गर्लफ्रेंडच्या वादात मित्राचे थेट 3 तुकडे, शरीर बोअरवेलमध्ये फेकलं; भयंकर खुनाने खळबळ!
एका तरुणाने आपल्याच एका मित्राचा अत्यंत निर्घृण पद्धतीने खून केला. गर्लफ्रेंडला मेसेज केल्यामुळे त्यांच्यात वाद झाला होता. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

Crime News : प्रेम मिळवण्यासाठी अनेक तरुण-तरुणी काहीही करायला तयार असतात. काही तरुण तर कुटुंबाच्या विरोधात जाऊन लग्नाचे निर्णय घेऊन संसार थाटतात. याउलट प्रेमात अशीही काही उदाहरणं आहेत ज्यात प्रेमामध्ये खून, हत्येसारखी प्रकरण घडतात. रागाच्या भरात प्रेयसीचा खून केल्याच्या अनेक घटना याआधी घडलेल्या आहेत. पण आता मात्र एक अजब आणि धक्कादायक असा प्रकार समोर आला आहे. आपल्या गर्लफ्रेंडला मेसेज केला म्हणून एका तरुणाने मित्राचा निर्घृण पद्धतीने खून केला आहे. खुनानंतर त्याने मृतदेहाचे तीन तुकडे करून वेगवेगळ्या बोअरवेलमध्ये टाकून दिले आहेत. त्यानंतर उरलेल्या मृतदेहाची त्याने शेतात विल्हेवाट लावली आहे. खुनाची ही घटना समोर येताच सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे. पोलीस या प्रकरणी तपास करत आहेत.
नेमकं प्रकरण काय?
मिळालेल्या माहितीनुसार हे प्रकरण मुळचे गुजरात राज्यातील कच्छ येथील आहे. येथे एका तरुणाने आपल्या मित्राचा खून करून त्याच्या शरीराचे तीन तुकडे केले. या तुकड्यांची विल्हेवाट लावण्यासाठी ते तीन वेगवेगळ्या बोअरवेलमध्ये टाकून दिले. या प्रकरणात मुख्य आरोपी किशोर लखमाशी असून त्याने त्याचा मित्र रमेश नावाच्या मित्राचा खून केला आहे. रमेश आणि किशोर हे दोघेही कच्छमधील गुरू या छोट्याशा गावातील रहिवाशी आहेत. 2 डिसेंबर रोजी किशोरने रमेशचा अत्यंत निर्घृण पद्धतीने खून केला.
खून नेमका कसा केला? वाद का झाला?
रमेश आणि किशोर हे खूप चांगले मित्र होते. दोघांचाही एकमेकांवर चांगलाच विश्वास होता. पण किशोरने रमेशच्या गर्लफ्रेंडला मेसेज केला. त्यानंतर रमेशच्या गर्लफ्रेंडने किशोरला ब्लॉक केले. याच एका मेसेजमुळे रमेश आणि किशोर यांच्यात मोठा वाद झाला. हा वाद नंतर मिटला पण किशोरच्या मनातील राग अजूनही गेलेला नव्हता. 2 डिसेंबर रोजी रमेश आमि किशोर शेतात जेवण करत होते. त्याच वेळी किशोरने रमेशवर फावड्याने वार केले. नंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी रमेशच्या शरीराचे तीन तुकडे करू ते बोअरवेलमध्ये फेकून दिले. उर्वरीत शरीराच्या तुकड्यांची त्याने शेतातच विल्हेवाट लावली. दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणी किशोरविरोधात गुन्हा दाखल केला असून तपास केला जात आहे.
