2000 अश्लील व्हिडीओ शूट करुनही प्रज्वल रेवण्णा म्हणाला, ‘माझी एकच चूक…’ कोर्टात ढसाढसा रडत असं का म्हणाला?
माजी खासदार प्रज्वल रेवण्णाला शुक्रवारी जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. ही शिक्षा मिळाल्यानंतर प्रज्वल रेवण्णा कोर्टात नेमकं काय म्हणाला? हे वाचा...

लैंगिक अत्याचाराच्या गंभीर प्रकरणात दोषी ठरलेल्या माजी खासदार आणि जेडी(एस) पक्षातून निलंबित प्रज्वल रेवण्णाला बंगळूरुतील विशेष न्यायालयाने शनिवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. यासोबतच त्याला 10 लाख रुपये दंडाची शिक्षा देखील ठोठावण्यात आली आहे. विशेष तपास पथकाने (SIT) या प्रकरणाचा सखोल तपास करून 1632 पानांचे आरोपपत्र दाखल केले होते, ज्यात 113 साक्षीदार आणि 180 कागदपत्रांचा समावेश होता.
रेवण्णावर बलात्काराचे गंभीर आरोप
हासन जिल्ह्यातील गन्नीकाडा येथील रेवण्णाच्या कुटुंबाच्या फार्महाऊसवर घरकाम करणाऱ्या 48 वर्षीय महिलेने रेवण्णावर दोनदा बलात्कार केल्याचा आरोप केला होता. पीडितेच्या मते, 2021 मध्ये रेवण्णाने प्रथम फार्महाऊसवर आणि नंतर बंगळूरुतील त्याच्या घरी तिच्यावर अत्याचार केले. शिवाय, या घटनांचे व्हिडीओ रेकॉर्डिंग त्याने आपल्या फोनमध्ये केल्याचा दावाही महिलेने केला होता.
वाचा : गर्दीचा फायदा घेत नको तिकडे करत होता स्पर्श, नंतर जे घडलं… मुलींनी तर हा व्हिडीओ पाहायलाच हवा
“माझी एकच चूक…” रेवण्णाची कोर्टात विनवणी
शुक्रवारी विशेष न्यायालयाने रेवण्णाला दोषी ठरवले, तर शनिवारी शिक्षेची सुनावणी झाली. शिक्षेच्या वेळी रेवण्णाने कोर्टासमोर कमी शिक्षेची विनंती केली आणि म्हणाला, “माझी एकच चूक आहे की मी राजकारणात लवकर यशस्वी झालो.” मात्र, त्याच्याविरुद्ध तब्बल 2000 अश्लील व्हिडीओ आणि अनेक पीडितांनी केलेले लैंगिक शोषणाचे आरोप समोर आले होते.
एसआयटीचा तपास आणि पुरावे
विशेष तपास पथकाने (SIT) या प्रकरणाचा बारकाईने तपास केला. त्यांनी सादर केलेल्या 1632 पानांच्या आरोपपत्रात 113 साक्षीदार आणि 180 कागदपत्रांचा समावेश होता. पीडितेचे कपडे, डीएनए अहवाल आणि रेवण्णाने स्वतः रेकॉर्ड केलेले व्हिडीओ हे या खटल्यातील महत्त्वाचे पुरावे ठरले.
