कित्येक वर्षांपासून त्याचे अनैतिक संबंध, एका चुकीमुळे सगळं समजलं; बायकोने केलं असं काही की…सगळेच चकित!
सध्या एक अजब प्रकरण समोर आले आहे. एका व्यक्तीच्या क्षुल्लक चुकीमुळे दोन संसार उद्ध्वस्त झाले आहेत. या व्यक्तीच्या पत्नीने मोठा निर्णय घेतला आहे.

Crime News : आपण चुकीच्या गोष्टी केल्या की त्या भविष्यात कधीतरी समोर येतातच. आज आपण ती चुक लपवण्याचा प्रयत्न केला तरी ती योगायोग किंवा अन्य एखाद्या कारणामुळे समोर येतेच. सध्या असाच एक अजब प्रकार समोर आला असून एका व्यक्तीच्या अनैतिक संबंधामुळे एकूण दोन कुटुंब उद्ध्वस्त झाले आहेत. विशेष म्हणजे संबंधित व्यक्ती औषधालयात औषधी घ्यायला गेल्यानंतर हा सर्व कांड समोर आला आहे.
195 रुपयांच्या औषधाने घातला घोळ
मिळालेल्या माहितीनुसार एक व्यक्ती आपल्या पत्नीला अंधारात ठेवून अन्य एका महिलेशी अनैतिक प्रेमसंबंधात होता. मात्र त्याच्या एका चुकीमुळे त्याचं हे बिंग फुटलं आहे. हे प्रकरण मुळचं चीन देशातलं आहे. ही व्यक्ती चीनमधील एका औषधालयाच्या पिंगगांग येथील शाखेवर औषध घ्यायला गेला होता. तिथे जाऊन त्याने एकूण 195 रुपयांचे औषध खरेदी केले. त्यानंतर मोबाईलमधील अॅपच्या माध्यमातून त्याने हे पैसे देण्याचा प्रयत्न केला. मात्र तांत्रिक कारणामुळे त्याला हे पैसे देता आले नाहीत. याच एका कारणामुळे नंतर त्या व्यक्तीचा संसार तुटला. या व्यक्तीच्या अनैतिक संबंधाबद्दल त्याच्या पत्नीला सर्वकाही समजले.
पत्नीला पतीचे कुकृत्य नेमके कसे समजले?
संबंधित व्यक्ती औषधालयात 195 रुपये न देऊ शकल्यामुळे तिथे काम करणाऱ्या व्यक्तीने मेंबरशीप प्रोफाईलवर असलेल्या मोबाईल क्रमांकावर कॉल केला. हा मोबाईल क्रमांक त्या व्यक्तीच्या पत्नीचा होता. मेडिकलमधील कार्मचाऱ्याने थेट याच क्रमांकावर कॉल करून तुमच्या पतीने 195 रुपयांच्या गोळ्या नेल्या आहेत. हे पैसे द्या अशी विचारणा केली. पत्नीला मात्र फारच आश्चर्य वाटले. तिने या गोळ्या नेमक्या कशाच्या होत्या, याबाबत विचारणा केली. त्यानंतर या गोळ्या गर्भनिरोधक असल्याचे समोर आले. ही माहिती मिळताच पत्नीचा पारा चढला. पतीचे अन्य महिलेशी प्रेमसंबंध आहेत, असे या महिलेला समजले. त्यानंतर आता संबंधित महिलेने आपल्या पतीपासून वेगळे राहण्याचा निर्णय घेतला आहे.
आता संबधित व्यक्ती औषधालयाविरोधात तक्रार देणार
हे सर्व प्रकरण खुद्द त्या व्यक्तीनेच चीनच्या विबो या सोशल मीडिया मंचावर सांगितले आहे. आता त्याची प्रेमिका आणि त्याचाही संसार तुटणार असल्याचे दु:ख त्याने व्यक्त केले आहे. तसेच त्याने औषधालयावर गंभीर आरोप केले आहेत. माझे अनैतिक संबंध असल्याचे माझ्या पत्नीला समजले आहे. या औषधालयामुळे दोन संसार उद्ध्वस्त होणार आहेत, असे या व्यक्तीने म्हटले आहे. तसेच एखाद्या व्यक्तीच्या गोपनीयतेची जबाबदारी औषधालयाच्या प्रशासनावर नाही का? असा सवाल करत त्याने या औधलयावर कायदेशीर कारवाई करणार असल्याचेही त्याने सांगितले आहे.
