Aryan Khan Drug Case LIVE : आर्यन खानला न्यायालयीन कोठडी, जामिनासाठी अर्ज करण्याचे कोर्टाचे आदेश

| Updated on: Oct 08, 2021 | 12:04 AM

Aryan khan bail plea hearing Live updates बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) मुलगा आर्यन खान (Aryan Khan) याला आज पुन्हा कोर्टात हजर करण्यात येत आहे. आर्यनला जामीन मिळणार की त्याच्या कोठडीत वाढ होणार, याचा फैसला काही वेळात होत आहे.

Aryan Khan Drug Case LIVE : आर्यन खानला न्यायालयीन कोठडी, जामिनासाठी अर्ज करण्याचे कोर्टाचे आदेश
Shahrukh-Aryan

मुंबई : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) मुलगा आर्यन खान (Aryan Khan) याला आज पुन्हा कोर्टात हजर करण्यात येत आहे. आर्यनला जामीन मिळणार की त्याच्या कोठडीत वाढ होणार, याचा फैसला काही वेळात होत आहे. मुंबई – गोवा क्रूझवर 2 ऑक्टोबरला धाड टाकून NCB ने अंमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी आर्यन खानसह 8 जणांना ताब्यात घेतलं होतं. त्यानंतर 3 ऑक्टोबरला त्यांना अटक करण्यात आली. त्यांना कोर्टात हजर केल्यानंतर (NCB) अटक केल्यानंतर आर्यन खानला 7 ऑक्टोबरपर्यंत कोठडी सुनावण्यात आली.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 07 Oct 2021 07:03 PM (IST)

    आर्यन खानसह आठ आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

    आर्यन खानसह आठ आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. जवळपास साडेतीन वाजेपासून सुनावणी सुरु आहे. प्रत्येक आरोपींच्या वकिलांपासून युक्तीवाद सुरु होता. सर्व आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. सर्व आरोपींना आजची रात्र न्यायालयीन कोठडीत राहावं लागलं. या आरोपींच्या वकिलांनी जामीनासाठी अर्ज केला आहे. न्यायालयीन कोठडी ही 14 दिवसांची असेल. या दरम्यान त्यांना जामीन मिळू शकतो. दरम्यान हे प्रकरण आता पुढच्या विशेष कोर्टाकडे वर्ग करण्यात आलं आहे.

  • 07 Oct 2021 06:58 PM (IST)

    आर्यन खानला न्यायालयीन कोठडी, जामिनासाठी अर्ज करण्याचे कोर्टाचे आदेश

    आर्यन खानला न्यायालयीन कोठडी, जामिनासाठी अर्ज करण्याचे कोर्टाचे आदेश

  • 07 Oct 2021 06:24 PM (IST)

    एनसीबीचे अधिकारी ऑफिसमध्ये बसलेले नाहीत, तपास सुरु आहे- अनिल सिंग

    एनसीबीकडू अनिल सिंग युक्तिवाद करत आहेत. कोर्टात सध्या घमासान सुरु आहे

    एनसीबीने या प्रकरणाशी निगडित एका  परदेशी नागरिकाला अटक केलं आहे. एनीसीबीचे अधिकारी ऑफिसमध्ये बसलेले नाहीत. एनसीबीने कशा पद्धतीने तपास करायला हवा हे तुम्ही सांंगण्याची गरज नाही, अशा शब्दात सिंग यांनी मानेशिंदे यांना खडसावले.

    त्यानंतर मी तुम्ही कशाप्रकारे तपास करायला हवा हे सांगितलं आहे का ? असा प्रतिप्रश्न केला.

  • 07 Oct 2021 06:16 PM (IST)

    आठही आरोपींचा एकमेकांंशी संबंध, मुख्य ड्रग्ज सप्लायरला अटक केलं- अनिल शिंदे

    अनिल सिंग एनसीबीच्या बाजूने युक्तिवाद करत आहेत.

     यावेळी एनसीबीची बाजू मांडताना या आठही आरोपींचा एमेकांशा संबंध आहे, असा दावा केला.

    एनीसबीकडून या प्रकरणाचा तपास केला जात आहे. आज साडे बारा वाजता ड्रग्ज पुरवणाऱ्या मेन सप्लायरला अटक करण्यात आलं आहे. त्याची चौकशी सुरु आहे, असेदेखील अनिल सिंग म्हणाले.

  • 07 Oct 2021 06:10 PM (IST)

    CSK vs PBKS : पंजाबचे दोन गडी बाद

    पंजाबचा सलामीवीर मयांक अगरवाल 12 धावा करुन बाद होताच त्याच षटकात सरफराज खानही शून्य धावांवर बाद झाला आहे. शार्दूले या दोन्ही विकेट्स घेतल्या आहेत.

  • 07 Oct 2021 05:50 PM (IST)

    मुनमुन फक्त क्रूझवर होती, असे असेल तर सर्व 1300 जणांना अटक केलं पाहिजे- काशिफ

    मुनमुनची बाजून काशिफ मांडत आहेत.

    मुनमुन फक्त जहाजावर उभी होती. असे असेल तर जहाजावरच्या सर्व 1300 प्रवाशांना अटक केलं गेलं पाहिजे

    Adv Kashiff cites a judgement

    Just because I was there on the ship? All 1300 should be arrested then.

    Tenders bail application. Kept in abeyance. #AryanKhan

    — Live Law (@LiveLawIndia) October 7, 2021

  • 07 Oct 2021 05:42 PM (IST)

    एनसीबीला सर्व काही एका रुममध्ये सापडले, मुूनमुनची कोठडी का मागितली जात आहे- अली काशिफ

    अॅड अली काशिफ मुनमुन धमेचा हीची बाजू मांडत आहेत.

    एनसीबीला जे काही सापडले आहे ते सगळे एका खोलीत सापडले आहे.

    या कोठडीच्या अर्जामध्ये मुनमुन हीच्याविषयी काहीच नाहीये. मग तिच्या कोठडीची मागणी का केली जात आहे

     आम्ही मला कोठे शोधण्यात आले, त्याचे सीसीटीव्ही फुटेज दाखवावे असा अजसुद्धा आमीह केलेला आहे.

    असा युक्तिवाद काशिफ यांनी केला

  • 07 Oct 2021 05:36 PM (IST)

    मुनमुन अराबाज तसेच आर्यन खानला ओळखत नाही, अॅड अली काशिफ यांचा दावा

    आर्यन खानचे वकील मानेाशिंदे यांचा युक्तिवाद संपला.

    आता मुनमुन धामेचाची बाजू अॅड अली काशिफ मांडत आहेत.

    मुनमुन आर्यन तसेच अरबाज या दोघांनाही ओळखत नाही, असा युक्तिवाद काशिफ यांनी केलाय.

  • 07 Oct 2021 05:31 PM (IST)

    आर्यन खानला आणखी एनसबी कोठडी देण्याची गरज नाही- मानेशिंदे  

  • 07 Oct 2021 05:23 PM (IST)

    आर्यनची अरबाजसोबत मैत्री, पण बाकीच्या गोष्टींशी त्याचा संबंध नाही- मानेशिंदे

    आर्यन खानची बाजू मांडताना मानेशिंदे म्हणाले की आर्यन अरबाजसोबतची मैत्री नाकारत नाही. पण त्याचा बाकीच्या कोणत्याही गोष्टीशी संबंध नाही.

  • 07 Oct 2021 05:18 PM (IST)

    आर्यनची प्रतिकसोबत चॅटिंग झाली, त्यामध्ये रेव्ह पार्टीचा उल्लेख नव्हता- मानेशिंदे

    आर्यन खानची बाजू वकिल मानेशिंदे मांडत आहेत.

    कोर्टात आर्यनची बाजू मांडताना मानेशिंदे म्हणाले की मीी प्रतिकसोबत चॅटिंग केलेली आहे. या चॅटमध्ये रेव्ह पार्टीचा उल्लेख नाही. प्रितकची अरबाजसोबत ओळख आहे.त्यामुळे प्रतिकने अरबाजला स्वंतत्ररित्या बोलावलं होतं. अरबाज आणि मी सोबत गेलो नव्हतो.

  • 07 Oct 2021 05:16 PM (IST)

    CSK vs PBKS : फाफ बाद

    एकहाती झुंज देणारा फाफ डुप्लेसीस 76 धावा करुन बाद झाला आहे. शमीच्या चेंडूवर राहुलने त्याची कॅच घेतली आहे.

  • 07 Oct 2021 05:04 PM (IST)

    आर्यन खानसह आठ जणांना 11 ऑक्टोबरपर्यंत कोठडी- एएसजी अनिल सिंग

    आर्यन खानसह आठ जणांना 11 ऑक्टोबरपर्यंत कोठडी द्यावी, अतिरिक्त सॉलिसिटर जनरल  यांची कोर्टाला विनंती

  • 07 Oct 2021 05:00 PM (IST)

    आर्यन खान, अरबाज मर्चंटसह आठ आरोपी कोर्टासमोर हजर, सुनावणी सुरु

  • 07 Oct 2021 04:56 PM (IST)

    प्रकरणाशी संबंध नसणाऱ्यांनी कोर्टाच्या बाहेर जाण्याची विनंती

    अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंग म्हणाले की  आम्ही 8 आरोपींना कोर्टासमोर हजर करतो. पण सध्या या प्रकरणाशी संबंध नसणाऱ्यांनी कोर्टाच्या बाहेर जावे. सध्याची कोरोनास्थिती पाहता  प्रकरणाशी संबंध नसणाऱ्यांनी बाहेर जावे.

    या विनंतीवर कोर्टाने टिप्पणी केली. इथे  आरोपी कमी आहेत आणि वकीलच जास्त आहेत.

    यावर बोलताना सगळे पत्रकार आहेत. आपण काही म्हणू शकत नाही, असे सांगितले.

  • 07 Oct 2021 04:45 PM (IST)

    अर्चित कुमारच्या कोठडीत वाढ, 9 ऑक्टोबरपर्यंत कोठडी

    अर्चित कुमारच्या कोठडीत वाढ, 9 ऑक्टोबरपर्यंत कोठडी

  • 07 Oct 2021 04:40 PM (IST)

    CSK vs PBKS : निम्मा संघ तंबूत परत

    चेन्नईचा पाचवा गडी कर्णधार धोनीच्या रुपात बाद झाला आहे. रवी बिश्नोईने त्याची विकेट घेतली आहे.

  • 07 Oct 2021 04:23 PM (IST)

    एनसीबी खोटे बोलत आहे, अचित कुमारच्या वकिलांचा युक्तीवाद

    एनसीबीला आर्यन खानची कोठडी हवी, आर्यनच्या माहितीच्या आधारे अचित कुमारला अटक करण्यात आली आहे. दोघांची चौकशी गरजेचा आहे. अचिंतकुमारचे वकील म्हणाले की एनसीबी खोटे बोलत आहे.

    अर्चितची अटकही गैरकायदेशीर आहे. माझ्याकडे सीसीटीव्ही आहे. मी हे रेकॉर्डवर देणार आहे. एनसीबी म्हणत आहे की अर्चित हा सप्लायर आहे. मात्र त्यानी ह्याबाबतचे सेक्शन का लावलेले नाही? ते सप्लायर म्हणत आहेत पण रिकवरी 2.6 ग्रामची आहे. कोर्टाने ह्याबाबत संज्ञान घ्यावा

  • 07 Oct 2021 04:20 PM (IST)

    CSK vs PBKS : ख्रिस जॉर्डनचा हल्ला

    पंजाबता गोलंदाज ख्रिस जॉर्डनने चेन्नईला दोन मोठे झटके दिले आहेत. रॉबिन उथप्पा आणि अंबाती रायडू यांची विकेट घेत जॉर्डनने चेन्नईवर हल्ला केला आहे.

  • 07 Oct 2021 04:09 PM (IST)

    NCB कडून आरोपींना 11 ऑक्टोबरपर्यंत कोठडीची मागणी

    NCB च्या रिमांड कॉपीमध्ये 11 ऑक्टोबरपर्यंत आरोपींच्या एनसीबी कोठडीची मागणी केली आहे. एनसीबीतर्फे अद्वैत सेठना यांचा युक्तीवाद. अटक आरोपी अचित कुमारच्या पवई घरात एनसीबीने धाड टाकली. तो गांजा विक्री रॅकेटमध्ये सहभागी असल्याचं तपासात समोर आलं आहे

  • 07 Oct 2021 03:56 PM (IST)

    Aryan Khan Drug Case सतिश मानेशिंदे यांचा यापूर्वीच कोर्टात नेमका काय दावा?

    आर्यन खानच्या बाजूने प्रसिद्ध वकील सतीश मानशिंदे यांनी युक्तिवाद केला होता. आर्यन खान याच्याकडे कोणतेही ड्रग्ज सापडलेले नव्हते. तसेच त्याकडे बोर्डिंग पास नव्हता. त्याला पार्टीचं निमंत्रण देण्यात आलं होतं. त्यामुळे तो पार्टीसाठी गेला होता. त्याची बॅग चेक करण्यात आली तेव्हा त्याच्या बॅगेतही काहीच मिळालं नाही. त्याचा मित्र अरबाज याच्याकडे 6 ग्रॅम चरस सापडलं. दिल्लीची मॉडेल मुनमुन धरेजा हिच्याकडे 5 ग्रॅम चरस सापडलं होतं. या दोन आरोपींकडे सापडलेल्या ड्रग्जचा आर्यनचा संबंध नाही, असं आर्यनची बाजू मांडणारे वकील सतीश मानेशिंदे यांनी कोर्टात सांगितलं होतं.

  • 07 Oct 2021 03:54 PM (IST)

    Aryan khan drug case : आर्यन खान, अरबाज मर्चंट मुनमुन धमेचा कोठडीत

    ड्रग्ज प्रकरणात देण्यात आलेल्या एका दिवसाच्या कोठडीची मुदत संपल्यानंतर आर्यन खानला 4 ऑक्टोबरला दुपारी न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. यावेळी न्यायालयात तब्बल अडीच तासांचा युक्तिवाद झाला होता. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर कोर्टाने 7 ऑक्टोबरपर्यंत आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा या तिघांना कोठडी सुनावली होती.

Published On - Oct 07,2021 3:43 PM

Follow us
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?.
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच.