फ्रेण्डशिप नाकारल्याचा राग, बारावीतल्या मुलाने कॉलेजमध्येच अल्पवयीन मुलीचा गळा चिरला

मुलीचा गळा चिरून फरार झालेल्या अल्पवयीन आरोपीला पोलिसांनी अटक केली. राजस्थानच्या पालीमधील बांगड रुग्णालयात मुलीवर उपचार सुरु असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

फ्रेण्डशिप नाकारल्याचा राग, बारावीतल्या मुलाने कॉलेजमध्येच अल्पवयीन मुलीचा गळा चिरला
प्रातिनिधिक छायाचित्र


जयपूर : एकतर्फी प्रेमातून अल्पवयीन तरुणाने अल्पवयीन मुलीवर जीवघेणा हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. राजस्थानच्या पाली जिल्ह्यात बारावी इयत्तेत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने अकरावीतील मुलीचा गळा चिरला. आपली मैत्री नाकारल्याने मुलाने ती जेवत असतानाच तिच्यावर प्राणघातक हल्ला केला. जखमी मुलगी रुग्णालयात असून तिच्या घशाला 20 टाके पडले आहेत. सध्या तिला जेवता किंवा बोलताही येत नसून ती केवळ ग्लुकोजवर आहे.

मुलीचा गळा चिरून फरार झालेल्या अल्पवयीन आरोपीला पोलिसांनी अटक केली. राजस्थानच्या पालीमधील बांगड रुग्णालयात मुलीवर उपचार सुरु असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

काय आहे प्रकरण?

पीडित अकरावीतील विद्यार्थिनी आणि बारावीत शिकणारा अल्पवयीन आरोपी हे दोघेही राजस्थानमधील मारवाड जंक्शन येथील बिथोरा करण गावातील सरकारी वरिष्ठ माध्यमिक विद्यालयाचे विद्यार्थी आहेत. तरुणीवर एकतर्फी प्रेम करणाऱ्या आरोपीने तिला फ्रेण्डशीप करण्यासाठी विचारले होते. मुलीने आपल्याशी मैत्री करावी, यासाठी तो तिच्यावर वारंवार दबाव टाकला असल्याचाही आरोप केला जात आहे.

मैत्री नाकारल्याचा राग

आपण दिलेली मैत्रीची ऑफर नाकारल्याने तरुणाला भयंकर राग आला. मंगळवारी विद्यार्थिनी कॉलेजमध्ये जेवत असतानाच तो तिथे आला आणि काही कळायच्या आतच त्याने तिचा गळा चिरला, असा आरोप केला जात आहे. हल्ल्यानंतर विद्यार्थी घटनास्थळावरुन पसार झाला. त्यानंतर शाळेतील शिक्षकांनी पीडितेला स्थानिक रुग्णालयात नेले. तिथून तिला पाली येथील जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. तिच्या घशाला 20 टाके पडले आहेत. तिला जेवता किंवा बोलताही येत नसून सध्या केवळ ग्लुकोजवर ती आहे. अल्पवयीन आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.

संबंधित बातम्या :

Nagpur चार अल्पवयीन मुलांनी केली सामाजिक कार्यकर्त्याची हत्या, शहाणपणाच्या गोष्टी सांगणे भोवले

बापाकडून वारंवार लैंगिक छळ, 17 वर्षीय मुलीने बॉयफ्रेण्डच्या मदतीने जन्मदात्याला संपवलं

काम करत नाही म्हणून वेटरला हॉटेलमालकाची बेदम मारहाण, पुरावा लपवण्यासाठी मृतदेह दरीत फेकला!

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI