वेणीकर हा उजागरपणे फिरत असताना त्याला सीआयडी अटक करू शकली नाही. त्यातच या घोटाळ्यातील बहुतांश आरोपींचा जामीन झाला होता आणि या मंडळींनी पुन्हा आपला हाच धंदा सुरू ही केला होता. मात्र अचानकपणे गत आठवड्यात ईडीने या घोटाळ्यातील प्रमुख आरोपी अजय बाहेती ला अटक केलीय. दुसरीकडे गायब असलेले उपजिल्हाधिकारी संतोष वेणीकर यांना हजर होण्यासाठी परभणीचे जिल्हाधिकारी दीपक मुंगळीकर यांनी नोटीस बजावलीय. तर या धान्य घोटाळ्याची व्याप्ती मोठी असल्याने ईडी आता या प्रकरणाचा तपास करणार आहे. त्यामुळे या घोटाळ्यातील अनेक जण भूमिगत झाले आहेत.

गोरगरिबांचा तळतळाट लागणार

भारतात कुणीही उपाशीपोटी झोपू नये म्हणून सरकारने अन्न सुरक्षा योजना सुरु केलीय. यातून गरीब कुटुंबाला अत्यल्प दरात धान्य पुरवलं जाते. मात्र अधिकारी आणि काही व्यापाऱ्यांच्या अभद्र युतीने गोरगरिबांचा घास हिरावून घेत त्याची काळ्या बाजारात विक्री केली. हा घोटाळा करणाऱ्या सर्वांना स्थानिक आणि उच्च न्यायालयातून जामीन मिळाल्याने प्रकरण थंड झाले आणि हे बहाद्दर पुन्हा आपल्या काळ्या धंद्याला देखील लागले होते. मात्र आता ईडीच्या एन्ट्रीमुळे या चोरांना अद्दल घडणारच अशी आशा निर्माण झालीय. गोरगरिबांच्या तोंडचा घास हिरावणाऱ्यांना मोठी शिक्षा होईल असं बोललं जातंय.

(ED entry in Krishnur grain scam, parbhani Collector notice to absconding Deputy Collector Santosh Venikar)

हे ही वाचा :

फोटो लावा किंवा संपत्ती जप्त करा, पण नांदेडच्या उपजिल्हाधिकाऱ्याला बेड्या ठोका, सीआयडीला आदेश

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.