कल्याण-डोंबिवलीत नेमकं काय सुरुय? अल्पवयीन मुलीच्या विनयभंगाची आणखी एक घटना, भाजप कार्यकर्त्याला बेड्या

कल्याण-डोंबिवली शहरात बलात्कार, विनयभंगाच्या घटना वांरवार समोर येताना दिसत आहेत. विशेष म्हणजे यावेळी विनयभंगाच्या आरोपाखाली एका भाजप कार्यकर्त्याला बेड्या ठोकल्या आहेत. पप्पू सहानी असं आरोपीचं नाव आहे.

कल्याण-डोंबिवलीत नेमकं काय सुरुय? अल्पवयीन मुलीच्या विनयभंगाची आणखी एक घटना, भाजप कार्यकर्त्याला बेड्या
कल्याणमध्ये अल्पवयीन मुलीच्या विनयभंगाची आणखी एक घटना,

कल्याण (ठाणे) : कल्याण-डोंबिवली शहरात बलात्कार, विनयभंगाच्या घटना वांरवार समोर येताना दिसत आहेत. विशेष म्हणजे यावेळी पोलिसांनी विनयभंगाच्या आरोपाखाली एका भाजप कार्यकर्त्याला बेड्या ठोकल्या आहेत. पप्पू सहानी असं आरोपीचं नाव आहे. पण आरोपीने असं काही केलं नसल्याचा दावा केला आहे. आपल्यावरील आरोप खोटे आहेत, असं आरोपी पप्पू सहानी याने म्हटलं आहे.

नेमकं काय घडलं?

संबंधित घटना ही कल्याणच्या टिळक नगर पोलीस ठाणे हद्दीत रात्री दहाच्या सुमारास घडली. पीडित अल्पवयीन मुलगी लहान मुलांची शिकवणी घेते. आरोपीची मुलगीदेखील पीडितेकडे शिकवणीसाठी येत होती. या दरम्यान पीडिता रविवारी संध्याकाळी आरोपीच्या मुलीला घरी सोडण्यासाठी गेली. पण पप्पू सहानी या नराधमाने तिला रस्त्यातच गाठलं. त्याने अंधाराचा फायदा घेत पीडितेचा विनयभंग केला. पीडितेने जीवाचा आटापीटा करत आरोपीकडून सुटका करुन घेतली.

पोलिसांकडून आरोपीला बेड्या

संबंधित घटनेनंतर पीडिता टिळक नगर पोलीस ठाण्यात गेली. तिने पोलिसांकडे आरोपीची तक्रार केली. पोलिसांनी घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने गुन्हा दाखल करत आरोपी पप्पू सहानीला बेड्या ठोकल्या. पप्पू हा मुलुंडमध्ये भाजपचं काम करतो. तो सध्या कल्याणमध्ये राहतो. दरम्यान या प्रकरणात आपण निर्दोष असल्याचे त्याने सांगितले आहे.

आरोपी भाजपचा कार्यकर्ता नाही, भाजप जिल्हाध्यक्षांची प्रतिक्रिया

दरम्यान, या घटनेनंतर भाजपची नेमकी प्रतिक्रिया काय हे आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न केला. भाजपचे जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे यांनी या प्रकरणी प्रतिक्रिया दिली. या प्रकरणातील संबंधित आरोपी पप्पू सहानी याचा भाजपशी काहीच संबंध नाही, असं जिल्हाध्यक्षांनी म्हटलं आहे. पण पप्पू सहाणीने आपण मुलुंडमध्ये भाजपसाठी काम करत असल्याचं म्हटलं आहे.

याआधी देखील अशीच घटना उघड

विशेष म्हणजे गेल्या आठवड्यात देखील अशीच एक घटना समोर आली आहे. एका शिकवणी चालविणाऱ्या शिक्षकाने अवघ्या 8 वर्षाच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना 23 सप्टेंबरला समोर आली होती. पीडितेच्या आईने बाजारपेठ पोलीस ठाण्यात तक्रार केल्यानंतर संबंधित प्रकार उघड झाला. पोलिसांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत आरोपी मुदर तालवाला याला अटक केली. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

नेमकं प्रकरण काय?

कल्याणच्या एका हाय प्रोफाईल सोसायटीत राहणारी आठ वर्षीय पीडित चिमुकली याच परिसरातील एका शिक्षिकेकडे शिकवणीला जायची. काही दिवसांपूर्वी शिक्षिका माहेरी गेली होती. त्यामुळे शिक्षिकेचा पती शिक्षक मुदर तालवाला हा मुलांची शिकवणी घेत होता. या दरम्यान पीडित आठ वर्षीय चिमुकली शिकवणीला जायला तयार नव्हती. जेव्हा तिची आई शिकवणीला जायला सांगत तेव्हा ती रडायला सुरुवात करायची.

पीडितेच्या आईला संशय आला. आईने मुलीला विश्वासात घेत विचारलं तेव्हा मुलीने घडलेला प्रकार हावभाव करुन दाखविला. त्यानंतर आई समजून गेली की आपल्या मुलीसोबत काय प्रकार घडला आहे, तो कोणी केला असावा या संदर्भातील सगळी माहिती बाजारपेठ पोलिसांना देण्यात आली.

हेही वाचा :

इन्स्टाग्रामवर मैत्री, जवळीक वाढताच अपहरण, भिवंडीच्या फ्लॅमध्ये मुलीला कोंडलं, पोलिसांनी आरोपीला कसं पकडलं?

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI