पैशांवरुन ऑफिसमध्ये भांडण, बापाने बंदुकीतून गोळी झाडली, चुकून पोटच्या पोराच्या डोक्यात घुसली

प्रभूच्या मुलाने ड्रायव्हर आणि क्लिनरला कानाखाली मारल्याचा दावा केला जातो. त्यानंतर एकच गोंधळ उडाला आणि राजेश प्रभूंनी बंदूक बाहेर काढल्याचे बोलले जाते. आणि दोन राऊंड फायर केल्या ज्यापैकी एक गोळी त्याच्या मुलाला लागली, असे पोलीस सूत्रांनी सांगितले.

पैशांवरुन ऑफिसमध्ये भांडण, बापाने बंदुकीतून गोळी झाडली, चुकून पोटच्या पोराच्या डोक्यात घुसली
प्रातिनिधीक फोटो

मंगळुरु : कर्नाटकातील मंगळुरु दक्षिण पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका व्यक्तीने ऑफिसमध्ये केलेल्या गोळीबारात चुकून त्यांचा 16 वर्षीय मुलगा गंभीर जखमी झाला. वडील राजेश प्रभू वैष्णवी एक्सप्रेस कार्गो प्रायव्हेट लिमिटेडचे ​​मालक आहेत. पैशांवरुन ऑफिसमध्ये झालेल्या भांडणातून बापाने गोळी झाडली होती.

घटनास्थळी भेट देणारे शहर पोलीस आयुक्त एन शशी कुमार यांनी सांगितले की, ही घटना मॉर्गन गेटमधील गजबजलेल्या व्यावसायिक परिसरात असलेल्या एक्सप्रेस कार्गो कार्यालयात घडली. राजेश यांच्याकडे परवानाधारक पिस्तूल आहे. मंगळवारी दुपारी 3.30 वाजताच्या सुमारास ते घरातून निघाले, असे शशी कुमार यांनी सांगितले.

दहावीत शिकणारा मुलगा जखमी

या घटनेत सुधींद्र, त्यांचा मुलगा आणि राजेश प्रभू यांचा दहावीत शिकणारा मुलगा जखमी झाला आहे. जखमी मुलावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. एक्स-रे अहवालात असे दिसून आले की गोळी डोक्यात सुमारे आठ इंचांनी भेदली गेली होती. सखोल तपास केल्यानंतर घटनेचे नेमके कारण समोर येईल, असे ते म्हणाले.

नेमकं काय घडलं?

प्राथमिक तपासात असे दिसून आले की चंदरु आणि अशरफ हे मालवाहू वाहनांमध्ये ड्रायव्हर आणि क्लिनर म्हणून काम करतात. काही वस्तूंच्या डिलीव्हरीनंतर त्यांनी राजेश प्रभूंच्या पत्नीकडे 4 हजार रुपयांची मागणी केली होती. त्यामुळे त्यांनी आरडाओरडा करण्यास सुरुवात केली, त्यानंतर तिने पती आणि मुलाला कार्यालयात बोलावले.

प्रभू कुटुंब कार्यालयाच्या जवळच राहते. प्रभूच्या मुलाने ड्रायव्हर आणि क्लिनरला कानाखाली मारल्याचा दावा केला जातो. त्यानंतर एकच गोंधळ उडाला आणि राजेश प्रभूंनी बंदूक बाहेर काढल्याचे बोलले जाते. आणि दोन राऊंड फायर केल्या ज्यापैकी एक गोळी त्याच्या मुलाला लागली, असे पोलीस सूत्रांनी सांगितले.

संबंधित बातम्या :

तुम्ही गपचूप झोपून रहा, अमरावतीत सहा जणांचा दरोडा, 14 लाखांचा ऐवज लुबाडला

एसटी चालकाची बसमध्येच आत्महत्या, बॅगच्या बेल्टने गळफास

बलात्काराच्या आरोपातील 25 वर्षीय आरोपी पळाला, वैद्यकीय तपासणीवेळी हातावर तुरी

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI