25 लाखांचे 65 मोबाईल पळवले, सीसीटीव्हीचा DVRही गायब, नागपुरात धाडसी चोरी

नागपुरात मोबाईलच्या शोरूममध्ये चोरी झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या चोरीत महागड्या वनप्लस कंपनीचे 65 मोबाईल चोरट्यांनी पळविले आहेत. महत्त्वाचं म्हणजे चोरटे सीसीटीव्हीचा डिव्हीआरसुद्धा सोबत घेऊन गेले आहेत.

25 लाखांचे 65 मोबाईल पळवले, सीसीटीव्हीचा DVRही गायब, नागपुरात धाडसी चोरी
NAGPUR CRIME

नागपूर : नागपुरात मोबाईलच्या शोरूममध्ये चोरी झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या चोरीत महागड्या वनप्लस कंपनीचे 65 मोबाईल चोरट्यांनी पळविले आहेत. महत्त्वाचं म्हणजे चोरटे सीसीटीव्हीचा डिव्हीआरसुद्धा सोबत घेऊन गेले आहेत. या धाडसी चोरीमुळे नागपूरच्या व्यापाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. पोलीस चोरांचा शोध घेत आहेत. (thief stolen 65 mobile phones from showroom in nagpur case registered against unknown)

चोरट्यांनी केली तब्बल 65 मोबाईलची चोरी

नागपूर शहरातील धरमपेठ हा एक महत्त्वाचा आणि मोठी बाजारपेठ असलेला भाग आहे. या परिसरात मोबईलचे अनेक शोरुम आहेत. याच परिसरात एक वन प्लस मोबाईल कंपनीचे मोठे शोरूम आहे. या शो रूममध्ये चोरांनी चोरी केली आहे. या धाडसी चोरीत चोरट्यांनी तब्बल 65 मोबाईल चोरले असून त्यांची किंमत साधारणतः 25 ते 26 लाख रुपये आहे. विशेष म्हणजे हे चोरटे एवढे हुशार आहेत की ओळख पटू नये म्हणून त्यांनी दुकानात असलेल्या सीसीटीव्हीचा डिव्हीआरसुद्धा चोरुन नेला आहे.

पोलिसांकडून तपास सुरु

धरमपेठसारख्या परिसरात चोरी झाल्याने मोठी खडबड उडाली आहे. या घटनेची माहिती होताच वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले होते. तसेच सायबर शाखेच्या पोलिसांनीदेखील या चोरीचा तपास सुरु केला आहे.

गुन्हेगारीमध्ये वाढ, सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह

दरम्यान, धरमपेठ हा परिसर शहरातील महत्त्वाचा आणि चकचकित परिसर म्हणून ओळखला जातो. हा परिसर सतत गजबजलेला असतो. अशा स्थितीतही चोरट्यांनी ही चोरी केल्यामुळे शहरातील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

दरम्यान नागपूरच्या जुनी शुक्रवारी परिसरात 15 सप्टेंबर रोजी कुख्यात गुंडाची हत्या झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. मंगळवारी रात्री ही थरारक घटना घडली. हत्या करुन मारेकरी फरार झाले. पोलिसांनी आरोपींचा शोध सुरु केला आहे. 2016 मधील एका हत्याकांडात पुराव्या अभावी गमछु नावाच्या गुंडाची निर्दोष मुक्तता झाली होती. गुंडाचा काही जणांशी वाद सुरु होता, त्यातून ही हत्या झाली असण्याची प्राथमिक शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. नागपूरच्या जुनी शुक्रवारी परिसरात गमछूची हत्या केल्यानंतर आरोपी घटनास्थळावरुन पसार झाले आहेत. पोलिसांनी हत्या प्रकरणाचा तपास सुरु करुन आरोपींचा शोध चालू केलाय.

इतर बातम्या :

VIDEO : नाशिक पोलीस अ‍ॅक्शन मोडवर, महिला पोलिसांकडून टवाळखोरांची धुलाई

नोकरीच्या शोधात त्याच्या जीवनाचा अंत, डोंबिवलीच्या खंबालपाडा रोडवर रक्तबंबाळ अवस्थेत तरुण, उपचारादरम्यान मृत्यू

मुंबईसह देशात पुन्हा घातपात घडवण्याचा कट, देशातील शांतता उद्ध्वस्त करण्याचं स्वप्न पाहणारा अनिस नेमका आहे तरी कोण?

(thief stolen 65 mobile phones from showroom in nagpur case registered against unknown)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI