VIDEO: कामावर जाणाऱ्या तरुणीचा मोबाईल चोरण्याचा प्रयत्न, वसईत सतर्क नागरिकांकडून आरोपींना बेदम चोप

वसईत मोबाईल हिसकावून फरार होणाऱ्या 2 सराईत चोरट्यांना नागरिकांनी पकडून बेदम चोप दिला आहे. वसई पश्चिमेच्या 100 फुटी रोडवर आज (13 ऑगस्ट) सकाळी पावणे सात वाजताच्या सुमारास ही घटना घडली आहे.

VIDEO: कामावर जाणाऱ्या तरुणीचा मोबाईल चोरण्याचा प्रयत्न, वसईत सतर्क नागरिकांकडून आरोपींना बेदम चोप


पालघर : वसईत मोबाईल हिसकावून फरार होणाऱ्या 2 सराईत चोरट्यांना नागरिकांनी पकडून बेदम चोप दिला आहे. वसई पश्चिमेच्या 100 फुटी रोडवर आज (13 ऑगस्ट) सकाळी पावणे सात वाजताच्या सुमारास ही घटना घडली आहे.

वसईच्या शंभर फुटी रोडवरील सरकारी भंडारमध्ये काम करणारी हर्षाली बारगूडे ही तरुणी सकाळी कामावर जात होती. यावेळी अॅक्टिव्हा गाडीवर आलेल्या 2 सराईत चोरट्यांनी तिच्या हातातील मोबाईल हिसकावून पळ काढला. चोरट्यांच्या हल्ल्यानंतर तरुणीने प्रसंगावधान राखून चोर चोर करीत त्यांचा पाठलाग केला. तेवढ्यात सैरावैरा पळत असलेले दोन्ही चोरटे गाडीवरून घसरून पडले. यावेळी आजूबाजूच्या सतर्क नागरिकांना या दोन्ही सराईत चोरट्यांना पकडण्यात यश मिळाले.

“नागरिकांनी बेदम चोप देऊन चोरट्यांना पोलिसांच्या हवाली केलं”

नागरिकांनी या दोन्ही चोरट्यांना बेदम चोप देऊन वसईच्या माणिकपूर गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या स्वाधीन केले आहे. हेमंत यादव आणि प्रितम गुरखा असे पकडलेल्या दोन्ही चोरट्यांची नाव आहेत. यातील प्रीतम यादव हा वसई परिसरातून तडीपार आहे. या आधी रेल्वेमधील चोरी प्रकरणात त्याला अटक करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.

तरुणी आणि नागरिकांच्या सतर्कतेमुळे दोन सराईत चोरटे पोलिसांच्या ताब्यात

तरुणी आणि नागरिकांच्या सतर्कतेमुळे दोन सराईत चोरटे पोलिसांच्या हाताला लागले. यामुळे पोलिसांनी समाधान व्यक्त केले आहे. अशा काही घटना घडल्या तर नागरिकांनीही सावध राहून एकमेकांना मदत केली पाहिजे, तरच गुन्ह्याच्या घटना आटोक्यात येतील, असं मत आवाहन करण्यात आलंय.

हेही वाचा :

VIDEO : नांदेडच्या मुख्य वस्तीत बंदुकीचा धाक दाखवून लुटमार, घटना सीसीटीव्हीत कैद

आमच्या गाडीला कट का मारला? चाकणमध्ये वादात गुंतवून कारमधील 12 लाखांची चोरी

साताऱ्यातील पैलवानांसह नाशिकच्या तरुणाचा केरळातील बँकेवर दरोडा, साडेसात किलो सोन्याची लूट

व्हिडीओ पाहा :

People caught 2 thief while mobile snatching from girl in Vasai

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI