AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video : Sharad Mohol | विठ्ठल शेलारची पोलिसांनी काढली धिंड, फार्म हाऊसवरून बुलेट प्रुफ स्कॉर्पिओ जप्त, पाहा व्हिडीओ

Viththal Shelar Sharad Mohol Murder Case Update : मुळशीचा किंग म्हणून फिरणाऱ्या गुंड विठ्ठल शेलारला शरद मोहोळ हत्या प्रकरणात मुख्य मास्टरमाईंड म्हणून अटक केलेली आहे. पोलिसांनी या भाईची त्याच्या त्याच्या राहत्या घरापासून धिंड काढली फोटो व्हायरल झालेत. त्यासोबतच त्याच्या फार्महाऊसवरही मोठी कारवाई केली आहे.

Video : Sharad Mohol | विठ्ठल शेलारची पोलिसांनी काढली धिंड, फार्म हाऊसवरून बुलेट प्रुफ स्कॉर्पिओ जप्त, पाहा व्हिडीओ
| Updated on: Jan 20, 2024 | 11:37 PM
Share

अभिजीत पोते, पुणे : पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळ याच्या हत्या प्रकरणात पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. शरद मोहोळ हत्या प्रकरणातील मुख्य मास्टरमाईंड असलेल्या विठ्ठल शेलार याची राहत्या घरापासूनच पोलिसांनी धिंड काढली आहे. पुनावळेमधून ही धिंड काढण्यात आली  होती. शेलार हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून शरद मोहोळ हत्या प्रकरणात मुख्य आरोपी आहे. पोलिसांनी त्याची फक्त धिंडच नाही काढली तर आणखीन एक कारवाई केली आहे.

विठ्ठल शेलारची बुलेट प्रुफ गाडी जप्त

शरद मोहोळ हत्या प्रकरणात मुख्य आरोपी असलेल्या विठ्ठल शेलार याची बुलेटप्रूफ स्कॉर्पिओ गाडी पुणे पोलिसांकडून जप्त करण्यात आली आहे. पूनावळेमधील त्याच्या फार्म हाऊसवर ही गाडी लपवून ठेवण्यात आली होती. ही गाडी शेलारचे साथीदार दुसऱ्या ठिकाणी हलवणार होते. यासाठी त्यांच्या हालचाली सुरू झाल्या होत्या मात्र गुन्हे शाखेकडून ही गाडी जप्त करण्यात आली आहे.

शरद मोहोळचा 5 जानेवारीला मर्डर

शरद मोहोळ याचा मर्डर होण्याआधी एक महिना आधी कट रचला गेला होता. शरद मोहोळला संपवण्यासाठी विठ्ठल शेलार, रामदास उर्फ वाघ्या मारणे आणि गणेश मारणे यांच्यात बैठक झाली असल्याची माहिती पोलिसांनी न्यायालयात दिली होती. पोलीस मुख्य मास्टरमाईंड असलेला तिसरा आरोपी असलेल्या गणेश मारणे याच्या शोधात आहेत.

पाहा व्हिडीओ:-

मामाच्या अपमानाचा पोळेकरकडून बदला

आरोपी मुन्ना पोळेकर आणि त्याच्या साथीदारांनी मोहोळला त्याच्या लग्नाच्या वाढदिवसादिवशी गोळ्या घालून संपवलं. कोथरूडमधील सुतारदरामध्ये राहत्या घराजवळ मोहोळवर गोळ्या झाडण्यात आल्या. मोहोळला संपवणाऱ्या मुन्नाचा मामा नामदेव कानगुडे याचा मोहोळने अपमान केला होता. पोळेकर याला मामाचा बदला घ्यायचा होता तर दुसरीकडे विठ्ठल शेलारही त्याला संपवायचं होतं. सर्वांनी मिळून कट रचला आणि मुन्नाला मोहोळच्या गँगमध्ये पेरलं.

दरम्यान, शरद मोहोळच्या मर्डरची आधीपासूनच प्लॅनिंग सुरू होती. साहिल पोळेकर याने बंदूक चालवण्याचा मुळशीमधील हार्डोशी गावामध्ये सराव केला होता. त्यानंतर मोहोळच्या पोरांसोबत जवळीक वाढवली आणि सर्वांचा विश्वास जिंकला. मोहोळला संपवण्याआधी मुन्ना याचं त्याच्या घरी येणं जाणं वाढलं होतं. याचा अर्थ असा होतो की त्याने संपूर्ण रेकी केली.  5 जानेवारीला आपल्या साथीदारांसह मोहोळची गोळ्या घालत हत्या केली. आता या प्रकरणात पोलीस आणखी काही खुलासा करतात का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.