AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जंगलात 2 किमी पाठलाग करुन एनसीबीने नायजेरीअन नागरिकाला पकडलं, 20 लाखाचे ड्रग्ज जप्त

मुंबईच्या अंमली पदार्थविरोधी विभागाने (NCB Arrested Nigerian Citizen) नवी मुंबईत एक मोठी कारवाई पार पाडली आहे. पथकाने तब्बल 20 लाख रुपये किमतीचे 200 ग्रॅम मेफेड्रोन जप्त केलं आहे.

जंगलात 2 किमी पाठलाग करुन एनसीबीने नायजेरीअन नागरिकाला पकडलं, 20 लाखाचे ड्रग्ज जप्त
Navi Mumbai Drugs Seized
| Updated on: Mar 31, 2021 | 12:11 PM
Share

नवी मुंबई : मुंबईच्या अंमली पदार्थविरोधी विभागाने (NCB Arrested Nigerian Citizen) नवी मुंबईत एक मोठी कारवाई पार पाडली आहे. पथकाने तब्बल 20 लाख रुपये किमतीचे 200 ग्रॅम मेफेड्रोन (Mephedrone Drug) जप्त केलं आहे. याप्रकरणी पथकाने एका नायजेरीअन नागरिकाला अटक केली आहे. त्याला एनडीपीएस कलमाखाली अटक करण्यात आली आहे (Maharashtra Crime News NCB Arrested Nigerian Citizen With The 200 Grams Drugs Cost Of Rs 20 Lac From Navi Mumbai).

20 लाखाचे ड्रग्ज जप्त

नवी मुंबईत अंमली पदार्थाची विक्री करण्यासाठी आलेल्या नायजेरीयन नागरिकाला मुंबईच्या अंमली पदार्थविरोधी विभागाच्या पथकाने रविवारी (28 मार्च) दोन किलोमीटर पाठलाग करुन पकडले. केनिथ इझी (वय 32) असे या नायजेरीयन नागरिकाचे नाव असून एनसीबीने त्याच्याजवळ असलेले सुमारे 20 लाख रुपये किंमतीचे 200 ग्रॅम वजनाच मेफेड्रोन हे अंमली पदार्थ जप्त केले आहे. केनिथ इझी हा अंमली पदार्थांचा मुख्य पुरवठादार असून त्याला यापूर्वी देखील एनसीबीने अटक केली होती.

नायजेरीयन नागरिकाचा जंगलात दोन किमीपर्यंत पाठलाग

खारघर सेक्टर-32 भागात एक नायजेरीअन व्यक्ती अंमली पदार्थाची विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती एनसीबीला मिळाली होती. त्यानुसार, रविवारी सायंकाळी मुंबई एनसीबीच्या पथकाने खारघर येथे त्याच्यावर पाळत ठेवली होती. यावेळी केनिथ इझी याला एनसीबीचं पथक आपल्या मागावर असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर त्याने त्याच भागातील जंगलात पलायन केले. यावेळी एनसीबीच्या पथकाने नायजेरीयन नागरिक केनिथ इझी याचा सदर जंगलामध्ये 2 किलोमीटरपर्यंत पाठलाग करुन त्याला पकडले.

त्यानंतर एनसीबीच्या पथकाने त्याची झडती घेतली असता, त्याच्याजवळ 200 ग्रॅम वजनाचे मेफेड्रॉन हे अंमली पदार्थ आढळून आले. आंतरराष्ट्रीय बाजारात 200 ग्रॅम वजनाच्या मेफेड्रॉनचा दर सुमारे 20 लाख रुपये असल्याची माहिती मुंबई एनसीबीच्या वेस्ट झोनचे डायरेक्टर समीर वानखेडे यांनी दिली.

या कारवाईत पकडण्यात आलेला केनिथ इझी हा अंमली पदार्थाचा मुख्य पुरवठादार असून तो मुंबई तसेच नवी मुंबईत अंमली पदार्थाचा पुरवठा करत असल्याचे वानखेडे यांनी सांगितले. तसेच, त्याला यापूर्वी देखील अंमली पदार्थाच्या तस्करी प्रकरणात अटक करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. केनिथ इझी याला मुंबईच्या नार्कोटिक्स ब्युरोने एनडीपीएस कलमाखाली अटक केली आहे.

Maharashtra Crime News NCB Arrested Nigerian Citizen With The 200 Grams Drugs Cost Of Rs 20 Lac From Navi Mumbai

संबंधित बातम्या :

एकावर दोन थाळी फ्री मिळवण्याच्या नादात गंडा, पुण्यातील खवय्याची 31 हजारांना फसवणूक

जुना वाद सोडवून तीन यार दारु प्यायला बसले, पण धुलिवंदनालाच खेळली ‘रक्ताची होळी’

गुन्हा वेगळाच, घाबरलेल्या आरोपीने पुण्याच्या बर्थडे पार्टीतील गँगरेपची कहाणी घडाघडा सांगितली…

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.