पुणे : अनैतिक संबंधाच्या संशयावरून एका 34 वर्ष कामगाराचा डोक्यात लोखंडी रॉड मारून खून करण्यात आल्याची धक्कादयक घटना घडली. आता या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलंय. ही घटना 10 ऑगस्टला सायंकाळी चार ते पाच दरम्यान नाणेकर वाडी येथील भवानी कंपनीच्या आवारात घडली होती. भवानी कंपनीत कामाला असणाऱ्या एका कामगाराला सहकारी कामगाराचे आपल्या पत्नीशी अनैतिक संबंध असल्याचा संशय आला आणि त्याने ही हत्या केली होती.